फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमेरे हात में तेरा हात हो......

मेरे हात में तेरा हात हो……

Advertisements

तीन अपयशी प्रेमाच्या बहाद्दराने चौथ्या प्रेयसीसोबत केला विवाह: अखेर आलिया भट व रणवीर कपूर विवाहबद्ध

नागपूर,ता.१४ एप्रिल २०२२:’प्रेम काय आहे माहिती नाही मला पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला…’आज १४ एप्रिल रोजी गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांच्या प्रेम भावनेत अखंड बुडालेले प्रेमवीर बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर व अभिनेत्री आलिया भट हे विवाहबद्ध झाले.आज विवाहाचे सर्व संस्कार पार पाडत असताना रणवीर कपूरच्या मनात या मराठी शायरीसारखेच भाव मनात उमडत असावे मात्र हे आपलं ‘खरं’ प्रेम मिळवण्याच्या प्रवासात जुने तीन अपयशी प्रेमाचे वेदनादायी टप्पे हे आयुष्याच्या स्मृतिपटलावरुन कसे पुसले जाणार?असा ही प्रश्‍न आज अनेक नेटकरींना पडला कारण आलिया ही रणवीरच्या जिवनात येण्यापूर्वी या बहाद्दराने एक नव्हे तर चक्क तीन-तीन सुंदर अभिनेत्रींना प्रेमासारख्या अलौकिक भावनेत गुंतवूण नंतर सर्वार्थाने नामानिराळा झाला याची प्रकर्षाने आठवणही आज नेटकरींना झाली.

तेरी बेरुखी को आज भी दिल से सलाम करते है हम,तेरी हर नाराजगी को आज भी चाहत का रंग समझते है हम,हमे मालूम है तुम भूला चूके हाे हमे,लेकिन…तेरे गम को सीने से लगाकर आज भी,खुदा से पहले तुझे याद करते है हम...’रक्ताळलेल्या ह्दयाच्या घावातले हे भाव कुण्या एकीच्या मनातले नाही तर आधी सोनम कपूर, मग दिपिका पादूकोण व नंतर कैटरिना कैफच्या मनातील भाव आहेत. एकट्या रणवीर कपूर नावाच्या फसव्या,संवेदनाशून्य व स्वार्थी प्रियकराने हा जीवघेणा घाव कधी एके काळी त्यांच्या ह्दयात घातला होता.चुलबुली,बालिश आलिया भटच्या या‘सांवरिया’ला स्त्री मनाच्या कोमल भावनांची,प्रेम,समर्पण,विश्‍वासाची चाड कधीही नव्हती व कधीही नसणार,असे अनेक नेटकरी आज व्यक्त झाले.जाे प्रेमासारख्या पवित्र नात्याला वारंवार धोका देऊ शकतो तो विवाह सारख्या पवित्र संस्काराच्या बंधनातही फार काळ अडकून राहणे शक्यच नसल्याचा संशय देखील सोशल मिडीयावर आज चांगलाच व्यक्त झाला.

७० च्या दशकातल्या पिढीचा आवडता नायक म्हणजे ऋषि कपूर.सहज,सुंदर अभिनय करणारा ऋषि हा माणूस म्हणून देखील तेवढाच उम्दा होता.नीतू सिंगसारख्या अभिनेत्रीसोबत पडद्यावरील लव स्टोरी साकारता साकारता रियल लाईफमध्ये देखील त्यांच्यात प्रेमाचा अंकूर रुजला.वडील कडक शिस्तीचे सुप्रसिद्ध निर्माते,दिग्दर्शक,अभिनेते राज कपूर यांची एकच अट होती लग्न एकाच अटीवर मान्य करेल लग्नानंतर कपूर खानदानीच्या मुली,सुना या पडद्यावर दिसणार नाहीत.नीतूचं जीवापाड प्रेम होतं चिंटूवर आणि तिने राज कपूर यांची अट स्वीकारली.कपूर खानदानीची सून झाल्यावर तिने रंगीत पडद्याला कायमचे टाटा बायबाय केले.

मात्र दुसरी सून बबीता कपूर ही नीतू सिंग यांच्यासारखी नव्हती.तिने बंडाचा झेंडा फडकवला.राज कपूर यांचा सर्वात मोठा मुलगा रंधीर कपूरची बबीता ही धर्मपत्नी.मात्र बबीतानी आपल्या दोन्ही मुली करिष्मा व करीना कपूर यांना चंदेरी दुनियेत आणले.त्या दोघीही चित्रपटसृष्टितील नावाजलेल्या अभिनेत्री ठरल्या.ऋषि व नीतू यांचा लाडका दिवटा पूत्र रणवीर याच्या वाट्याला ‘रॉक स्टार’सारखे काही यशस्वी चित्रपट आले तरी त्याची संपूर्ण कारकीर्द त्याच्या प्रेमप्रकरणानेच गाजली.

सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची कोमलशी,भाबडीशी कन्या सोनम कपूर व रणवीर कपूर यांचा पहीलाच चित्रपट ‘सांवरिया’हा संजय लीला भंसालीचा ९ नोव्हेंबर २००७ साली रिलिज झाला.या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी रणवीर कपूर व सोनम कपूर हे भावनिकरित्या एकमेकांच्या खूप जवळ आले होते.मात्र मूळातच नात्यातील प्रगल्भता समजण्या इतपत संस्कार नसल्याने कदाचित दिपीका पादूकोणसाठी रणवीरने सोनम कपूरला डीच केले,अर्थात धोका दिला.

प्रेमासारख्या नात्यात धोका मिळणं हा कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या जिवनातील सर्वाधिक खडतर काळ असतो.अर्थात सोनम कपूरने आपल्या कुटुंबियांच्या जिव्हाळ्याने हा काळ मागे सारला.मात्र दिपीका पादुकोण हिच्या नशीबी तेवढं ही आलं नाही.

