Advertisements

भाजपच्या माजी नगरसेविका माया भोसकर यांनी दिले आव्हान
भाजप आता पूर्वीसारखी राहीली नाही!
पैसे भरणा-यांना मिळाली नगरसेवकांची तिकीट!
नगरसेविकेचा पतीच करतो ‘महाजनकी!’
नागपूर,ता.२४ जानेवरी २०२५:भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका माया भोसकर यांनी मध्य नागपूरातील नेत्यांच्या कटकारस्थानपूर्ण राजकारणावर परखड टिका करीत,त्यांच्या प्रभागात यंदा भाजपचे चार ही नगरसेवक़ ठरवून पाडणार असल्याचे आव्हान खास ‘सत्ताधीश’जवळ व्यक्त केले.
महाल येथील सुप्रसिद्ध चिटणीस वाडा वस्तीतील माजी नगरसेविका या आज देखील त्या प्रभागात अत्यंत लोकप्रिय असून,वस्तीतील नागरिक हे त्यांच्याकडेच आपल्या समस्या घेऊन येतात.रात्री-अपरात्री माया भोसकर त्यांच्या मदतीला धावताना दिसून पडतात.मेडीकल-मेयो मध्ये मध्यरात्री त्या आपल्या हातावर जखमींना घेऊन धावतात.पोलिस ठाण्यात आपल्या नागरिकांसाठी धाव घेतात.वस्तीतील पाणी,गडरलाईन,कचरा अश्या कोणत्याही समस्या असो,नागरिकांना अद्यापही त्यांच्याच आधार वाटतो,या उलट या प्रभागातील भाजपच्या नगरसेवकांची नावे देखील वस्तीतील नागरिकांना माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले!
१९९८ ते २००२ दरम्यान त्या या वॉर्डमधून नगरसेविका राहील्या आहे.त्या काळी १६ पुरुष नगरसेवकांमध्ये एकट्या माया भोसकर यांना पक्षाचे तिकीट मिळाले होते.१९९२ साली देखील त्यांना पक्षाने तिकीट दिली होती मात्र,तत्कालीन काही मुरलेल्या कार्यकर्त्यांनी महिलेला तिकीट का दिली म्हणून हेतुपुरस्कर त्यांना निवडणूकीत पाडले,असा आरोप त्या करतात.त्या क्षणापासून भाजपचे ‘संधीसाधू‘ कार्यकर्ते यांना मी दूर केले व माझे कार्यकर्ते तसेच महिला वर्ग यांची मोर्चेबांधणी केल्याचे त्या सांगतात.त्या काळी या वॉर्डात भाजपचा कोणीही नागरिकांच्या सेवेत नव्हते,आता हजारो ‘नामधारी’ सेवेकरी दिसून पडतात.
आता भाजपमध्ये नगरसेवक पदासाठी तिकीट मिळण्यासाठीचा निकष बदलला असल्याचे त्या मान्य करतात.काँग्रेसचा बालेकिल्ला तोडून एका निरक्षर महिलेने विजयाचा झेंडा रोवला होता,ते देखील आपल्या कामामुळे मात्र,भाजप हे विसरला.लहान-लहान मुले सोडून,धावाधाव करुन ट्रक-ट्रक भरुन मी महिलांना विविध कार्यक्रमांना घेऊन जात असे.उपोषण,मोर्चे असो किवा मुंबई,दिल्लीचे कार्यक्रम असो,सगळी मदार माझ्या खांद्यावर त्यावेळी स्थानिक पक्षश्रेष्ठी सोडून देत असे.
अनेकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रभागातील वाघमारे नावाच्या भाजपच्या नगरसेविकाचे यजमानच संपूर्ण ‘शासकीय‘कारभार बघतात.नगरसेविकेचा पतीच संपूर्ण ‘महाजनकी‘करीत असल्याचे येथील नागरिक सांगतात.माया यांचा नवरा किवा मुले हे माया यांच्या राजकीय जीवनापासून पूर्णपणे अलिप्त राहीले होते,हे विशेष.राणी लक्ष्मीबाई विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास सुरवात केली.
‘सत्ताधीश‘सोबत बोलताना त्यांनी भाजप आता पूर्वीसारखा राजकीय पक्ष राहीला नसल्याची खंत व्यक्त केली.पूर्वीचे भाजपचे नेते यांचे बोलणे-चालणे,मुलीसारखा मान देणे यासोबतच प्रत्येक कार्यकर्त्याची वैयक्तिक स्तरावर दक्षता घेणे,विचारपूस करणे असे आत्मिक संबंध नेत्यांचे कार्यकर्त्यांसोबत राहत होते,असे त्या सांगतात.
२०१७ मध्ये देखील माया यांची तिकीट पक्की झाली होती.त्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील मिळाले होते मात्र,यानंतर माशी कुठे शिंकली कोणास ठाऊक,त्यांचे नाव कापण्यात आले.यावर बोलताना माया सांगतात की,ज्यांनी पक्षाकडे पैसे भरले त्यांना तिकीट मिळाली!
पण आता मी असे होऊ देणार नाही,मी पूर्ण पॅनल पाडील,भाजपचे चारही नगरसेवक या प्रभागातून मी पाडणार असल्याचे आव्हान त्यांनी दिले.जीव गेला तरी चालेल,आता जर भाजपने माझ्या कष्टाचे,माझ्या समाजकार्याचे आणि पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला उभारी देण्याच्या कार्याची दखल घेतली नाही तर मी या प्रभागातून एक ही भाजपचा नगरसेवक जिंकून येऊ देणार नाही,असा सरळ इशारा त्या देतात.
जनतेच्या सेवेसाठी आता भाजप निवडून येत नाही तर ‘भूलभुलाई‘करुन ते निवडून येतात आणि जनतेची सेवा करीत नाही मात्र,जे खरोखरंच जनतेची सेवा करतात त्याना भाजप तिकीट देत नाही,हे पक्क आहे,असे त्या सांगतात.
माया भोसकर मध्य नागपूरातील नेत्यांची चापलूसी करीत नाही,मी पटकन बोलून देते,मला काम पाहिजे,स्वच्छता पाहिजे,गोरगरीबांवर,महिलांवर अन्याय नाही झाला पाहिजे,त्यामुळेच मी येथील नेत्यांच्या,आमदारांच्या नजरेत खूपते,असे स्पष्ट बोल त्या ऐकवतात.
भाजपचे नगराध्यक्ष बंटी कुकडे यांनी नुकतेच विद्यमान निष्क्रिय नगरसेवकांना घरी बसवणार व काम करणा-यांनाच यावेळी नगरसेवक निवडणूकीचे तिकीट देऊ अशी घोषणा केली आहे,या पार्श्वभूमीवर भाजप माया भाेसकर यांना नगरसेवक पदाचे तिकिट देणार की नाही,यंदा ही भाजपच्या ‘उक्ती आणि कृती‘मध्ये भेद हे बघणे गरजेचे राहील.
(या बातमीचा व्हिडीयो ‘sattadheesh official youtube वर उपलब्ध)
……………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
