फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशमोदींच्या वाराणसी मतदारसंघात पद्मभूषण सन्मानित कलावंताचे अश्रू!

मोदींच्या वाराणसी मतदारसंघात पद्मभूषण सन्मानित कलावंताचे अश्रू!

Advertisements

पंतप्रधानांनी साधला होता पत्नीच्या निधनामुळे नुकताच संवाद

खासगी रुग्णालयात मुलीचा करोनामुळे गेला प्राण

मृतक मुलीचा चेहरा बघण्यासाठी रुग्णालयाने मध्यरात्री घेतले २५ हजार रुपये!

वाराणसी,ता. २२ मे: पद्मभूषण पंडीत छन्नूलाल मिश्रा यांच्या मोठ्या मुलीला संगीता मिश्रा यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे वाराणसी येथील सुप्रसिद्ध डॉ.मनमाेहन श्‍याम यांच्या ‘मेडविन’ रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र २९ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला,सहा दिवस त्या मेडविनमध्ये भरती होत्या मात्र या महान कलावंतांना शेवटपर्यत आपल्या लाडक्या मुलीसोबत एकदाही बोलता आले नाही किवा भेटता आले नाही,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस आधीच म्हणजे २८ एप्रिल रोजी पंडीत छन्नूलाल मिश्रा यांच्यासोबत दूरध्वनिवरुन संवाद साधला होता,त्यांच्या पत्नीच्या मृत्यूप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या होत्या मात्र पंतप्रधानांना मिश्रा यांनी त्यांची मुलगी रुग्णालयात भरती असून एकदा तिच्यासोबत बोलायचे असल्याची विनंती ही केली मात्र मुजोर प्रशासन,भ्रष्ट नोकरशाही आणि सध्या हवेत असणारे व माणूसकी विसरलेले खासगी रुग्णालयांचे संचालक हे पंतप्रधानांनाही जुमानत नसल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे.

संपूर्ण वाराणसीत ज्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते त्या पं.छन्नूलाल मिश्रा यांच्यासोबतच मेडविन रुग्णालयाचे संचालक डॉ.मनमोहन श्‍याम यांनी अतिशय असंवेदनशील वर्तवणूक केली.ज्या विश्‍वासाने त्यांच्या रुग्णालयात त्यांनी आपला काळजाचा तुकडा बरे होण्यासाठी भरती केला,शेवटी तिचा मृतदेहच त्यांना बघता आला!

बेशरमीची सीमा तर डॉ.मनमोहन श्‍याम यांनी तेव्हा गाठली जेव्हा मृतक संगीता मिश्रा यांची बहीण नम्रता मिश्रा यांनी मध्यरात्री अडीच वाजता या रुग्णालयातून संगीता यांचा मृत्यू झाला असल्याचे कळल्यानंतर तिचा एकवेळा चेहरा बघण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली तेव्हा रॅप केलेली तिची बॉडी पुन्हा उघडून चेहरा बघण्यासाठीही डॉक्टरने वेळेवर २५ हजार रुपयांची मागणी केली!

एवढ्या रात्री नम्रता यांच्याकडे एवढी नगदी नसल्याचे त्यांनी डॉक्टरला सांगितले मात्र ‘भेड की खाल मे असणारा हा लांडगा डॉक्टर’याने पैसे कमावण्याची ही संधी ही नाही सोडली,अखेर पहाटे ५ वा.नम्रता यांना २५ हजार रुपयांचा बंदोबस्त करता आला,तेव्हा डॉ.श्‍याम यांनी मृतक संगीता हिचा चेहरा नम्रता यांना बघू दिला!
संगीता यांना या रुग्णालयात भरती करताच एक लाख रुपये त्यांनी रुग्णालयात जमा केले होते.पुन्हा डॉक्टरांनी ५० हजार रुपये भरण्यास सांगितले.लगेच संगीता यांना ४० हजार रुपयांचे इंजेक्शन लावायचे असल्याचे सांगून ४० हजार रुपयांची मागणी केली.डॉक्टर यांच्या पत्नीनेही संगीता यांना ३५ हजारांचे एक रेमडिस्विहर आणखी लावायचे असल्याचे सांगितले.असे करुन या रुग्णालयाने नम्रता यांच्याकडून अडीच लाख रुपये वसूल केले.

मात्र ६ दिवस उपचार करुन मृतदेहच सोपवला!वडीलांची केविलवाणी अवस्था बघता नम्रता यांनी ६ दिवसात डॉक्टर मनमोहन श्‍याम यांना वारंवार एकच विनंती केली,आयसीयूत असणारी त्यांची बहीण त्यांना लांबून तरी एकवेळा बघू द्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २८ एप्रिल रोजी फोन आल्यावर पंडीत छन्नूलाल यांनी पंतप्रधानांकडे देखील हीच विनंती केली त्यांना त्यांच्या मुलीला फक्त एकदा पाहायचे आहे.पंतप्रधानांनी त्यांना आश्‍वासन दिले व काळजी घेण्यास सांगितले.

