फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारण‘या’प्रभागात भाजपला तरुणाईचे आव्हान

‘या’प्रभागात भाजपला तरुणाईचे आव्हान

नागरिक समिती प्रभाग क्र २२ सोबत जुळले ५०० सदस्य

नागपूर,ता. ३१ डिसेंबर २०२५ : तरुणाईची नागरिक समिती प्रभाग क्र. २२ तीन महिन्यांपूर्वी गठीत झाली.या तरुणाईने मिळून ५० हून अधिक सक्रिय सदस्य नोंदणीकृत केले.यात २६ परिसर प्रमुख,सोशल मिडीयाची चमू,पदयात्रा,प्रचार यात्रेची चमू,निवडणूक अजेंडा,निवडणूकीत नेरेटीव्ह काय असला पाहीजे यावर सखोल अभ्यास करणारी चमू.अश्‍या या चमूसोबत आज किमान ५०० हून अधिक सदस्य जुळले आहेत.ही चमू प्रभागात फिरुन विविध समस्यांचा वेध घेते. या सर्व समस्यांमधून या समितीने सुरवातीसाठी  ७ संकल्प मांडले,त्यांना हे माहिती आहे महाराष्ट्राच्या उपराजधानीत सगळं काही सुधारायला निदान १०० संकल्प करावे लागणार आहे मात्र,सळसळत्या रक्ताच्या तरुणाईने नागपूर शहरातील प्रभाग.क्र.२२ पुरती आपले ध्येय निश्‍चित केले असून, निनाद दीक्षित या अवघ्या २५ वर्षीय तरुणाला नगरसेवकाची उमेदवारी देण्याच्या निश्‍चय केला,आज या तरुणाईने बलाढ्य भाजपा समोर प्रभाग क्र.२२ मध्ये नवे आव्हान निर्माण करण्याचे धाडस दाखवले आहे.

