फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजयेत्या सहा महिन्यात मध्यावधीसाठी तयार रहा-आशिष देशमुख

येत्या सहा महिन्यात मध्यावधीसाठी तयार रहा-आशिष देशमुख

Advertisements

काँग्रेसच्या पराभूत उमेदवार सत्कार सोहळा

नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील निवडणूकीत महाराष्ट्राच्या मतदारांनी युतीला सत्ता स्थानपेसाठी स्पष्ट जनादेश दिला असतानाही सध्या मुंबईत जे काही सुरु आहे त्यातून सरकार कोणाचेही बनले तरी फार काळ टिकणार नाही. येत्या सहा महिन्यात मध्यावधीची निवडणूक लढण्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयार राहवे असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ते रविवार दि. ४ नोव्हेंबर रोजी त्रिमूर्ती नगर येथील अनुसया मंगल कार्यालयात आयोजित भाजप-शिवसेना विरोधात लढणारे विदर्भातील काँग्रेस,राष्ट्रवादी,रिपाई व अन्य पक्ष्ातील लढवय्या पराभूत उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी मंत्री रणजीत देशमुख उपस्थित होते.अध्यक्ष् स्थानी माजी मंत्री वसंत पुरके हे होते.

पुढे बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, फक्त १२-१३ दिवसांच्या प्रचारात काँग्रेसच्या उमेदवारांनी साठ हजारांच्यावर मते मिळवली. परिणामी काँग्रेसने येत्या निवडणूकीतही त्याच उमेदवारांची पुनरावृत्ती करावी. येणारी जिल्हा परिषद निवडणूक असो, विधान परिषदेची निवडणूक असो किवा पंचायत समितीच्या निवडणूका असो,काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच सजग राहण्याचा आणि कामाला लागण्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईप्रमाणेच विदर्भाची देखील जिल्हास्तरीय काँग्रेस समिती असावी असे ते म्हणाले. विदर्भाची संस्कृती व विदर्भाच्या जनतेमध्ये काँग्रेसविषयी असणारे प्रेम या समितीमुळे आणखी मजबूत होईल. विदर्भाचा बॅकलॉक भरुन काढणारे यांनाच सत्ता स्थापनेसाठी बाेलवावे असे निवेदन राज्यपालांना येत्या दोन दिवसात देणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या निवडणूकीत भाजपचे गृहमंत्री हे कलम ३७० वर भरभरुन बोललेत मात्र विदर्भाच्या दृष्टिने ३७१(सी) हे कलम ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. भाजपने विदर्भाच्या बॅकलॉक भरुन काढणार असल्याचे फक्त आश्‍वासनच दिले,फडणवीस सरकार हे विदर्भाचा बॅकलॉक भरुन काढण्यात अपयशी ठरलेत, विदर्भाचा बॅकलॉक कमी करणारे सरकार यांनाच राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे,विदर्भाचा अनुशेष हा सतत वाढत असून ठोस आराखडा देतील त्यांनाच राज्यपालांनी आमंत्रित करावे असे ते म्हणाले.

एका बाजूने महाराष्ट्रात,विदर्भात अवकाळी पाऊस,ओला दुष्काळाने थैमान घातले आहे मात्र दुसरीकडे शपथविधी सोहळा हा ‘वानखेडे स्टेडियम’ येथे करावा किंवा ‘शिवतीर्था’वर हा खेळ चालला असल्याची खोचक टिका त्यांनी केली. राज्यातला शेतकरी हा पराकोटीचा अडचणीत असताना शपथविधी सोहळा हा सरळ ‘राज्यपाल भवनात’ करण्याची मागणी त्यांनी केली. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली मी या अल्प मदतीचा निषेध करतो असे ते म्हणाले. राज्यात सध्या २५-२६ हजार कोटींच्या मदत निधीची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी दिल्लीहून सोनिया गांधी यांनी बोलावले असता मला दक्ष्णि-पश्‍चिमच्या कार्यकर्त्यांचे चेहरे आठवले आणि मी सोनिया गांधी यांना विजयाची ग्वाही दिली. जे मुख्यमंत्री एक लाख मतांच्या मताधिक्याची गोष्ट करायचे त्यांचे मताधिक्य ५० हजारांच्या आत आले. मुख्यमंत्र्यांच्या मताधिक्यामध्ये झालेली कमालीची घट मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या चरणी अर्पित करतो,असे आशिष देशमुख म्हणाले. बूथ कार्यकर्त्यांना मी सलाम करतो. नागपूर ही गडकरी, फडणवीस किवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमि नसून पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या विचारांना या कार्यकर्त्यांनी जनतेत पोहाेचविण्याचे काम केले आहे. ज्या पद्धतीने विदर्भात काँग्रेसचे उमेदवार लढले,ज्या जिद्दीने लढले त्या जिद्दीला मी सलाम करतो. गिरीश पांडव यांनी भाजप उमेदवाराचे मताधिक्य ७५ हजारांवरुन २० हजारांवर आणले. पुरुषोत्तम हजारे,बंटी शेळके यांनी भाजप उमेदवारांचा विजय अडीच हजारांच्या घरात आणला. कुठेही आपला आत्मविश्‍वास डगमगू न देता काँग्रेसच्या विचारधारेसाठी लढलेत. या नंतर आता हाच आत्मविश्‍वास कायम ठेऊन जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आणायची असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातील अंहकार जिरवण्याचे काम विदर्भाच्या जनतेने केले असल्याचे ते म्हणाले. २०१४ मध्ये भाजपला ४४ जागा याच जनतेने दिल्या मात्र यावेळी ती संख्या २९ वर आणून ठेवली. म्हणूनच एकच खंत सर्व उमेदवारांना आज वाटते,अजून थोड्या ताकदीने लढलो असतो तर निकालाचे चित्र हे पालटले असते. लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आहे,असे ते म्हणाले.

व्हॉट्सॲप हेरगिरीची सुरवात महाराष्ट्रातूनच!
व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून भारतातील काही पत्रकार आणि मानवी हक्कविषयक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्याचे प्रकरण जे उघडकीस आले आहे त्याची सुरवात महाराष्ट्रातील नक्ष् लग्रस्त भागातील मानवी हक्क कार्यकर्त्यांपासून झाली असल्याचा खळबळजनक आरोप आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात केला. ईजराईच्या पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरीची सुरवात महाराष्ट्र सरकारने केली असल्याचे ते म्हणाले. आदिवासी उत्थानासाठी काम करणारे मानवी हक्क कार्यकर्त्यांनाच नक्ष् लवादी ठरविणारे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांचा निषेध केला पाहीजे, असे ते म्हणाले. इंटरपोलच्या माध्यमातून हेरगिरी करणारे यांना भारतात खेचून आणण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात काँग्रेस व मित्र पक्ष्ाने अत्यंत चांगली कामगिरी बजावली असून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री हे जर हॅलिकाप्टरने १०-१२ सभांसाठी महाराष्ट्रात आले असते तर काँग्रेसच्या ४४ जागांमध्ये आणखी २५ जागांची भर पडली असती असे ते म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या