Homeराजकारण'मोदीजी है तो मुमकीन है': देवेंद्र फडणवीस

‘मोदीजी है तो मुमकीन है’: देवेंद्र फडणवीस

मुंबईः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रथमच भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. एक मित्र आपल्याला सोडून गेला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या समर्थनातून मजबूत सरकार देणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘मोदीजी है तो मुमकीन है’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिली.

आपली बांधिलकी ही महाराष्ट्राच्या जनतेशी आहे. हे सरकार महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करेल. छत्रपची शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले. भाजप कार्यकर्त्यांमुळेच आज या पदावर आहे, असं सांगत फडणवीस यांनी भजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Latest बातम्या