फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमोहब्बत मेहबूब से करो या मुल्क से,टूटकर करो

मोहब्बत मेहबूब से करो या मुल्क से,टूटकर करो

Advertisements

कुमार विश्‍वासच्या सौंदर्य आणि देभभक्ती दोन्ही रसांना श्रोत्यांची उस्फूर्त दाद

खासदार सांस्कृतिक महोत्सवचा तिसरा दिवस कविंनी गाजवला

नागपूर,ता.१९ डिसेंबर २०२१:गम को अकेले ही पाला तुम्हारे बिना,दिल पर डाला है ताला तुम्हारे बिना,एक लडकी जो तुमसे मिली भी नही,मुझको उसने संभाला तुम्हारे बिना’मानवी मनातील प्रेमाची इतकी उत्कट भावना आपल्या ह्दयातील कवितेत व्यक्त करीत ‘नजर मिलाने के लिये एक पल छोटा होता है,देखने के लिये एक दिन छोटा होता है,पसंद करने के लिये एक साल छोटा होता है मगर भूलने के लिये पुरी जिंदगी छोटी होती है’अशी हा भाव, देशातील सुप्रसिद्ध कवि कुमार विश्‍वास यांनी आज खासदार सांस्कृतिक महोत्सवात नागपूरकरांसोबत शेअर केला. आपल्या नेहमीच्या शैलीत दिलखुलास टिका-टिपण्णीतून हास्य निर्माण करीत त्यांनी, आधी प्रेम-भावनेवर व त्यानंतर देशभक्तीवर अप्रतिम कविता सादर केली.कुमार विश्‍वास यांच्या दोन्ही ‘रसांना’उपस्थित हजारो श्रोत्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अखरेच्या षटकात कुमार विश्‍वास यांच्या दिलखेचक शब्दांनी चांगलेच चौकार आणि षटकार मारले.अगदी दिल्लीच्या राजकारणापासून तर महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप संबंधावर देखील दर्जेदार हास्य फूलवले.अगदी उद्याच्या बातम्यांची हेडलाईन कशी राहू शकेल यावर उपस्थित माध्यम प्रतिनिधींचीही त्यांनी चांगलीच खेचली.माध्यमांना खूश ठेवणे किती गरजेचे असून त्यांच्याच हातात ‘कुमार रहे फिके ना जम पाया रंग‘ किवा ‘खूप चढा कुमार का रंग,खुश हुये नागपूरकर’ हे हेडलाईन्स उद्या असू शकतात असे सांगून ’तूम झूठ को तयार लिखे दो अखबार तुम्हारा है,सृजन का बीज दूरमंदी मे जाया हो नही सकता’अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

वृत्तवाहिन्यांमधील चर्चेत काँग्रेस आणि भाजपवाल्यासोंबत ‘अँकर्स‘ किती व कसा भेदभाव करतात यावर देखील त्यांनी हळूवार चिमटा काढला आणि गडकरी आपले हास्य थांबवू शकले नाहीत.संबित पात्रा यांचा अँकर किती प्रेमाने जवाब घेते तर काँग्रेसच्या प्रतिनिधीवर ओरडून ‘आपको जवाब देना पडेगा’यावर त्यांनी चांगलीच कोटी केली.

’मुझे वाे मार कर खुश है कि सारा राज उस पर है,यकीनन कल है मेरा आज,बेशक आज उस पर है’या ओळी त्यांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणूकीशी जोडून ‘उसे जिद थी झूकाओ सर तभी दस्तार बख्शूंगा,मै अपना सर बचा लाया,महल और ताज उस पर है’हा शेर त्यांनी ऐकवला.

बाबा रामदेव हे इतके वर्ष सांगत होते काम करु नका फक्त योगा करा,देश योगा करु लागला आणि ते काम करु लागले,अशी कोटी त्यांनी केली.त्यांच्यासारखा दूसरा चतूर व्यवसायीक जगात नसल्याची कोटी करीत ‘त्यांनी गाय को बचाने के लिये ‘गानाईल’आणले,२५ लाख वर्ष जुने हिमलयातून ’मीठ’आणले मात्र मीठाच्या पाकीटावर एक्सपायरी डेट असते १६ एप्रिल!बाबा रामदेव हिमालयात लुंगी सावरत गेले कधी?असे हास्य त्यांनी फूलवले.

नागपूरात जिला बहीण मानले त्या ‘शिवाणी दाणी’ यांचे नाव घेऊन तिच्या कुटुंबियांसेबत गेल्या २० वर्षांपासूनचा घरोबा त्यांनी मंचावरुन सांगितला.‘पुरानी दोस्ती को इस नई ताकद से मत तोलो,ये संबंधो के तरजाई है, षडयंत्रो से मत खोलो,मेरे लहजे की छैनी से टूटी कूछ देवता जो कल,मेरे लब्जो पे मरते थे वा अब कहते है मत बोलो’या शायरीतून माणसाने आयुष्यात संबंधांना काळजीपूर्वक जपले पाहिजे,असा सल्ला ही त्यांनी देऊन टाकला.

