फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमयेथे पुन्हा ओशाळला मृत्यू....!

येथे पुन्हा ओशाळला मृत्यू….!

Advertisements

प्रसुतीनंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने फाडली महिलेच्या शौचाची नळी!
नागपूर,ता.३ जानेवरी २०२५: मेडीकल रुग्णालयात २५ दिवस मृत्यूशी झुंज देऊन अखेर महिलेचा मृत्यू झाला,६ डिसेंबर २०२४ रोजी तिने नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला होता.रागिनी अनिल मसराम(वय वर्ष २५)असे मृतक महिलेचे नाव आहे.
महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्या मृतदेहासह ग्रामीण रुग्णालया पुढे आंदोलन केले.यावेळी अर्जुनी मोरगावे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मोहबे तसेच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन हलगर्जी करणा-या डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवले तसेच चौकशी समिती गठीत केली.समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
२५ वर्षीय रागिनीने ६ डिसेंबर रोजी प्रसुतीनंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला.रात्री १० वाजता नॉर्मल प्रसूती झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्याने तिची प्रकृती बिघडली.
लगेच तिला गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.नागपूरात भरती केल्यानंतर तपासाअंती टाके लावताना शौचाची नळी फाटल्याने या महिलेच्या शरीरात संसर्ग होऊन तिची किडनी आणि मेंदूवर आघात झाल्याचे निदान पुढे आले.उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत तब्बल २५ दिवसानंतर म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.
ही बाब लक्षात येताच रागिनीचा मृतदेह दुपारी चार वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ठेऊन आदीवासी संघटनांच्या महिलांनी तीव्र आंदोलन केले.मृतकाच्या पतीला शासकीय नोकरी,२५ लाखांची आर्थिक मदत तसेच बाळाला २५ लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
दोषी डॉक्टरांना निलंबित करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.जोपर्यंत लेखी अाश्‍वासन देणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही,अशी भूमिका त्यांनी घेतली.आंदोलन सुरु झाल्यानंतर एक तास आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच अन्य यंत्रणांचे अधिकारी कुणीही आंदोलनस्थळी पोहोचले नाही.नंतर अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.शिष्टमंडळाशी चर्चा करुन समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याची ग्वाही दिली.यानंतर आंदोलनकाने मृतदेह उचलला.
कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी उपनिरीक्षक यांच्या नेृतत्वात चोख बंदोबस्त लावाण्यात आला होता.
एकीकडे डॉक्टरांवर देवासारखा विश्‍वास ठेवणा-या रुग्णांवर त्यांच्या निष्काळजीपणातून जीव देण्याची वेळ येते त्यावेळी मृत्यू देखील ओशाळतो,हेच खरे.नऊ महिने गर्भात घडवून आपल्या बाळाचा चेहरा देखील नीट न बघता या बांळतिणीचा जीव ग्रामीण भागातील योग्य कर्तव्य न बजावणारे डॉक्टर कशारितीने व किती सहजतेने घेतात,ही घटना याचे आणखी एक बोलके उदहारण आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या