
‘अमॅझाेन’कडून मोदी सरकारला साढे आठ हजार कोटींची लाच!
नागपूर,ता. ५ ऑक्टोबर: हा देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून सध्या जात आहे,देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात तर सोडा मात्र जगातही कुठेही असे उदाहरण सापडणार नाही कि वर्षभरापासून समाजातील एखादा घटक हा सातत्याने आंदोलन करत आहे.गेल्या वर्षभरापासून देशातील शेतकरी वर्ग, तिन्ही कृषि कायदे रद्द करण्याच्या मागणीवरुन आंदोलन करत आहेत मात्र ‘भागवत’ पुरस्कृत मोदी सरकार ही क्रूर हिंसक झाली असून अलोकतांत्रिकरित्या रस्त्यावर आंदोलन करणा-या शेतक-यांच्या अंगावर तीन-तीन जीप चढवत आहेत, असा घणाघाती आरोप आज मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी प्रेस कल्ब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.
याप्रसंगी मंचावर आमदार विकास ठाकरे,काँग्रेस सरचिटणीस विशाल मुत्तेमवार,उमाकांत अग्निहोत्री,नगरसवेक संजय महाकाळकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर कठोर ताशेरे ओढत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर बोलतात ‘जैसे को तैसा’मिलेगा तर देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात‘सुधर जाओ नही तो दो मिनिट मे ठिक किये जाओगे!’यावर कहर म्हणजे अहिंसक आंदोलनकर्त्यांवर केंद्रिय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच जीप चढवतोय आणि ९ लोकांचे प्राण घेतो!
लखीमपूूर येथे योगी सरकार एका ही राजकीय पक्षाच्या नेत्यांना जाऊ देत नाही.काँग्रेस श्रेष्ठी प्रियंका गांधी यांना तर अटक करण्यात आली.प्रियंका गांधींसोबत जे घडले ते या देशात कधीही घडले नाही.काँग्रेसचे खासदार दिपेंद्र हूडा यांच्यासोबत देखील योगी सरकारने अमानवीय व्यवहार केला.काँग्रेसने देशात एवढी दशके शासन केले मात्र आपल्या विरोधकांसोबत कधीही असा दुर्व्यवहार केला नाही फक्त जिथे सांप्रदायिक दंग्यांची परिस्थिती उद् भवली त्याच वेळी कठोर प्रशासन राबवले.
मोदी सरकार तर देशात ‘नंगा नाच’करीत असल्याची जळजळीत टिका मोहन प्रकाश यांनी याप्रसंगी केली.तानाशाही तर एवढी की प्रियंका गांधींना मृतकांच्या कुटुंबियांशी भेटू देखील दिले जात नाही.त्या काही लखीमपूरला सभा-संमेलन घ्यायला जात नव्हत्या,असे ते म्हणाले.
‘अमॅझोन’कडून मोदी सरकारने खालली साढे आठ हजार कोटींची लाच!
नुकतेच नागपूरातील ‘चेंबर ऑफ कॉमर्स‘च्या बैठकीतून मी येथे आलो असल्याचे सांगत मोदींच्या कार्यकाळात लहान व्यापारी,उद्योजक हे पार उधवस्त झाले असल्याची टिका त्यांनी केली. देशातील लहान व्यापारी उधवस्त झाला पाहिजे हे तर मोदींचे ‘धोरण’आहे,अशी टिका त्यांनी केली.