राहूल गांधी वर हास्य निर्माण करीत ‘इस अधूरी जवानी का क्या फायदा’मोदींसाठी ’बिना कथानक कहानी का क्या फायदा’असे सांगून दोन पक्षावर हास्य केलं तर आपल्या पक्षासाठी देखील बोलताे असे सांगून ‘जिसमे धूलकर नजर भी ना पावन बनी,आंख मे ऐसे पानी का क्या फायदा’अश्‍या शब्दात त्यांनी ’आम आदमी पक्षावर देखील शब्दांचे बाण फेकलेे.

प्रेम म्हणा किवा भाजप-शिवसेना म्हणा ‘जख्म भर जायेंगे तुम मिलो तो सही,दिन संवर जायेंगे तुम मिलो तो सही,रास्ते मे खडे दो अधूरे सपन,(हटाओ नवाब मलिक इनको बीच में से)एक घर जायेंगे तूम मिलो तो सही’हा व्यंग त्यांनी सादर करुन श्रोत्यांची दाद मिळवली.

करोना वर भाष्य करताना ‘वक्त के कर छल का भरोसा नही,आज जी लो के कल का भरोसा नही,दे रहे वो अगले जनम की खबर,जिनको अगले ही पल का भरोसा नही’आज तुम्ही हजारोच्या संख्येत या महोत्सवात उपस्थित आहात याचे कारण रामटेकच्या दैवतेनी, एक दूस-यांची आत्मा बघण्याची आपल्याला संधी दिली असल्याची मार्मिक टिपण्णी त्यांनी केली.

जनरल रावत व त्यांच्यासोबत इतर १३ शहीदांच्या वीर मरणाला श्रद्धांजली देताना ‘कवि हे दहा हजार श्रोत्यांसमोर उत्सव साजरा करीत आहे कारण एक हजार सैनिक हे सियाचिन आणि कारगिलचे रक्षण करीत उभे आहेत’असे ते म्हणाले.’है नमन उनको कि जो इस देह का अमरत्व देकर,इस जगत मे शौर्य की कहानी हो गये’ही कविता त्यांनी सादर करुन श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले.जनरल रावत यांच्या दोन्ही मुलींच्या सहनशीलेचा सन्मान करताना‘बेटीया जो लोरियो मे भी प्रभाती सून रही थी,पिता तुम पर गर्व है,चुपचाप बोल आई’हे शब्द अर्पित केले.

नुकतेच बांगलादेशाच्या ५० व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवानिमित्त स्वर्गीय इंदिरा गांधी,जनरल माणिक शॉ यांना नमन करताना ‘ हमने लौटाये सिंकदर सर झूकाये मात खाये,हमसे भिडते है वो जिनका मन धरा से भर गया है,नरक मे पुछना अपने बुजुर्गो से कभी भी,उनके माथे पे हमारी ठोकरो का ही बयां है’ या शब्दात वीर रसाचा भाव गूंफला.

भारताचा चांद्रयान अभियान काही सेंकदाच्या फरकाने फसला यावर पाकिस्तानला खूप आनंद झाला मात्र ’झंडे पे चांद होना और बात है चांद पर झंडा होना औकात का काम है‘हमने राफेल लिया तो उन्होने फेल लिया,उनको फाइटर प्लेन उडाना तो दुश्‍मन देशो ने सिखा तो दिया,उतारना क्याे नही सिखा रहे हो?असे पाकिस्तानने विचारताच ’उडाओ,उतार हिंदूस्तान अपनेआप लेगा’अशी कोटी त्यांनी सादर केली.अभिनंदन याला वाघा बॉर्डर पर्यंत सोडताना पाकिस्तानच्या एक सनदी अधिकारी महिलेच्या चेह-यावर हास्य होते.है ताे ये दुश्‍मन देश का सिपाही मगर चल तो मै एक मर्द के बच्चे के साथ रही हूं’असा भाव तिच्या त्या हास्यात होता,अशी कोटी कुमार विश्‍वास यांनी केली.

शंभर वर्षांपूर्वी नागपूरच्या या भूमीने एक स्वप्न पाहिले होते(१९२५ मधील राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना)आज ते स्वप्न पूर्ण झाले,आज नागपूरची ही भूमी जे स्वप्न बघत आहे ते देखील पूर्ण होऊन भारत विश्‍वगुरु बनणार असल्याचे कुमार विश्‍वास यांनी सांगितले.

‘है नमन उनको के जिनको मृत्यू पाकर हूयी पावन,शिखर जिनके चरण छू कर अभिमानी हूये’या वीररस कवितेतून त्यांनी कवि संमेलनाचा समारोप केला.

यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरम चा जयघोष आसमंतात दुमदुमत होता.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या