यानंतर पंतप्रधान कार्यालयातून डीएमचा फोन आला.त्यांनी पं.मिश्रा यांच्या मुलीला आणखी चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करायचे आहे का?अशी विचारणा केली मात्र पं.मिश्रा यांनी आम्हाला त्याच रुग्णालयात मुलीला उपचारासाठी ठेवायचे आहे मात्र मला एक वेळा तिला बघायचे असल्याचे सांगितले.

पं.मिश्रा यांना त्यांच्या मुलीला इतरत्र हलविल्यास तिला त्रास होऊ शकतो,याची जाणीव होती.मात्र डॉ.श्‍याम यांनी अतिशय रागात पं.मिश्रा यांना फोन केला व त्यांनी डीएमकडे त्यांची तक्रार कशी काय केली?असा त्रागा केला.पं.मिश्रा यांनी मी कोणतीही तक्रार केली नसून मला माझ्या मुलीला एकदा बघायचे असल्याचे सांगितले.

डीएम यांनी स्वत: रात्री ९ वा. मोबाईलवर कॉन्फरेंसवर कॉल टाकला तेव्हा डॉ.श्‍याम यांनी वॉर्डात फार लांबून मुलीचा बेडवर झोपलेला पाठमोरा भाग पं.मिश्रा यांना दाखवला!यानंतर त्यांची मुलगी मृत झाल्याची सूचनाच मध्यरात्री मिश्रा यांना देण्यात आली!

आज हे पद्ममभूषण कलावंत घायाळ ह्दयाने व अश्रू भरल्या नजरेने ६ दिवसांचे सीसीटीव्ही फूटेजची मागणी करीत आहे मात्र लाखो रुपये उकळणा-या व सहा दिवस त्यांच्या मुलीवर उपचार केल्याचा दावा करणा-या डॉ.श्‍याम यांनी सीसीटीव्ही फूटेज देण्यास चक्क नकार दिला आहे!

या संपूर्ण घटनाक्रमावर आता वाराणसी मंडळाचे आयुक्त दिपक अग्रवाल यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.वरिष्ठ डॉक्टर्सचा समावेश असणा-या या समितीने जो अहवाल दिला तो….अपूर्ण होता!(याचा अर्थ बराचश्‍या गोष्टी सेटल झाल्या असाव्या)

त्यामुळे हा अहवाल दिपक अग्रवाल यांनी त्यांना पुन्हा परत पाठवला आहे.संपूर्ण पारदर्शितेने या घटनेचा तपास होईल,अशी प्रतिक्रिया माध्यमांकडे दिपक अग्रवाल यांनी जरी दिली असली तरी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात देशाचा अभिमान असणा-या एका पद्मभूषण कलावंतंासोबत करोना महामारीच्या काळात एका खासगी डॉक्टरचा व्यवहार हा देशातील नागरिकांनाच कोड्यात टाकणारा आहे.

ज्या विभूतीसोबत स्वत: पंतप्रधान संवाद साधतात,त्या विभूतीसोबत अतिशय उर्मट व्यवहार करण्याइतपत त्यांना खोलवर दू:खात ढकलण्याइतपत एका खासगी डॉक्टरची हिंमत वाढली आहे,सध्या देशात अनेक खासगी रुग्णालयेही याचा मार्गाने रुग्णांच्या हतबलतेचा फायदा उचलताना दिसत आहेत.यामागे भ्रष्ट प्रशासन,असंवेदनशील नोकरशाही व आपल्याच गर्वामध्ये ‘मदमस्त राजकारणी’ यांची अभ्रद युती कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

एका माध्यम प्रतिनिधीने या संपूर्ण घटनाक्रमावर डॉ.श्‍याम यांची मुलाखत घेतली असता अतिशय बेशरमपणे हसत-हसत त्यांनी संगीता यांचा मृत्य मध्यरात्री झाला नसल्याचे सांगितले!अशी ही महान डॉक्टर्सची जमात स्वत:च्या विरोधात पुरावा म्हणून सीसीटीव्ही फूटेज सांभाळून ठेवणार आहे का?एवढ्या सहजासहजी दिपक अग्रवाल यांच्या समितीला ते मिळणार आहेत का?

मोदींच्या वाराणसीत एका पद्मभूषण विभूतीचे अश्रूं अविरत वाहत राहीले पण मुर्दाड राजकारणी,गिधाडे झालेले डॉक्टर्स आणि भ्रष्ट प्रशासन यांच्या अभद्र युतीमुळे देशातील लाखो मृतकांसारखाच संगीता मिश्रा यांचाही ही असाच बळी गेला..एवढंच!

समाजवादी पक्ष्ाचे नेते अखिलेख यादव यांनी पं.छन्नूलाल मिश्रा यांच्या व्यथेने व व्याकूळतेने मला आतून हलवले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे…..!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या