निनाद या तरुणाईच्या चमूचे प्रतिनिधित्व करणारे फक्त एक नाव आहे.गरज आहे नागपूरातील सर्वच ३८ प्रभागात बलाढ्य भाजपच्या गेल्या पंधरा वर्षातील कारभाराला थेट आव्हान देण्या-या प्रयत्नांच्या शर्थीचे,अशी ही तरुणाई सांगते.
निनाद हा ज्या प्रभागातून येतो तो संघभूमीच्या सावलीतील प्रभाग असल्याने अतिशय महत्वाचा समजला जातो.आयचित मंदिर,संघ कार्यालय,जुनी मंगळवारी व नबाबपुरासारखा भाग या प्रभागात येतो.भाजपने यंदा या प्रभागात संपूर्ण नवे उमेदवार दिले असून जुन्या प्रमोद चिखले,वंदना यंगटवार,श्रद्धा पाठक व राजेश घोडपागे यांचे तिकीट कापले आहे.भाजपने कल्पक भानारकर,उमा देशमुख,कल्पना शर्मा व श्रीकांत आगलावे यांच्यासह सुबोध आचार्य या दोघांनाही बी-फॉर्म देण्याची किमया यंदा साधली आहे.२ जानेवरी रोजी या दोघांपैकी एकाला आपली उमेदवारी मागे घेणे अपरिहार्य ठरणार आहे.२०१७ मध्ये सुबोध आचार्य व श्रीकांत आगलावे या दोन्ही स्वयंसेवकामधील भांडणाचा लाभ मनोज चाफलेला मिळावा होता.दोघांची तिकीट कापून चापले यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती.
२०१७ नंतर आता नऊ वर्षात पूलाखालून ‘संपूर्ण’पाणी वाहून गेले आहे,तरी देखील भाजपवर पुन्हा तीच खेळी खेळण्याची वेळ आली आहे.दोघांना बी-फॉर्म देऊन भाजपने नेमके काय साधले?असा प्रश्‍न यामुळे उपस्थित होतो.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या प्रभागात सागर लाेखंडे,वंदना इंगोले,यामिनी कोंडापूरकरवार व नाना झोडे यांना उमेदवारी दिली आहे.निनाद व त्यांच्या चमूला भाजप व काँग्रेस या दोन्ही मातब्बर व राजकारणात मुरलेल्या पक्षासाेबत संवैधानिक लढा द्यायचा आहे.एकीकडे काँग्रेससारख्या बलाढ्य राजकीय पक्षावर पैसे घेऊन तिकीट वाटपाचे गंभीर आरोप होत असताना व भाजपसारख्या ‘पार्टी विथ डिफरेन्स’चे तकलादू बिरुद मिरविणा-या भाजपवर अनेक ठेकेदार,कंत्राटदार व लाभार्थ्यांना तिकीट वाटप केले असल्याचा आरोप होत असताना प्रभाग क्र. २२ मधून आपला उमेदवार उभा करुन ,या प्रभाग समितीने संपूर्ण प्रभागात नागपूरकरांना एक नवी व योग्य दिशा दाखवण्याचे काम केले असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाचे म्हणजे निनाद हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सचिव जयंत दीक्षित यांचे पूत्र आहे.त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेवारी मिळणे सहज शक्य होते मात्र,धक्कातंत्राचा अवलंब करीत निनाद याने भाजपकडे उमेदवारी मागितलीच नाही व फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला.त्याच्या तीन पिढ्या या स्वयंसेवक आहेत.त्यामुळेच,विचारधारेशी एकनिष्ठ राहून परिवर्तनाची क्षमता ठेवणा-या तरुणाईच्या या धाडसाकडे या प्रभागातील जनता औत्सुक्याने पाहत आहे.
खास ‘सत्ताधीश’सोबत बोलाना निनाद याने स्वयंसेवक असणे हा सर्व माध्यमांनी मुख्य मुद्दा बनवला आहे मात्र,निवडणूक लढण्यास संघाने मला सांगितले नाही,मी संघाच्या शाखेत मुख्य शिक्षक देखील राहीलो आहे मात्र,माझ्या निवडणूकीत संघाचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नसल्याचे सांगितले.महापालिकेची निवडणूक ही राष्ट्रीय विचारधारेची लढाई नसून जनतेशी निगडीत स्थानिक प्रश्‍नांची निवडणूक असते.परिणामी,माझी बांधिलकी कोणत्याही विचारधारेशी जोडण्या ऐवजी प्रभागातील मूलभूत समस्या सोडविण्याशी आहे,मी व आमची चमू हाच एक मुख्य मुद्दा घेऊन निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहे.
यासाठी आम्ही प्रभागातील विविध समस्यांचा सखोल अभ्यास केला.गंगा-जमुनासाख्या वसाहतीतील मुलांना शिक्षणासाठी एकमेव आधार असलेली मनपाची शाळा बंद करण्यात आली.याचा खूप वाईट परिणाम,प्रभागातील निर्धन लोकांवर झाला.त्यांच्याकडे खासगी शाळेत पाल्यांना शिकविण्यासाठी पैसे नाहीत,ते हतबल होऊन सत्ताधा-यांकडे पाहत आहेत.मनपात काँग्रेसची सत्ताही जनतेने बघितली व गेल्या पंधरा वर्षांत भाजपचा देखील कारभार बघितला मात्र,संपूर्ण नागपूरातच जुनाट मलवाहिन्यांचा प्रश्‍न विकट झालेला असल्याने.आमच्या चमूने त्यामुळेच प्रभागातील प्रमुख असलेले ९ प्रश्‍न सोडविण्याचा संकल्प प्रसिद्ध केला असल्याचे निनाद सांगतात.
आमच्या प्रभागात अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण केंद्र तयार करणे,प्रभागातील अखंड तुंबलेल्या जुन्या मलवाहिन्यांमध्ये सुधार करणे,स्पर्धा परिक्षा पुरक वाचनालय सुरु करने,वाहतूक कोंडीवर तोडगा काढणे,आमच्या प्रभागात अगदी १२ वीच्या विद्यार्थीही अम्ली पदार्थ नेमके कुठे मिळेल याची माहिती ठेवतो,त्यामुळेच सहा महिन्यांच्या आत प्रभागातील असामाजिक तत्वांवर वचक बसवणे, यावर आमचा मुख्य भर राहणार आहे.आमचा कोणताही ‘राजकीय आश्रय’गुन्हेगारांच्या पाठीशी असणार नाही!शाळांचे जे व्यवस्थापन पार कोलमडल्याने गरीबांच्या शिक्षणाचा हक्क जो हिरावला गेला आहे.त्या शैक्षणिक व्यवस्थेचे पुन्हा व्यवस्थापन करने,सर्वात महत्वाचे म्हणजे, प्रभागाशी संबंधित महानगरपालिका प्रशासनावर जनतेच्या फायद्यासाठी योग्य नियंत्रण ठेवणे हा आमचा संकल्प आहे.वयोवृद्धांसाठी मासिक आरोग्य तपासणी अगदी घरपोच करणे तसेच सीएसआरच्या माध्यमातूनसुद्धा प्रभागाचे ‘शाश्‍वत सौंदर्यीकरण’घडवून आनणे,असे सुरवातीचे ९ संकल्प निनाद सांगतात.
नागपूरकर जनतेने आता परंपरागत पक्ष नव्हे तर ‘योग्य‘ उमेदवारीवर मत द्यावे,असे आवाहन करीत १५ जानेवरी रोजी फॉरवर्ड ब्लॉकच्या ‘सिंह’या चिन्हाचे बटण दाबण्याचे आवाहन त्यांनी प्रभाग क्र.२२ च्या मतदारांना केले आहे तसेच फॉरवर्ड ब्लॉक हा आता ‘डाव्या’विचारधारेचा पक्ष राहीलेला नसून स्वामी विकेकानंद व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांवर चालणार पक्ष झाला असल्याची पुश्‍ती त्याने जोडली.
महाराष्ट्राच्या महानगरपालिकांची निवडणूक राजकीय सोयीसाठी चारच्या प्रभागाची केली गेली असून ७० ते ८० हजार मतदारांपर्यंत पोहोचणे कोणत्याही नवख्या उमेदवाराला अशक्य करण्यात आले आहे.पूर्वी वॉर्डानुसार निवडणूक होत असल्याने १० ते १५ हजार मतदारांपर्यंत उमेदवारांना सहज पोहोचणे शक्य होते मात्र,आमच्या प्रभाग क्र.२२ च्या समितीने हे आव्हान स्वीकारले असल्याचे  निनाद सांगतात.
निनाद याने समाज माध्यमातील एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलखतीमध्ये त्याच्यावर विविध प्रकारच्या दबावतंत्राचा कसा अवलंब केला जात आहे याचा खुलासा केला.माझ्या विरोधकांच्या मागे ‘शक्ती’ असली तरी माझ्या मागे ‘महाशक्ती’असल्याचे सूचक विधान केले.
अधिक माहितीसाठी निनाद यांचा संपर्क क्रमांक-९१७२२३१३३९
………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या