कैटरिना कैफचे सौंदर्य बघताच या मजूनच्या औलादाने दिपीका हिच्या भावनांचाही विचार केला नाही.एका फूलावरुन दुस-या फूलाचा रसस्वाद घेणे एवढेच पुरुष म्हणून माणसाच्या जिवनाचे इप्सित आहे,असाच समज या मजनूचा असावा,कारण ‘आई’म्हणून व एक स्त्री म्हणून देखील नीतू सिंग यांनी आपल्या मुलाला अश्‍या नात्यांमधील गांर्भीय,सन्मान शिकविण्याचा प्रयत्नच केला नाही,उलट कैटरिना कैफसोबत लग्न करण्यात नीतू कपूरने शेवटपर्यंत नकारच दिला.

आज ज्या विवाहसोहळ्यात नीतू कपूर या खूप आनंदी होत्या,माझं व आलियाचं नातं हे माझ्या व सासूबाई कृष्णा कपूरसारखं असावं अशी ईच्छा व्यक्त करीत होत्या त्यांना एकदा ही दिपिका पादूकोणसारख्या संवेदनशील मनाच्या मुलीच्या वेदनांची आठवण होऊ नये?रणवीर कपूरने दिलेल्या धोक्यामुळे दिपीका पादूकाेणला काही काळ अम्ली पदार्थाचे सेवन करावे लागले अशी चर्चा बॉलिवूडमध्ये ही रंगली.

२०१६ मध्ये आलिया भटसोबत ‘ऐ दिल है मुश्‍कील’म्हणत हा दादला चक्क तिच्याच प्रेमात पडला.२०१८ मध्ये आलेला ‘संजू’‘बम्हास्त्र’‘बैजू बावरा’यासारख्या चित्रपटांनी ते आणखी जवळ आले.गेल्या पाच वर्षांपासून नात्यात असणा-या आलिया भट सोबत तरी हा तीन अपयशी प्रेमाचा बहाद्दर लग्न करतो का?की आणखी पाचवीच्या नादी लागतो याकडेच त्यांचे फैन्सचे लक्ष लागले होते,मात्र यावेळी रणवीरचा पाला निर्माता दिग्दर्शक भट यांच्यासोबत पडला होता,पाचवीच्या प्रेमात पडण्यापूर्वीच भटांनी रणवीरला ‘भटजींच्या’हवाली केले व लग्नगाठ बांधून घेतली.

सिनेसृष्टि असे ब्रेक-अपचे किस्से चवीने चखळले जात असतात मात्र इतरांसाठी तो चर्चेचा विषय असला तरी जिवंत संवेदना असणा-या मानवी मनासाठी तो धोका,ती ठेच,ते रक्तबंबाळ होणं फार-फार वेदनादायी काळ असतो,हे देखील तेवढंच खरं.

काळऔघात या जखमा भरत ही असतात,आयुष्य हे कोणासाठीही थांबत नसतं मात्र आठवणींचा कोपरा हा कधीही रिकामा होत नसतो.नकोश्‍या असल्या तरी त्या आठवणींचा फणा हा कधी-कधी फूत्कारतोच,मनाला डिवचतोच,मानवाची ही नैसर्गिक प्रवृत्तीच आहे आपल्यासोबत धोका करणारा,वाईट करणा-यांना मानवी मन कधीही विसरत नाही,या तिनही नट्या चंदेरी दुनियातील फार मोठ्या नट्या असल्या व आपाल्या संसारात आज आनंदी असल्या तरी आलिया भट व रणवीर कपूरच्या या विवाहसोहळ्याने आज त्यांच्या मनातील वेदनेचे तार नक्कीच छेडले असतील.

रणवीरसोबात एकेकाळी त्यांनी त्यांच्या संसाराची कल्पना केली होती मात्र प्रेम कोणावर करावं?याचा धडा आयुष्य या तिघींना जणू शिकवून गेला.जो एकीचा झाला नाही तो दुसरीचा काय होईल?एवढं साधं सोपं नात्याचं गणित  या तिघींनाही कळायला खूप वेदनादायी काळ जाऊ द्यावा लागला.

दिपिका पादूकोणसाठी सोनम कपूरला धोका दिला,कैटरिना कैफसाठी दिपिकाला धोक दिला,नादान कैटरिनाने या अश्‍या बे-भरवश्‍याच्या मजूनसाठी सलमान खानला सोडण्याची चूक केली.दिपिका पादुकाेणसाठी रणबिर सिंग(दिपीका पादुकोणचा अभिनेता असणारा आयुष्याचा जोडीदार)याने अनुष्का शर्माला धोका दिला.अखेर ती क्रिकेटर विराट कोहलीची बायको झाली व २०२० मध्ये एका गोंडस मुलीची आई झाली. सोनम कपूर आनंद आहूजासोबत लग्न करुन सुखी झाली,दिपिका पादुकोणला खूप जीव लावणारा नवरा रणबीर सिंगच्या रुपात मिळाला तर ‘उरी’चित्रपटातील ज्या नायकावर अवघ्या तरुणी फिदा झाल्या त्या विक्की कौशलसोबत नुकतेच कैटरिना कैफ हिने संसार थाटला.

थोडक्यात ‘फना’ चिटपत्रात सोनू निगम आपल्या मधाळ स्वरात जे गाणं म्हणतो ’मेरे हात मे तेरा हात हो,सारी जन्नते मेरे साथ हो,तू जो पास हो फिर क्या ये जहां तेरे प्यार मे हो जाऊं फना’हे गाण .नियतीमुळे या सर्वांच्या जिवनावर चपखल बसतं,असंच आता म्हणावं लागेल.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या