फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमेयो रुग्णालयात चार महिलांची प्रसुतीनंतर प्रकृती गंभीर!

मेयो रुग्णालयात चार महिलांची प्रसुतीनंतर प्रकृती गंभीर!

Advertisements

भूलतज्ज्ञाने योग्य प्रमाणात भूलीचे इंजेक्शन न दिल्याचा नातेवाईकांचा आरोप

नागपूर,ता.१५ मार्च २०२४ : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय(आयजीएमसी)मध्ये काल १४ मार्च रोजी सकाळी एकूण नऊ महिला प्रसूत झाल्या.यातील चार महिलांची प्रकृती सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर गंभीर झाल्याने एकच खळबळ उडाली.बाळंत झालेल्या या महिलांना शस्त्रक्रियेनंतर एका तासातच उलटी झाली.यानंतर डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन लावले मात्र,यानंतर त्या महिला बेशुद्ध झाल्या.त्यांना झटके येऊ लागले.महिलांच्या प्रकृतीबाबत मेयो प्रशासान संबंधित नातेवाईकांना कोणतीही माहिती देत नसल्याने त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे झटके येणे सुरु होते.त्यातील दोन महिलांची प्रकृती आता स्थिर असून दोन महिलांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.यातील सबा शाहीद नावाच्या महीलेला ९ वर्षाची तसेच ६ वर्षाची असे दोन मुली आहेत.हे तिचे तिसरे अपत्य होते.या संबंधी तिच्या पतीसोबत संपर्क केला असता,आमच्या कुटूंबात मुलगा-मुलगी भेद कोणीही मानत नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे तिसरी ही मुलगी झाल्याने मानसिक धक्का बसला,इत्यादी सांगितली जाणारी कारणे ही डॉक्टर्स लोकांची बहाणेबाजी असल्याचा आरोप त्यांनी केला.माझ्या पत्नीने नवजात मुलीचा दूध देखील पाजले मात्र,एका तासातच तिला उलटी झाली.यानंतर डॉक्टरने तिला एक इंजेक्शन लावले,त्यामुळे ती बेशुद्ध झाली,इतकंच नव्हे तर तिला झटके येऊ लागले,असे शाहीद यांनी सांगितले.ते रेल्वेच्या पार्सल विभागात हमालीचे काम करतात.अद्याप पत्नीला शुद्ध आली नसल्याचे ते सांगतात.तिने डोळे देखील उघडले नाही,ती बोलत नाही,बघत देखील नाही,तिला झटके येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अशीच अवस्था रागिनी अंकूश नागपूरे हिची देखील आहे.याशिवाय दोन अन्य बाळंतीनींची देखील अशीच अवस्था आहे.या बाबत मेयो रुग्णालयातील जवाबदार डॉक्टर्सकडून कोणतीही योग्य माहिती कुटूंबियांना दिली जात नसल्याने त्यांनी नागपूर शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याशी संपर्क साधला.वसीम खान यांनी काल रात्री ११ ते १२ वाजता दरम्यान त्या महिला रुग्णांचा सी.टी.स्कॅन करण्यास प्रशासनाला बाध्य केले.मात्र,सी.टी.स्कॅनचा अहवाल त्या चार ही महिलांचा नॉर्मल आला.

यानंतर त्या चार ही महिलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले.वसीम खान यांनी संबंधित डॉक्‌टरांना महिला रुग्णांच्या गंभीर प्रकृतीचे कारण विचारले असता, त्यांनी वेगळीच कारणे सांगितली.एका महिलेला तिसरीही मुलगीच झाली तर एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला,एकीला आधी पासूनच झटके येत असल्याचे तर एका महिलेला आधीपासूनच गंभीर आजार असल्याचे त्यांनी सांगितले.उद्यापर्यंत चार ही महिलांची प्रकृती सामान्य होईल असे डॉक्टरांनी सांगितले व निघून गेले.

दूस-या दिवशी सकाळी मेयो रुग्णालयातील डीन,न्यूरोसर्जन व वरिष्ठ डॉक्टरांच्या चमूने या चार ही महिला रुग्णांना तपासले व पुन्हा एमआयआर केला मात्र,तरी देखील त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.वसीम खान यांच्या शिष्टमंडळाने मेयोचे डीन डॉ.रवी चव्हाण यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली व या मागील कारण विचारले असता,१४ तारखेला सकाळी ९ महिलांची प्रसुती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.त्यातील चार महिलांची प्रकृती गंभीर झाली होती.आता त्यातील दोन महिलांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे डॉ.रवी चव्हाण यांनी सांगितले.सबा तसेच रागिनीला बाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासले असून त्यांच्याही रिपोर्टस नॉर्मल असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्ण महिलांना भूलतज्ज्ञाने ओवर डोस दिले का?किवा चुकीचे इंजेक्शन लावण्यात आले का?असा प्रश्‍न केला असता,रुग्ण महिलांच्या संपूर्ण औषधी बदलण्यात आल्याचे डॉ.रवी यांनी सांगितले.वैद्यकीय उपचार करताना कोणीही हयगय केली गेली असेल तर त्यांच्यावर निश्‍चितच कारवाई केली जाईल,असे आश्‍वासन त्यांनी दिले.दोन्ही रुग्ण महिलांवर आमचे लक्ष असून त्यांची देखील प्रकृती हळूहळू नॉर्मल होईल,असे आश्‍वासन डॉ.रवी यांनी दिले.

उच्च रक्तदाबामुळे प्रसुतीवर परिणाम: डॉ.चैतन्य शेंबेकर(सुप्रसिद्ध प्रसुतीतज्ज्ञ)

‘सत्ताधीश’ने नागपूरातील सुप्रसिद्ध प्रसुतीतज्ज्ञ डॉ.चैतन्य शेंबेकर यांच्याकडून प्रसुत झालेल्या महिलांच्या गंभीर प्रकृतीची कारणमीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,महिलांना उच्च रक्तदाब असल्यास प्रसुतीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेचे नेमके कारण सांगू शकणार नाही मात्र,प्रसुतीसाठी रुग्ण जेव्हा भर्ती होतात तेव्हा बहूतांश वेळा रुग्ण महिला ही उच्च रक्तदाबाने पिडीत असते.गरोदर महिलांसाठी उच्च रक्तदाब हा अत्यंत नुकसानकारक असून, या मुळे हार्मोन्सचे ताळतंत्र बिघडत असतं.बांळंतीण आणि बाळ यांचं स्वास्थ हे संपूर्णपणे हार्मोन्सवरच अवलंबून असतं.त्यात बिघाड झाल्यास त्याचे काही दुष्परिणाम बाळ तसेच बाळंतीणीच्या प्रकृतीवर होत असतो.या घटनेत चुकीची औषधे किवा चुकीचे इंजेक्शन दिले,ही कारणे नसावी.नातेवाईकांना मात्र असंच वाटतं.प्रसुतीनंतर उलटी झाल्यावर त्यांना जर पेरिडॉनचे इंजेक्शन देण्यात आले असेल तर त्याचा काहीही संबंध बेशुद्ध होणे,झटके येणे याच्याशी नसतो.
……………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या