फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारण‘या‘ दोन आमदारांच्या आग्रहामुळे नागपूरात आता दोन शेवटची उड्डाणपुले:गडकरी

‘या‘ दोन आमदारांच्या आग्रहामुळे नागपूरात आता दोन शेवटची उड्डाणपुले:गडकरी

Advertisements
७ कोटींचा निधी कमाल टॉकिज चौकात व्यापारी संकुलासाठी मंजूर

नागपूर शहर व जिल्ह्यात केली दोन लाख कोटींची विकासकामे
बुटीबोरीतील महानंदा, मदर डेअरीने केले टेकओवर:अदानीच्या ‘धारा’चे देखील उत्पादन बुटीबोरीत!
नागपूर,ता.१२ जून २०२५: नागपूरात निर्माण झालेल्या व निर्माण होणा-या उड्डाणपूलांमध्ये इतकी कमतरता आणि दोष का दिसत आहेत?मानकापूरपासून लिबर्टीकडे उतरणारा उड्डाणपूल,एलआयसी चौकापासून कामठीकडे जाणारा उड्डाणपूल,शांतिनगर ते कळमना उड्डाणपूल,कडबी चौकपासून मोमिनपुराकडे जाणारा उड्डाणपूलाची लांबी तर पाचपावली ते पहलवान शहा दर्गापर्यंत होती मात्र,नियमबाह्यरित्या तो उड्डाणपूल मोमिनपूरा ते टिमकीपर्यत निर्मित होत आहे. एक वर्षापासून जास्त कार्यकाळ लोटला मात्र, महारेल आतापर्यंत या उड्डाणपूलाविषयीचे प्रशासकीय मंजुरी न्यायालयात सादर करु शकली नाही,असा प्रश्‍न केला असता,तुम्ही सांगत असलेल्या माहितीचा वस्तुस्थितीसोबत काहीही संबंध नसल्याचे गडकरी म्हणाले.तो रस्ता आमचा आहे.डिझाईन मंजूर झाला आहे,अतिक्रमणाचे काही प्रश्‍न आहे.पहिल्यांदा जेव्हा मी मोमिनपुरापासून उड्डाणपूलाच्या निर्मिची घोषणा केली तर लोक हसत होते,इतके अतिक्रमण मोमिनपुरात होते.आता मोमिनपुरातून कामठी रोड ते कडबीचौकपर्यंत जाऊ शकता. महारेलला या उड्डाणपुलाचे काम दिले आहे.त्यात कोणताही गैरव्यवहार नाही,असा दावा गडकरी यांनी केला.उड्डाणपुलांच्या डिझाईन्समध्ये मात्र नक्कीच कमतरता राहीली.लिबर्टीच्या उड्डाणपुलात नक्कीच काही दोष आहे परंतु मी आता सीआरएफमध्ये ३४ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
कमाल टॉकिज पासून ताजबागपर्यंत जो उड्डाण पुल आम्ही बनवला आहे त्याची निर्मिती उत्कृष्ट असून आम्ही पहिल्यांदा मलेशियाचे नवे तंत्रज्ञान त्यात वापरले आहे.आता कमाल टॉकिज चौकात खूप मोठे व्यापारी संकुल तयार होणार असून,त्यात सगळ्या व्यापारी लोकांना जागा मिळेल.आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते व्यापारी संकुल राहणार असून माझ्या एनएचएआय विभागाकडून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नागपूरात सर्व मतदारसंघात उड्डाणपुले,भुयारी मार्ग बनले आहेत.नागपूरकर तर आता म्हणतात आहेत की किती उड्डाणपुले बनवणार?आता कृपया उड्डाण पुले बनवू नका,अशी मागणी समोर येत आहे.मात्र,आता एकच पूल बाकी राहीला आहे तो म्हणजे भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या गल्लीतील.ज्यांच्या घरासमोरील गल्ली ही फक्त दोन मीटरची आहे.येथेच आता एखादा पूल मंजूर करुन घ्या,इतके प्रकल्प त्यांनी मंजूर करुन घेतले आहे,कोणतीही जागा सोडली नाही.भाजप आमदार मोहन मते यांच्या मानेवाडा रिंग रोडची जागा देखील यातून सुटली नाही,अशी मिश्‍किली त्यांनी उड्डाणपूलांच्या प्रश्‍नावरु केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा,सुशासन व गरीब कल्याणावर भर देणा-या अकरा वर्षांच्या यशस्वी कारर्कीदीसाठी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व जनतेला त्यांच्या अकरा वर्षातील उपलब्धीची माहिती देण्यासाठी नागपूरात हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाच्या अनेक उपक्रम व विकास प्रकल्पांचा उहापोह केला.याप्रसंगी त्यांनी नागपूर व नागपूर जिल्ह्यासाठी दोन लाख कोटींची विकासकामे केली असल्याचे सांगितले.याचे सर्व श्रेय भारताच्या जनतेचे असून या विकासकामांसाठी जनतेने समर्थन केले,आमची साथ दिली यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले.
