फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील करोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना मिळणार औद्योगिक दिलासा

राज्यातील करोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना मिळणार औद्योगिक दिलासा

मुंबई: राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, लॉकडाऊनबाबतच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायीक उपक्रम सुरू केले जात आहेत. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.
केंद्राच्या दिशानिर्देशानुसार २० एप्रिलनंतर करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या व हॉटस्पॉटमध्ये नसलेल्या भागांना काही प्रमाणात दिलासा देण्यात येणार आहे. लॉकडाऊनसंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून त्यात कशाप्रकारे सूट मिळणार आहे, याचा उहापोह करण्यात आला आहे.
सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, कृषी व बागकाम, नारळ, काजू आणि मसाला बागांमधील कामे, कुक्कुट पालन, बँकांच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्यांना अनुमती देण्यात आली आहे. अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट देण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचवेळी १० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. बस आणि बेस्ट बसची विशेष सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या