फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘यदा यदा ही धर्मस्य’चा अभिनव प्रयोग

‘यदा यदा ही धर्मस्य’चा अभिनव प्रयोग

Advertisements

डॉ.दत्ता हरकरे यांची अनोखी संकल्पना

२६ श्‍लोकांमधून संपूर्ण गीतासार

नागपूर,ता.६ डिसेंबर २०२२: गीता जयंतीच्या निमित्ताने योगी मनोहर ज्ञान प्रसार व कनक सूर मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यदा यदा ही धर्मस्य’हा गीतेवरील अभिनव एकपात्री प्रयोग शंकर नगर येथील बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

डॉ.दत्ता हरकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग आकारला आला.कुरुक्षेत्रावर भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहे या प्रसंगाने या प्रयोगाची सुरवात झाली. कृष्ण शब्दाची ‘ कर्षति इति कृष्ण’ही व्याख्या,व्यास नामाचा योग आशय,महाभारतातील गणेश कथा रहस्य,गीतेत सांगितलेला धर्म,मानवी वलयावर आधारित शास्त्रशुद्ध अशा चातुर्वण्य रचनेतील गूढ रहस्य,कर्मयोग व त्यातील निष्काम कर्माचे उदाहरण अशा अनेक मुद्यांची हरकरे यांनी प्रभावी मांडणी केली.

गीता हे जात पात,धर्म,पंथ या सर्व बंधना पलीकडील ग्रंथ असून, तो अखिल मानव समाजाच्या कल्याणासाठी रचण्यात आलेला विश्‍वदर्श ग्रंथ आहे, जो मानवाला कर्तव्य शिकवतो,यावर त्यांनी प्रकाश टाकला.

२६ श्‍लोकांच्या सहाय्याने संपूर्ण गीता मांडण्याचा या प्रयोगात बासरीचा ही सुंदर उपयोग करण्यात आला. प्रस्तुत प्रयोग योगीराज हरकरे यांच्या ‘गीता व्यास आशय‘ या ग्रंथावर आधारित होता.”

याप्रसंगी प्रकाश एदलाबादकर,विवेक तरासे,प्रभा देऊस्कर,मनीष उपाध्ये,रवि वाघमारे,हरी गुप्ता,मृणालिनी अपराजित प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक दिपक अमीन यांनी केले.प्रकाश योजना मिथून मोईत्रा यांची होती.ध्वनि केशवानंद तर रंगभूषा विजय धुळधुळे यांची होती.संहितालेखन दत्ता हरकरे यांचे होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या