फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमोकाट कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात कार्यवाही करा : संदीप जोशी

मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात कार्यवाही करा : संदीप जोशी

Advertisements

मनपा आयुक्तांकडे मागणी

 नागपूर, ता. २९ : नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय अत्यंत गंभीर आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा त्रास प्रत्येकच वस्तीत असून यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा स्थितीत कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात प्रशासनीक स्तरावर प्राधान्याने लक्ष घालून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना केली.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्यांसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करीत  संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांना सदर मागणी केली.

ते म्हणाले, नागपूर शहरामध्ये मनपा प्रशासनाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत, ही उत्तम बाब आहे. आपण स्वत: महापौर असताना शहरातील कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी ३ कोटी रुपयांचे प्रावधान केले होते. परंतू कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्यानंतरही दुर्दैवाने मनपा आयुक्तांनी नुकतेच मांडलेल्या अर्थसंकल्पात मात्र याबाबत काहीही तरतूद नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगत त्यांनी नाराजी वर्तविली.

आज नागपूर शहरात प्रत्येकच वस्तीत कुत्र्यांची संख्या वाढल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मा. उच्च न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे या कुत्र्यांना दुसरीकडे नेऊन सोडताही येत नाही व मारताही येत नाही. अशा स्थितीत त्यांची नसबंदी करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाने कार्यवाहीसंदर्भात लक्ष देणे आवश्यक आहे.

मनपा आयुक्तांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देउन लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांची नसबंदी कशी करता येईल याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा नेते माजी महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या