

आकडा पोहोचला त्रिशतकाजवळ: सारीच्या रुग्णाचा मेडीकलमध्ये मृत्यू
नागपूर, ता. १० मे: शनिवारी मध्यरात्री जवाहनगर येथे रुग्ण आढळल्याने परिसरात संचारबंदी लागू केली. शहरातील आणखी एक नवा प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र झाला,त्यात रविवारी दि.१० मे रोजी आणखी ११ जणांची भर पडली असून, शहरात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा त्रिशतकाच्या जवळ पोहोचला आहे.एकाच दिवशी एम्स, मेडिकल, नीरी आणि पशुवैद्यक प्रयोशाळेतून ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. शहरात आज २९४ कोरोना बाधित असून, प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे हे द्योतक आहे.
शहरात ११ मार्चला पश्चिम नागपुरात पहिला कोरोनाबाधित आढळला. यानंतर ११ मेपर्यंत २९४ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आले. यातील ८१ जण बरे झाले. मात्र, कोरोनाची ही साथ तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करीत असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. अशावेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सतरंजीपुरा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे, परंतु त्यापेक्षा विदारक स्थिती मोमिनपुरा येथे आहे. सव्वाशेपेक्षा अधिक रुग्ण मोमिनपुऱ्यातील आहेत. शहरात तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर सतरंजीपुरा, पार्वतीनगर कोरोना संवेदनशील क्षेत्र बनले आहे. पाचही प्रयोगशाळेत पहिल्या टप्प्यात २२६ नमुने तपासण्यात आले. यातील ११ नमुने बाधित आढळले. तर शहरात आतापर्यंत एम्स, मेयो, मेडिकल, नीरी आणि माफसू या प्रयोगशाळांमध्ये ५ हजार ७७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रविवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये मोमिनपुरा परिसरातील व्यक्ती मोठ्या संख्येने असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व संशयित उपराजधानीतील चिंचभवन, व्हीएनआयटी, सिम्बॉयसिस, आमदार निवास, रविभवन, लोणारा येथील विलगीकरणात होते.
अमरावती येथील सारीच्या रुग्णाचा मेडीकलमध्ये मृत्यू:कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
अमरावती येथील काल मध्यरात्री ४१ वर्षीय पुरुषाला मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र भरती करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या स्वॅबची चाचणी ही कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याची .माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.त्यांना कर्क रोग होता. गेल्या ६ दिवसांपासून त्यांना श्वाश घेण्यास त्रास होत होता.शनविारी रात्री त्यांचे स्वॅब घेण्यात आला होता .आज रविवारी त्यांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला.
वादळाने पार्वतीनगरातील प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले टिन उडाले-
सायंकाळी शहरात जोरदार वादळ सुटल्याने गुरुवारी पार्वतीनगर येथे प्रतिबंधासाठी जे टिन लाावण्यात आले ते देखील उडाले. मनपा प्रशासनातर्फे सायंकाळी पुन्हा ट्रक भरुन लाकडे व टिना पाठवण्यात आले. यावेळी रामेश्वरी येथील सिमेंट रोडीवरील डाव्या बाजूस असलेल्या वसत्या देखील नव्याने टिना टाकून सील करण्यात आल्या. गुरुवारपासून फक्त उजव्या बाजूचा भाग हा सील करण्यात आला होता.प्रवीण मेडीकल स्टोरची गल्ली तसेच त्या जवळील सर्व गल्ल्या या आज पहील्यांदा नव्याने सील करण्यात आल्या आहेत.
जवाहर नगर सील-
शहरात आज हनुमान नगर झोन क्र.३ अंतर्गत येणारा जवाहर नगर सील करण्यात आला. काल मध्यरात्री मेडीकल येथे भरती असणा-या सारीच्या तीन रुग्णांपैकी एकाचा अहवाल हा आज रविवारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने मनपा प्रशासनाने तातडीने या प्रभागात पुढील भाग हा सील केला-
उत्तरपश्चिमेस-अजय मेडीकल
उत्तरेस- रस्ता(अजय मेडीकल ते पीरबाबा दरगाह)
उत्तर पूर्वेस- पीर बाबा दरगाह
पूर्वेस- रिंग रोड ते शारदा चौक रस्ता
दक्ष्णि पूर्वेस- विजय बनसोड यांचे घर शारदा चौक
दक्ष्णिेस- मानेवाडा सिमेंट रोड ते शारदा चौक रस्ता
दक्ष्णि पश्चिमेस- प्रज्ञा बुद्ध विहार मानेवाडा सिमेंट रोड
पश्चिमेस- मानेवाडा सिमेंट रोड
कोणत्या भागात किती रुग्ण-





आमचे चॅनल subscribe करा