या प्रसंगी बोलताना,अशोक चौक सिग्नल विरहीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.मेडीकल चौक देखील तसाच बनवण्याची माझी ईच्छा असून त्यावर अभ्यास सुरु असल्याचे ते म्हणाले.मात्र,मेडीकल चौक तसा बनावा किंवा आहे तसाच राहू द्यावा,याविषयी नागपूरकर जनतेचे मत काय आहे याचा देखील विचार नागपूरच्या खासदारांनी आता तरी करायला हवा,अशी मागणी केली जात आहे.
अकरा वर्षात सर्वात मोठी केंद्र सरकारची उपलब्धी कोणती आहे?असा प्रश्‍न केला असता,संपूर्ण पत्रकार परिषदेत मी केंद्र सरकाची उपलब्धीच सांगत होतो,आम्ही तर परिक्षा देणारे परिक्षार्थी आहोत,त्याचे मुल्यांकन तुम्हाला करायचे आहे,असे उत्तर त्यांनी दिले.केंद्र सरकारने २०२९ मध्ये ३३ टक्के महिलांना लोकसभेत राजकीय आरक्षण देण्याचे विधेयक पारित केले आहे,यावर अंमलबजावणी होणार का?असा प्रश्‍न केला असता,महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची आमची वचनबद्धता असून आम्ही ते विधेयक पारित देखील केले असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या अकरा वर्षांची कारर्कीद जनतेपर्यंत पोहोचवणारे उपक्रम तुम्ही सर्वदूर राबवता आहात याचा अर्थ स्वत:च्या प्रतिमेला घेऊन चिंतित आहे का?असा प्रश्‍न केला असता,आम्ही स्व:प्रतिमेसाठी चिंतित नसून भारतासाठी चिंतित असल्याचे उत्तर गडकरी यांनी दिले.प्रगतीशील,समृद्ध,विकसित भारत निर्माणासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.आमच्या सगळ्यांच्या मनात आपल्या देशाचा विकास होवो हीच आमची प्राथमिकता असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
एका प्रश्‍नाच्या उत्तरात देशात २८ महामार्गांवर आम्ही सब-हायवे निर्माण केले असल्याचे सांगितले.त्या सब हायवेवर मोठ्यातील मोठे विमान हे सहज उतरु शकतात.त्याचा विमानतळासारखा देखील उपयोग होऊ शकतो.माझ्या मनात तर त्याचा रेल्वे फाटक सारखा उपयोग करण्याचा विचार आहे.रेल्वे येथे तेव्हा रेल्वे फाटक स्वयंचलितपणे बंद होतात व रस्त्यावरील वाहतूक थांबते तसेच महामार्गावर फाटक असतील.विमान उतरेल तेव्हा ते बंद होतील,विमान उतरेल,प्रवाशी विमानतळाच्या आत जातील व रस्ता पुन्हा सुरु होईल.राजस्थानमध्ये ४०० ते ५०० किलोमीटरपर्यंत संपूर्ण वाळवंट आहे.अश्‍या ठिकाणी विमानतळेच नाही.अश्‍या जागांवर सुरक्षेच्या दृष्टिकोणातून ही संकल्पना राबविण्याचा विचार आहे.