परदेशात ४ ऑक्टोबरपासून ’ग्रेट इंडियन फेस्टिवल’सुरु आहे त्यात मोदी सरकारने ‘अमॅझोन’कडून ८,५८६ कोटींची लाच घेतल्याचे समाेर आले आहे.आता सरसंघचालक मोहन भागवतांनीच सांगावं हा पैसा कुठे गेला?१४ कोटी रोजगार आधीच मोदी खाऊन चुकले आहेत.भागवतांचे पंतप्रधान तर विनम्र स्वयंसेवक आहेत ना?मग देशात असं का घडतंय?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मी आज नागपूरमध्ये आहे त्यामुळेच भागवत यांचे नाव घेतोय कारण नागपूर ही संघभूमी आहे.भागवत तर राष्ट्रप्रेमी आहेत मग देशातील ४१ ऑर्डिनेन्स फॅक्टरी यांचे खासगीकरण का करण्यात आले?ज्या कारखान्यात देशातील सैन्यासाठी अवजारे,गोळा बारुद निर्माण होतो तेच कारखाने खासगी उद्योजकांच्या घश्यात देण्यात आले! या कारखान्यांवरुन देशाचा अभिमान असणारे ‘अशोक चक्र’खाली उतरवण्यात आले तेव्हा राष्ट्रभक्तांच्या डोळ्यात पाणी आले होते.या कारखान्यांची ६२ हजार एकर जमीन कोणाच्या घश्यात जाणार आहे?लाखो कर्मचारी कुठे जातील?असा सवाल त्यांनी केला.
मोदींची ‘नफेखोरी’इतक्या टोकाला पोहोचली की देशाच्या सैन्यालाही गोळा बारुदसाठी विदेशांचे मोहताज करीत आहे.देशातील सर्वात मोठी ‘एलआयसी’या विमा कंपनीचेही खासगीकरण केले जात आहे?भागवत आणि मोदींना कदाचित या विमा कंपनीची गरज नसेलही मात्र ती देशाची ‘जीवनवाहीनी’ आहे.या कपंनीचे देशात १२ लाख एजेंट आहेत,तेच मोदी सरकारला पैसे ही मिळवून देत आहेत मात्र तरीही मोदी सरकार ती कंपनी विकतेय,मोदी देशात ‘आर्थिक साम्राज्यवाद’निर्माण करीत असून मोदी हे जगाची ‘कठपुतली‘सरकार असल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी याप्रसंगी केला.
मुद्रा पोर्ट आणि अम्ली पदार्थांचे कनेक्शन-
अदानी यांच्या मुद्रा पोर्टवर किवा मुद्रा पोर्टजवळच वारंवार अम्ली पदार्थांचा हजारो कोटींचा साठा कसा सापडतो?अदानी यांना अटक करुन विचारपूस का नाही करण्यात आली?उलट अदानी यांना देशातील विमानतळ,रेल्वे मार्ग,रेल्वे स्टेशन्स,बंदरगाह सगळंच विकल्या जात आहे.पश्चिम गुजरात तर संपूर्णपणे अदानी यांना आधीच मोदी देऊन चुकले,तेथील हजिरा बंदरगाहवर देखील अम्ली पदार्थांचा साठा सापडला,आता अदानीला देशच विकल्या जात आहे का?
‘राजकीय गुलामगिरीशी एक वेळ लढा दिला जाऊ शकतो मात्र कोणत्याही देशाला आर्थिक गुलामगिरीविरुद्ध लढा देता येऊ शकत नाही’ असे सांगत देशात महागाई आणि बेरोजगारीने आधीच जनतेचे कंबरडे मोडले असल्याचे ते म्हणाले.अदानीचे १०० रुपयांचे ‘फॉरच्यून’खाद्य तेल बघता बघता आज जनतेला २५० रुपये लीटर घ्यावे लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महागाई ही कोणत्याही देशात दोन-तीन महिनेच राहत असते मात्र आपल्या देशात महागाई नाही तर ‘लृट’सुरु आहे आणि या लृटीत मोदी यांचाही वाटा असल्यामुळे देशातील महागाई ही कधीही कमी होणार नसल्याचा आरोप त्यांनी केला.असा वाटा नसता तर मोदींनी कधीचीच कारवाई केली असती,मार्ग काढला असता अशी पुश्ती ही त्यांनी जोडली.हीच लृट औषधांच्या बाबतीत ही सुरु असल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारचा एवढा वाईट कारभार सुरु आहे तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन त्या विरोधात आंदाेलन का करत नाही?असा प्रश्न विचारला असता राहूल गांधीची कॉलर का पकडली होती?असा प्रतिप्रश्न करत कारण ते जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते,शेतक-यांसाठी न्याय मागत होते,असे उत्तर त्यांनी दिले.
