फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमयोग बारॲण्ड रेस्टॉरेंटमध्ये सशस्त्र दरोडा

योग बारॲण्ड रेस्टॉरेंटमध्ये सशस्त्र दरोडा

Advertisements

कन्हान येथील घटना:हातात तलवारी घेऊन बार मालकाला लृटले
नागपूर,ता.४ सप्टेंबर २०२४: महाराष्ट्राची उपराजधानी आज पुन्हा एकदा सशस्त्र दरोडाच्या घटनेनी हादरली.खुलेआम हातात तलवारी घेऊन कन्हान येथील योग बार ॲण्ड रेस्टॉरेंटमध्ये सशस्त्र गुंडांनी दरोडा टाकण्याचे धाडस केले.हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तलवारी व काठ्यांसह हल्लेखार यांनी हॉटेलमध्ये घूसून बारमालकाला जीवे मारण्याची धमकी देत तोडफोड केली.
याच दरम्यान त्यांनी बार मध्ये बसलेल्या ग्राहकांना देखील हुसकावून लावले.बारचे कर्मचारी आणि ग्राहक हे हल्लेखोरांची देहबोली बघता जीव वाचून बाहेर पळाले.या प्रकरणी बार आणि रेस्टॉरेंटचे मालक दीनदयाल बावणकुळे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.कन्हान पोलिसांनी आरोपींना बारा तासांच्या आत कळमेश्‍वर वरुन अटक केली.

शैलेश नागपुरे(वय २१,रा.जुनी कामठी),अब्दुल शाहा(वय ३३,शांती नगर)मयूर बोरकर(वय २०,कळमना)स्वपनील तोलमाजरे(वय २३,जुनी कामठी रोड,कळमना)अभिषेक गोंगणे(वय २५,रामटेक)अशी गुंड आरोपींची नावे आहेत.या गुंडांनी बार मालकाकडून काही रक्कम हिसकावली तसेच  एक लाख बावण हजार रुपयांच्या वस्तूंची तोडफोड केली.
ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार व अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पथकांनी केली.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या