फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजयासाठी राहूल पांडे यांचा माहिती अधिकारी म्हणून विरोध...

यासाठी राहूल पांडे यांचा माहिती अधिकारी म्हणून विरोध…

२०१६ पासून नागपूरातील भूखंडांच्या संबंधित अनेक प्रकरणे ‘पेंडिंग’
हॉटेल अशोका,कुकरेजा इन्फिटी प्रकरणांचाही समावेश!
केंद्रिय मंत्रालयात माहिती कार्यकर्ते टी.एच.नायडू यांची तक्रार
राज्य सरकारला केंद्रिय मंत्रालयाचे पत्र:नियमानुसार कारवाई करा
नागपूर,ता.२० डिसेंबर २०२४: देशातील अनेक माहिती आयुक्त गांर्भीयाने काम करीत नसल्याचा ठपका नेहमीच ठेवला जातो.खटल्यांचा निपटारा वर्षानुवर्ष केला जात नाही.अतिशय महत्वाची प्रकरणे माहिती आयोगाकडे चार ते सहा वर्षे प्रलंबित आहेत.कायद्याची अंमलबजावणी करण्या ऐवजी प्रकरणे प्रलंबित ठेवण्याकडेच अनेक माहिती आयुक्तांचा कल असलेला दिसून पडतो.राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठाचे राहूल पांडे यांनी त्यांची अनेक प्रकरणे २०१६ पासून प्रलंबित ठेवल्याची तक्रार ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते टी.एच.नायडू यांनी नुकतीच केंद्र सरकारच्या ministry of Personnel P.G&pensions या विभागाकडे नोंदवली.त्यांच्या या तक्रारीची नोंद या मंत्रालयाच्या पोर्टलवर देखील झाली आहे.

याशिवाय नायडू यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे देखील ११ ऑक्टोर २०२४ रोजी राहूल पांडे यांच्या विरोधात तक्रारीचे पत्र पाठवले.राहूल पांडे हे लोकप्रिय अश्‍या इंग्रजी दैनिकात वरिष्ठ पत्रकार म्हणून अनेक वर्ष कार्यरत होेते,त्यामुळे त्यांचे राजकीय नेते,उद्योगपती,बिल्डर्स,कंत्राटदार,महानगरपालिकेचे तसेच नागपूर सुधार प्रन्याच्यासचे उच्च पदस्थ अधिका-यांशी,पोलिस विभागाचे अधिकारी,परिवहन विभागाचे अधिकारी आदी यांच्यासोबत अतिशय बळकट असे राजकीय,सामाजिक व वैयक्तिक संबंध निर्माण झाले आहेत.त्यामुळेच त्यांनी माझी कुकरेजा इन्फिटी या २८ मजली अवैध इमारतीबाबतच्या नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या अधिका-यांना, माहिती अधिकारात माहिती विचारली असताना देखील मला देण्यात आली नाही.या विरोधात राहूल पांडे यांच्याकडे द्वितीय अपील देखील केले.मात्र,कोणत्याही कारणांशिवाय माझे अपील प्रलंबित ठेवण्यात आले आहे.हा सरळ सरळ कुकरेजा बिल्डरला फायदा पोहोचवण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी अर्जात केला.
कुकरेजा इन्फिनिटीला मनपाच्या अग्निशमन विभागासह, विविध विभागांकडून मिळालेल्या परवानग्या यांची माहिती,माहिती अधिकारातही मला न मिळाल्याने मी हायकोर्टाचे द्वार ठोठावले.हायकोर्टाने देखील माहिती आयोगाला मला उचित माहिती पुरवण्याचे आदेश पारित केला.मी मागितलेली माहिती हरवली असेल,कागदपत्रे खराब झाली असेल तरी तातडीने ती सुधारुन माहिती पुरविली जावी,असे स्पष्ट आदेशच हायकोर्टाने माहिती आयोगाला दिले मात्र,२०१८ मध्ये कोर्टाने हे आदेश दिले असून देखील, माहिती आयोगाने मला उपरोक्त माहिती पुरविली नसल्याचा नायडू यांनी आपल्या तक्रारीत उल्लेख केला आहे.ही कोर्टाची अवमाननाच असून जे माहिती आयुक्त कोर्टाच्या आदेशालाही जुमानत नाही,त्यांना माहिती आयुक्ताच्या पदावर राहणे योग्य नसल्याची टिका ते करतात.

राहूल पांडे यांनी वारंवार माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले.इतकंच नव्हे तर त्यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे देखील उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला.त्यांच्या याचिकेत,राहूल पांडे यांनी क्रमवारीनुसार अपील निकाली न काढल्याचा देखील आरोप आहे.हेतुपुरस्सर टी.एच.नायडू यांच्या अपील डावलून त्यांच्या नंतरच्या अपीलांवर सुनावणी घेण्याचा क्रम राहूल पांडे यांनी सुरुच ठेवल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.राहूल पांडे हे राजकीय नेते,बिल्डर्स व कंत्राटदारांना,सरकारी अधिका-यांना पत्रकार म्हणून ओळखत असल्याने,याचा नियम मोडणा-यांना सरळ  फायदा होत असल्याचा आरोप नायडू आपल्या तक्रारीत करतात.हायकोर्टच्या आदेशानंतर राहूल पांडे यांनी २०२२ मध्ये कुकरेजा इन्फिटीवर सुनावणी घेतली मात्र,२०२४ पर्यंत त्यांनी कोणताही आदेश काढलाच नाही!नुकतेच ते ऑक्टोबरमध्ये निवृत्त झाले आहेत.

