फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमेट्रो अधिकाऱ्यांना भीती प्रकल्प बंद होण्याची कि भ्रष्टाचाराची? प्रशांत पवार यांचा आरोप

मेट्रो अधिकाऱ्यांना भीती प्रकल्प बंद होण्याची कि भ्रष्टाचाराची? प्रशांत पवार यांचा आरोप

Advertisements

मेट्रो प्रकल्पावर श्‍वेतत्रिका काढण्याची केली मागणी

नागपूर: महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच एका वृत्तपत्राताला माहिती पुरवली की नव्या सत्तारुढ सरकारने नागपूरचा मेट्रो प्रकल्प बंद करण्याचा घाट घातला आहे. मूळात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्‍वास नाही हे या विधानातून सिद्ध होते किवा महामेट्रोतील ‘महाघोटाला’व भ्रष्टाचार बाहेर पडेल अशी त्यांना भीती आहे?असा आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्र परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना त्यांनी महामेट्रो प्रकल्पावर श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. एक नागपूरकर म्हणून मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र या प्रकल्पावर शासनाने श्‍वेत पत्रिका काढून प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी यांची चौकशी करावी, भ्रष्टाचारात लिप्त असणारे अधिकारी यांना मेट्रो प्रकल्पापासून दूर करण्याची मागणी त्यांनी केली. राजकीय लोकांनी सरकारवर अविश्‍वास दाखवला तर चालतो मात्र येथे तर सरकारच्या अधीन चालणार्या मेट्रो प्रकल्पातील अधिकारीच सरकारवर असा अविश्‍वास दाखवत असतील तर निश्‍चितच ते आपला भ्रष्टाचार कुठेतरी लपवत असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला. अश्‍या अधिकाऱ्यांवर ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पश्‍चिम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याला लाभले असताना त्यांनी नागपूरचे प्रकल्प बंद केले नाहीत अशी पुश्‍तीही त्यांनी जोडली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मेट्रोच्या अधिकार्यांचे असे वक्तव्य हे अतिशय दूर्देवी असल्याचे ते म्हणाले.

आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागतो तेव्हा अनेक कारणे सांगून आम्हाला माहिती दिली जात नाही मात्र वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला मेट्रोचे अधिकारी हा प्रकल्प बंद होणार अशी माहिती कशी पुरवतात?असा सवाल त्यांनी केला.दोन दिवसांपूर्वीच मेट्रोचा सन २०१८-१९ चा वार्षिक अहवाल लोकसभेपुढे मांडायचा असल्यामुळे तो बेवसाईटवर प्रकाशित केला नाही मात्र नागपूरच्या एका मोठ्या वृत्तपत्राने तो प्रकाशित केला.याचा अर्थ महामेट्राेचे अधिकारीच मेट्रोचे गुप्त दस्तावेज बाहेर देत असल्याचा आरोप त्यांनी केला. अश्‍या अधिकार्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आम्ही ऑडीट बोर्डच्या पत्राच्या छायांकित प्रत मागितल्या,टेंडरची कागदपत्रे मागितली मात्र लाखो पाने असल्याचे कारण सांगत आम्हाला ती देण्यात आली नाही. आम्हाला व्ही.सी.ए.मैदानाविषयीची ३० हजार पानांची माहिती आम्ही पैसे भरल्यावर पुरविण्यात आली होती मग मेट्रोकडे आम्ही लाखो पानांचे पैसे भरण्यास तयार असलो तरी माहिती पुरविण्यात टाळाटाळ केली जात आहे याचा अर्थ भ्रष्टाचाराचे पाणी कुठे तरी मुरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

५ डी बिम तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे महामेट्रोचे जवळपास १७ ते २० टक्के पैशांची बचत झाली असा ‘जयघोष’ महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्ष्ीत करीत असतात. प्रकल्पाचा पूर्ण खर्च ८६८० कोटी असल्याने यात १७ टक्के खर्चात बचत झाली याशिवाय सर्व स्टेशनची लांबी कमी झाल्यामुळे स्टेशन बांधकामाचा खर्च व रेल्वे गाडी यामध्ये सुमारे ५०० कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा केला जात आहे. जर एवढी बचत झाली आहे आणि जर फक्त ३१७ कोटी रुपयांचे काम बाकी असल्याचे ते सांगतात तर शासनाकडून अतिरिक्त निधीची महामेट्रोला गरजच काय?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मूळात महामेट्रो रेल्वे प्रकल्पाची किंमत सुमारे ४००० कोटी रुपयांनी वाढली आहे. श्‍वतेपत्रिका काढल्यास जनतेसमोर यामागील वास्तव येईल. मूळात २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणारच नाही उलट आणखी पाच वर्षे तरी हा प्रकल्प असाच रखडत राहणार असल्याचे पवार हे म्हणाले.

नागपूरच्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून सीएमआरएसची परवानगी नसताना रात्री देखील मेट्रो चालवली जात असल्याचे ते म्हणाले.काही अपघात झाल्यास सदर पोलिस स्टेशनवर ही जबाबदारी राहील. शहरातील इतर वाहने चालान करताना पोलिस हे नियम सांगतात मात्र महामेट्रोसारखी ट्रेन ही परवानगी नसतानासुद्धा रात्रीच्या अंधारात चालतेय यावर ते कोणतीच कारवाई करीत नसल्याचे ते म्हणाले.यामुळेच सरकारला आमची विनंती आहे त्यांनी नागपूर महामेट्रोचे सगळे अहवाल तपासून कारवाई करावी अन्यथा हे सरकारसुद्धा भ्रष्टाचारी यांच्यासोबतच असल्याचे आम्ही गृहीत धरु असे त्यांनी सांगितले.

पत्र परिषदेला ‘जय जवान जय किसान’संघटनेचे सचिव अरुण बनकर,विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, रविंद्र ईटकेलवार, रविशंकर मांडवकर, निलिकेश कोल्हे, उत्तम सुळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकमान्य ते सीताबर्डी लाईन बंद करण्याच्या विरोधात उद्या करणार आंदोलन-
लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यानची मेट्रो बंद करण्यात आली असून या विरोधात उद्या शनिवार दि.७ डिसेंबर रोजी दूपारी ३ वा. लोकमान्य नगर येथील मेट्रो स्टेशनवर ‘जय जवान जय किसान’संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी दिली. याच स्टेशनवरुन मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीव धोक्यात घालून निवडणूकीपूर्वी ७ सप्टेंबर रोजी करण्यात येणार होते मात्र संघटनेने पीएमओ कार्यालयासोबत सातत्याने केलेल्या पत्र-व्यवहारामुळे हा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता याकडे पवार यांनी लक्ष् वेधले. पंतप्रधान यांच्या जीव धोक्यात घालणारे दोषी अधिकारी यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या