फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजया वर्षी २५०० किलोचा महाप्रसाद एकाच कढ़ईत

या वर्षी २५०० किलोचा महाप्रसाद एकाच कढ़ईत

Advertisements

 

विष्णू मनोहर यांचा आणखी एक ‘चविष्ट’ उपक्रम

नागपूर,ता.५ सप्टेंबर २०२२: “गणपती बाप्पा मोरया’ चा गजर करीत गणेश उत्सव म्हणजे घरोघरी आरत्यांचे सूर, चौकाचौकात ढोलताशाचा जल्लोष, आणि प्रत्येकाच्या ओंजळीत बाप्पांचा प्रसाद,सध्या असेच भारवलेले व तितकेच भक्तीमय वातावरण घरोघरी आहे यातच आणखी भर घालणार आहे ते राज्यातील सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर. दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी, अमृत भवन, सीताबर्डी येथे सकाळी ९ वाजता हा २५०० किलोचा सातळलेल्या डाळीचा महाप्रसाद विष्णू मनोहर बनवायला सुरवात करतील.

सर्व नागरिक यावेळी उपस्थित राहू शकतात, सोबतच हा महाप्रसाद बापांच्या भक्तांना वितरित केल्या जाईल अशी माहिती त्यांनी निवेदनातून दिली.

भक्तीमय अश्या कार्यक्रमात विष्णू मनोहर यांच्या महाप्रसादाला साथ लाभेल प्रसिद्ध भजन गायक कमलेश पांडे यांच्या सुरेल स्वरांची.या सोबतच आपण सगळे अनुभवू शकता ढोलताशांचा जल्लोष.

हा कार्यक्रम निःशुल्क असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा तसेच नागपूरकरांनी या महाप्रसादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेडिओ पार्टनर माय एफएम, व्हेन्यू पार्टनर अमृत भवन , ट्रॅव्हल पार्टनर एमडी ट्रॅव्हल आणि विश्वा ट्रॅव्हल, फिल्म प्रोडक्शन आकार फिल्म्स यांनी पुढाकार घेतला असून नागपूरकरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या