काही लोकांच्या हितासाठी काम होत असून सामान्य माणसांना राहूल पांडे यांच्याकडून कोणतीही मदत होत नाही,त्यामुळे त्यांना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त पदी रुजू करुन घेऊ नये,एवढे महत्वपूर्ण पद फडणवीस सरकारने आतापर्यंत रिक्त ठेवले आहे,त्यावर राहूल पांडे 

यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यास किवा त्यांना पुन्हा संधी देण्यास विरोध असल्याचे ते नमूद करतात.या पत्रासोबत नायडू यांनी माहिती अधिकाराशी संबंधित विविध खटल्यातील हायकोर्ट व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देखील जोडले आहेत.केंद्रिय मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या उत्तराची प्रत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्यपाल आदी यांना देखील पाठवली आहे.
लक्ष्मीनगर चौकातील हॉटेल अशोका हे ग्रेड-४ असतानाही ग्रेड-३ चा परवाना घेऊन चालत असल्याची तक्रार यात आहे.हॉटेल अशोकासंबंधित मनपा,प्रदुषण मंडळ इत्यादी शासकीय विभागाकडून महितीच्या अधिकारात माहिती देण्यात आली नसल्याने,या संबधीची अपील देखील गेल्या अनेक वर्षांपासून राहूल पांडे यांच्याकडे प्रलंबित असल्याची तक्रार नायडू यांनी आपल्या तक्रारीत केली आहे..केंद्रीय मंत्रालयाने  २३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य सरकारला ‘नियमाप्रमाणे ’कारवाईचे आदेश दिले आहेत,त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे पत्राद्वारे नायडू करतात.अपीलांवर निर्णय न देता मला कोर्टात जाण्यास बाध्य करण्यात आल्याची तक्रार नायडू पत्रात करतात.यामुळे माझा वेळ व माझा पैसा खर्ची झाला असून,राहूल पांडे हे पदावर कशासाठी बसले?असा सरळ सवाल ते पत्रात करतात.
अनेक प्रकरणात माहिती दडवण्यासाठी तसेच बिल्डर्स,राजकीय नेते यांना फायदा पोहोचवण्यासाठी कागदपत्रे गहाळ झाल्याचे उत्तर माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मिळतात.नायडू यांना देखील अनेक प्रकरणात असेच उत्तर शासकीय अधिका-यांकडून मिळाले.१० डिसेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयातील दस्तावेज गहाळ झाल्याच्या प्रकरणात जबाबदार व्यक्तीविरुद्ध फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले आहेत.राहूल पांडे यांच्या पूर्वी त्या पदावर डी.व्ही.पाटील हे माहिती आयुक्त होते.त्यांनी  एका प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.नागपूर सुधार प्रन्यासच्या अभियंता भांडारकर यांना ५ हजारांचा दंड,मनपाला ५ हजारांचा दंड,जिल्हाधिकारी कार्यालयाला दोन वेळा १०-१० हजारांचा दंड तर २५ हजारांचा शासनाकडे जमा करण्याचा दंड ठोठावला होता,हे विशेष.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येऊन १९ वर्षे पूर्ण झाली आहे.कायदा अस्तित्वात आला तेव्हा भारताचा हा कायदा जगातील सर्वोकृष्ट पारदर्शिकतेचा कायदा होता.या कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाला मागणीनुसार सर्व  माहिती देणे बंधनकारक आहे.एखाद्या सरकारी कर्मचा-याने वाजवी कारणांशिवाय ३० दिवसांच्या आत माहिती नाकारल्यास त्याला दंड भरावा लागतो.नागरिकांना विभागातील वरिष्ठ अधिका-याकडे दाद मागण्याची तरतूद आहे.ती समाधानकारण नसल्यास दूसरे अपील करण्यासाठी प्रत्येक राज्यात व केंद्रात अपील आयोग निर्माण करण्यात आले आहे.आयोगांना त्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे अधिकारही दिले गेले आहे.
मात्र,पंतप्रधान,विरोधी पक्ष नेते व केंद्रिय आयोगासाठी आणखी एक मंत्री,मुख्यमंत्री,विरोधी पक्ष नेते आणि ३ अन्य सदस्य असलेल्या समितीद्वारे माहिती आयुक्तांची निवड केली जाते,ही निवडच माहिती अधिकार कायद्यासाठी कमकुवत ठरते.कोणत्याही पारदर्शक प्रक्रियेशिवाय आयुक्तांची निवड करण्यात येते.बहूतेक प्रकरणांमध्ये नोकरशाही आणि राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध असलेल्यांना पदे देण्यात आली.अनेकांनी याकडे निवृत्तीनंतरचे मानधन किंवा सेवेत असताना केलेल्या मेहरबानींचे पारितोषिक म्हणून पाहिले.घटनेच्या कलम१९(१)(अ)अन्वये निर्माण झालेला मुलभूत अधिकार म्हणून माहितीच्या अधिका-यांनी त्यांना मानले नाही किवा ते त्यांना समजलेच नाही.माहिती मागण्यासाठी कोणतेही कारण देण्याची गरज नाही,असे कायद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.मात्र,आयुक्त आणि न्यायालयांनी अर्जदारांना माहिती का हवी आहे,याची कारणे विचारण्यास सुरवात केली.अर्जदाराच्या उत्तराने समाधान न झाल्यास माहिती आयुक्तांनी अर्जदारांना माहिती नाकारण्याची (बेकायदा)पद्धत सुरु झाल्याचे माजी केंद्रिय माहिती आयुक्त शैलेश गांधी लिहतात….!
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या