फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशनतर्फे ‘कळसूबाई’, ‘क्विरो’ चित्रपटांचे प्रदर्शन

मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशनतर्फे ‘कळसूबाई’, ‘क्विरो’ चित्रपटांचे प्रदर्शन

Advertisements

दिग्दर्शकांनी साधला संवाद

नागपूर,ता.१७ एप्रिल २०२२: मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन ,नागपूर द्वारे आज रविवार, १७ एप्रिल २०२२ रोजी युधजीत बासू दिग्दर्शीत ‘कळसूबाई’ आणि ‘क्विरो’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग सकाळी ११:३० वाजता विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिती, रामदासपेठ, नागपूर येथे युवा कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत रसिकतेने पार पडले.

 दिग्दर्शक रचित पांडे, एफटीआ, पुणे येथे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी, सिनेमॅटोग्राफर रचित पांडे यांच्यासोबत युधजीत बासू सुद्धा दूरदृश्य प्रणाली मार्फत  सामील झाले. दोन्ही चित्रपट त्यांच्यासाठी नवीन अनुभव देणारे होते.

‘कळसूबाई‘ हा एथनोग्राफिक लघुपट आहे. महादेव कोळी देवी ‘कळसू’, जिची कथा आणि ओळख त्या जमातींच्या स्त्रियांच्या चेतनेमध्ये आजही आहे. आणि

‘क्विरो’ हा डोंगराळ प्रदेश आणि धुक्याच्या भूभागावर बेतलेला चित्रपट आहे,खूप चिंतन केल्यावर एका दशकानंतर त्याच्या गावी परतलेल्या एका माणसाबद्दलचा हा चित्रपट आहे.

युधाजित बासूचे लघुपट आणि माहितीपटाच्या केंद्रस्थानी हवामान बदलाच्या थीम आणि यांमधील आधुनिक आणि आदिम द्विभाजन  हे आहेत. ‘कळसुबाई’ हा त्यांचा नवीनतम लघुपट. Visions du Reel येथे प्रीमियर झाला. स्वित्झर्लंड, जिथे त्याने ग्रँड ऑनलाइन पारितोषिक जिंकले आणि ओबरहॉसेनच्या इक्यूमेनिकल ज्युरीकडून विशेष उल्लेख देखील मिळवला. बासू “शब्द (ध्वनी)” या बंगाली कविता मासिकाचे संपादक आहेत  आणि त्यांनी कवितांवर पुस्तके प्रकाशित केली आहेत.

स्क्रीनिग नंतर चर्चेसाठी आणि प्रश्नोत्तरांसाठी चित्रपट निर्माता युधजीत बसू आणि रचित पांडे यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला ज्यामध्ये माहितीपट एक कला म्हणून, माहितीपट तयार करत असताना आलेले अनुभव, कलाकारांचं व्यक्तिगत आयुष्य आणि अश्या कितीतरी गोष्टीवर संवाद साधत असताना युवा कलाकार व युधजीत बसू यांमध्ये एक वैचारिक सृजन घडून आले.

दिग्दर्शकाने चित्रपट बनवण्याच्या त्याच्या प्रक्रियेबद्दल आणि त्याला कल्पना कशी आली याबद्दल चर्चा केली. ‘ते’ चौरस-गोलाकार स्वरूपात का चित्रित केले गेले आणि हा चित्रपट आख्यायिका देवी कळसूबाईवर का आधारित आहे याचे कारण. कळसूबाई, महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर. कळसूबाई ही देवी पेक्षा श्रद्धा जास्त आहे. बाहेरच्या व्यक्तीचा दृष्टीकोन चित्रपटातून स्पष्टपणे प्रस्थापित करण्यासाठी, कथनाकरिता ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष यांचा आवाजाची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली अस दिग्दर्शक म्हणाले .

 ‘क्विरो‘मध्ये, भारत-चीन सीमेवरील एका गावात चित्रित केलेला आहे .  संपूर्ण नेपाळी भाषेत चित्रित करण्यात आलेल्या लघुपटात एका दृश्यात कंदील मध्ये फसलेल्या माशीच्या चित्रीकरणाची चर्चा होत होती. जेव्हा आपण चित्रपट निर्मितीच्या  लोकप्रिय स्वरूपाने वेढलेले असतो तेव्हा अशे समकालीन चित्रपट पाहणे आणि त्याबद्दल बोलणे हा एक शैक्षणिक अनुभव देतो.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन नागपूर या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले होते .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या