‘नागपूरची साडी‘याचा उल्लेख पत्रकार परिषदेत काही वर्षांपूर्वी तुम्ही केला होता.हातमाग इंडस्ट्री तसेच हजारो महिलांना रोजगार याचे काय झाले तसेच फूटाला येथे कोट्यावधीचे रंगीत कारंजे बंद आहेत,याचे काय कारण आहे?कारण फूटाळाच्या कारंजेविषयी सांगताना यामुळे नागपूरची ओळख ’फाऊंटेनचे शहर’म्हणन होणार असल्याचा दावा तुम्ही केला होता याचे काय झाले?असा प्रश्‍न केला असता,सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे,त्याचा निर्णय न झाल्याने फूटाळ्यातील कामे अडकली आहे,असे गडकरी यांनी सांगितले.याशिवाय नागपूर तसेच विदर्भातील अनेक गावे ही हातमागसाठी प्रसिद्ध होती.माझ्या धापेवाडा गावात,बेला,खापा तसेच भंडारा जिल्ह्यात काम सुरु होणार होतं.धापेवाड्यात टेक्सटाईल्सचे काम सुरु झालं आहे.आम्ही पहिले उत्तम साड्या तयार केल्या,त्यावर झारखंडमधून पेंटिंग केले.मुंबईच्या काही मॉडेल्सनी त्या साड्या नेसून सुंदर प्रदर्शन केलं.हातमागाच्या साड्या तयार होतात आहे पण स्थिती अशी आहे की आम्हाला दाखवायला देखील साडी उपलब्ध नाही,एवढी त्यांची मागणी आहे.आता धापेवाड्यात मोठ्या टेक्सटाईल्सच्या इमारतीचे काम सुरु केले आहे.सहा महिन्यात त्याचे उद् घाटन होईल.याशिवाय उत्तम दर्जाची सुती साडी ही इलेक्ट्रॉनिक पाॅवरलूममध्ये तयार करुन त्याला ‘नागपूरची साडी‘असा ब्राण्ड तयार करुन गरीब,गरजू महिलांना ती चार हजार रुपयांची साडी केवळ ४०० रुपयात देणार असल्याचे गडकरी म्हणाले.यासाठी आम्ही धापेवाडा व पाचगावातील पंधराशे महिलांना प्रशिक्षण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.आता बेला व खापा येथे देखील प्रशिक्षण सुरु करणार आहोत.हातमाग व्यवसाय पुन्हा एकदा नागपूरसाठी प्रसिद्ध करायचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
मदर डेअरीच्या प्रकल्पाविषयी मागील पत्रकार परिषदेत तुम्ही तीन हजार नोक-या मिळणार असल्याचे सांगितले होते,११ वर्षांचा लेखाजोखा मांडत असताना मोदी हे पत्रकार परिषद का घेत नाही?असा सवाल केला असता,तुमचा निरोप मी मोदींपर्यंत पोहोचवेल,अशी मिश्‍किली गडकरी यांनी केली.
मदर डेअरीचं साढे आठशे कोटी रुपयांचं काम बुटीबोरी येथे सुरु आहे.त्या कारखान्यात पशुखाद्याचे देखील उत्पादन होणार आहे जे स्वस्तात शेतक-यांना मिळेल.याशिवाय बुटीबोरी हिंगणामध्ये जी महानंदा नावाची डेअरी होती तिथे आता मदर डेअरीचे उत्पादन होणार आहे.तिथेच ‘धारा‘नावाच्या तेलाचे उत्पादन सुरु आहे.सध्या मदर डेअरी पाच लाख लिटर दुधाचे उत्पादन सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले.सध्या तीन हजार नाही,२१ हजार लोकांकडून ५ लाख लीटर मदर डेअरी दूध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पहलगाम येथे अत्यंत क्रूरपणे चार दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली.दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी ते अद्याप केंद्रीय तपास यंत्रणाना सापडले नाही,याकडे लक्ष वेधले असता,आम्ही पाकिस्तानचे १० सैन्य तळ उधवस्त केली,आमचा लढा दहशतवाद्यांशी सुरु आहे.दहशतवाद्याविषयी आमची कोणतीही सहानुभूती नाही,त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे आमच्या सरकारचे धोरण असल्याचे गडकरी म्हणाले.
…………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या