

नागपूर, ता.१३ : ” निवडणुकीच्या काळात अफवांचा बाजार गरम होतो. आवश्यक नसलेल्या चर्चा आणि न घडलेल्या गोष्टी चर्चेत येतात, यामुळे वातावरण दूषित होते. दक्षिण नागपूर मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते परिपक्व आहेत, यामध्येही कसलेही मतभेद नाहीत. भारतीय जनता पक्षाने मोहन मते यांना दक्षिण नागपूरचे उमेदवारी दिली आहे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आहे. त्यामुळे मतदारांनी संभ्रमात न राहता मोहन मते यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे कळकळीचे आवाहन दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी जाहीर सभेत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माळगी नगर चौकात यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी कोहळे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सक्षम नेतृत्वाने आणि मार्गदर्शनात दक्षिण नागपूरचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली. या मतदारसंघात 600 कोटींची कामे भाजपाप्रणित शासनाने केली आहेत. त्यामुळे दक्षिण नागपूरच्या जनतेचा भारतीय जनता पार्टीवर शंभर टक्के विश्वास आहे, म्हणूनच मोहन मते यांच्या विजया बद्दल माझ्या मनात शंका नाही, मतदार संघातील विविध क्षेत्रातून मते यांना पाठिंबा मिळत आहे, यातूनच त्यांचा मोठा विजय साकारणार आहे.




आमचे चॅनल subscribe करा
