फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजयेत्या काळात पक्ष संघटन अधिक बळकट होणार: रूपाली चाकणकर

येत्या काळात पक्ष संघटन अधिक बळकट होणार: रूपाली चाकणकर

Advertisements

रा. काँ. पा पक्ष कार्यालयात महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक

नागपूर,ता.१५ सप्टेंबर २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर शहराचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांची आज पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

बैठकीच्या प्रारंभी महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांचे नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर आणि नागपूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या बैठकीत संघटन मजबूत करण्याबाबत तसेच आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात महिला पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत महिला संघटन बळकट करण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. महिला कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावर संघटन वाढविणे, महिलांशी संवाद साधणे, महिला अत्याचाराविरुद्ध लढा उभारणे तसेच पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचविणे या विषयांवर ठोस चर्चा केली.

नागपूर विभागातील महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित नागपूर शहराचे निरीक्षक राजेंद्र जैन, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, तानाजी वनवे, प्रशांत पवार, लक्ष्मी सावरकर, विशाल खांडेकर ,नूतन रेवतकर राजाभाऊ टाकसांडे, हाजी सोहेल पटेल, दिलीप पणकुळे, आभा ताई पांडे, जानबा मस्के, राजेश माटे , माधुरी पालीवार, मुमताज बाजी, मालू वणवे, एकनाथ फलके, मेहबूब पठाण, नागपूर शहर महिला पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
………………………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या