आमच्यावर आरोप होतो आम्ही काहीच नाही केले मात्र आम्ही काही केले जरी नसले तरी आम्ही देश नाही विकला,असे ते म्हणाले.यांनी तर नफा देणा-या कंपन्यां आणि आस्थापने विकण्याचा सपाटा लावला आहे.
२००८ साली आम्ही संपूर्ण जग मंदीच्या तडाख्यात सापडलं असताना ३५ हजार कोटींची मनरेगा योजना देशात राबवली.हा पैसा शेवटच्या घटकाच्या खिशात गेला,त्याने तो बाजारात खर्च केला यामुळे अर्थव्यवस्था उभी झाली,यातून रोजगार निर्माण झाले मात्र माेदी सरकारची अर्थनीती ही‘ एकाधिकारशाही’ची आणि फक्त आणि फक्त ‘लृटीची’ असल्याचा आरोप त्यांनी केला.
फक्त ५ मिनिटात संसदेत ते विधेयक पारित करुन घेतात,ही एकाधिकारशाही नाही तर काय आहे?विरोधी पक्ष,देशातील सुज्ञ वर्ग,न्यायपालिका कोणाशीही ते चर्चा करत नाहीत.
काँग्रेसच्याच काळात अदानी हा मोठा झाला,या प्रश्नावर बोलताना आम्ही अदानीला उद्योग धंदे सुरु करण्याची परवानगी दिली होती,त्यांना उद्योग धंदे विकले नाहीत,असे प्रतिउत्तर मोहन प्रकाश यांनी यावेळी दिले.
‘
एअर इंडिया’ आमच्या काळातही तोट्यात होती मात्र आज विदेशात जायचे असेल ,तिथून दहशतवाद्यांचे हस्तांतरण करायचे असेले,तर जेट,गो अेअर किवा इंडिगोची विमाने नाही जाणार तिथे सरकारी एअर इंडियाचीच विमाने जाऊ शकतात,आमच्यावर आरोप होतो आम्ही ’फेल’आहोत तर मोदी सरकार ही तर ‘महाफेल’असल्याची टिका त्यांनी केली.
सत्तेच येण्यापूर्वी माेदी आपल्या भाषणात सांगायचे आम्हाला सत्ता द्या बघा आम्ही कसा देश चालवतो?असा देश चालवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी होती का?अशी उपरोधिक टिका त्यांनी केली.
रमण कश्यप पत्रकाराची हत्याच!
लखीमपूर येथील घटनेचे वार्तांकन करीत असताना सुप्रसिद्ध पत्रकार रमण कश्यप याला आधी जीप खाली चिरडले गेले यानंतर त्याच्या खांद्यात गोळी घालण्यात आली.अजूनही त्याचे वडील मृतदेह घेऊन बसले आहेत की कोणीही या आणि मृतदेह बघून जा,कश्यप यांच्या खांद्यात बंदूकीची गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा दावा ते करतात आहेत.कश्यप हे काही लहान पत्रकार नव्हते, लखीमपूर जिल्ह्यात पत्रकार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव आहे मात्र मंत्री पुत्राने तीन गाड्यांच्या खाली आधी त्यांना व आंदोलनकर्त्यांना चिरडले यानंतर त्यांना गोळी देखील मारण्यात आली,असा आरोप मोहन प्रकाश यांनी केला.याप्रसंगी पत्रकारांना सावध करताना उद्या तुमचा ही क्रम लागू शकतो त्यामुळे सावध रहा असा सल्ला देत सध्या देशात खूपच भयावह परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
