फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजया निवडणूकीत जनताच भाजपाविरोधात मैदानातः विकास ठाकरे

या निवडणूकीत जनताच भाजपाविरोधात मैदानातः विकास ठाकरे

Advertisements

उत्तर नागपुरातील जन आशीर्वाद यात्रेने मोडले सर्व विक्रम: नागरिकांचा उदंड प्रतिसाद

नागपूर, ता. ९ एप्रिलः नागपूर लोकसभा निवडणूकीकडे नागपूरकरच नव्हे तर देशाचे लक्षलागून आहे. महागाई, बेरोजगारी आणि मुलभूत सुविधांचा मुद्दा प्रत्येकाला भेडसावतआहे. त्यामुळे जनता आता भाजपा विरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. याचीच प्रचिति उत्तरनागपुरातील जन आशीर्वाद यात्रेतून दिसून आली. सकाळी आठ वाजता सुरु झालेली यात्रा ही चक्क दुपारी साडेतीनपर्यंत चालली असल्याचे प्रतिपादन इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीयकाँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी सांगितले.

मध्य नागपुरातील मनपा लालस्कूल, भुलेश्वर नगर येथे आयोजित सभेत ते बोलते होते.मंगळवारी सकाळी उत्तरनागपुरातील क्लार्क टाऊन येथून जन आशीर्वाद यात्रेला झाली. नझुल लेआऊट-अंगुलीमान बुद्ध विहार – आंबेडकरनगर-लाल शाळा-इंदोरा मोठा बुद्ध विहार-जुनी ठवरे कॉलनी- आवळेनगर-कामगार नगरचौक-कपिल नगर-बाबादिपसिंग नगर -समतानगर-आर्यनगर-जागृतीनगर-इंदियानगर-मार्टिंन कॉलनी-कस्तुरबा नगर-जरीपटका बाजार मेनरोडमार्गे जिंजर मॉल पोहोचेपर्यंत हाजोरांच्या संख्येतनागरिक स्वयंफूर्तीने सहभागी झाले. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत, युवक काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, वेदप्रकाश आर्य, महेंद्र भांगे, दिनेश अंडरसहारे, संदीप सहारे, मनोज सांगोळे, मनोजबनसोड, सुरेश जग्यासी, स्नेहा निकोसे,भावना लोणारे, विवेक निकोसे, रोहित यादव यांची उपस्थिती होती.

सायंकाळच्या सत्रात मध्य नागपुरातील भुलेश्वरनगर, पूर्व नागपुरातील जयभीम चौकहिवरीनगर आणि उत्तर नागपुरातील भिम चौक, नारा रोड येथे झालेल्या जाहीर सभेत मोठ्यासंख्येत नागरिकांची उपस्थिती होती. जाहीर सभेत माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तमेवार, आमदार अभिजित वंजारी, अतुल लोंढे, विशाल मुत्तमेवार, बंटीशेळके यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

क्रेनवरील “त्या” बॅनरने संचारला उत्साह

उत्तर नागपुरात सुरु असलेल्या यात्रेत हजारोंच्या संख्येत नागरिक सहभागीझाल्यावर जिंजर मॉल परिसरात विकास ठाकरे यांची यात्रा पोहोचात “हर ओर अंधेरा है, ईमादार नेता ही आने वाले कल का सबेरा है, भावी खासदार विकासभाऊ ठाकरे” या ओळींसह मोठे बॅनर क्रेन वर चाहत्यांनी झळकवताच यात्रेत सहभागींमध्ये उत्साह संचारला. तसेच दिवसभर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

शहरात अकरा ठिकाणी उभारली समता व एकात्मतेची गुढी

 हिंदू नववर्षानिमित्त शहरातील विविध महिला मंडळांच्या सहकार्याने ओबीसी महिला महासंघ नागपूर शहर अध्यक्षा वृंदाताई विकास ठाकरे यांच्या हस्ते समता व एकात्मतेची गुढी उभारण्यात आली. यावेळी प्रभातफेरी, शोभायात्रांचेही आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमांत मोठ्या संख्येत महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी काढण्यात आलेली प्रभातफेरी महेश नगर ते युनिव्हर्सल चौक, मुदलीआर चौक, सचिनजी घाडगे यांच्या घराजवळ, प्रेम नगर हनुमान मंदिर झेंडा चौक प्रेम नगर, झाडे चौक, फलके हॉटेल, चकणा चौक, बारीपुरा, लालगंज गुजरी मार्गे निघाली.

प्रामुख्याने राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नागपूर शहर अध्यक्ष वृंदाताई विकासजी ठाकरे, योगेश मसगले पाटील, रुतिका डाफ (मासमारे), माजी महापौर नरेश गावंडे, मनपा विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, संगीता तलमले, श्रिया ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, मारुतीराव निनावे महाजन, अजय दलाल, सचिन घाडगे, लक्ष्मण रावजी बाळबुधे, प्रशांत वाघमारे, चेतन सदन, मंथन पोटदुखे, रितेश कडव यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या