

अर्धवट प्रकल्पांचे लोकार्पण मेट्रोची नव्हे पंतप्रधानांची थट्टा: न्यायालयात मागणार दाद
नागपूर: आज जगात सर्वाधिक कोणाच्या जीवाला धोका असेल तर तो आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, असे असताना महामेट्राने सरकार व प्रशासनासोबत मिलीभगत करुन अर्धवट कामांचे लोकार्पण करण्यासाठी येत्या ७ ता.ला नरेंद्र मोदी यांना महामेट्रोने आमंत्रित केले आहे मात्र अद्याप रिच-१ चीच कामे पूर्ण झाली नसताना रिच-२ अंतर्गत पुन्हा त्याच अर्धवट कामांच्या लोकार्पणासाठी तसेच लोकमान्य नगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनपर्यंत पंतप्रधानांची ‘जॉय राईड’ आयोजित करुन महामेट्राेने पंतप्रधानांचा जीव अक्ष् रश: धोक्यात आणला असल्याचा आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी केला. गुरुवार दि. ५ ऑगस्ट रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामेट्रोला अद्याप पंतप्रधान कार्यालयाची यासाठी परवानगी देखील मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान यांच्या जीव धोक्यात घालणारी मेट्रो राईड रद्द करावी यासाठी शुक्रवारी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मूळात मेट्रो हा राजकीय पक्ष् आहे का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दर वेळी निवडणूकीच्या आधीच पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो आपल्या अर्धवट कामांचे लोकार्पण मग का करुन घेते? जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हाच मेट्रोचा लोकार्पण सोहळा कसा होतो?निवडणूकीच्या तोंडावरच मेट्रोची लगबग ही समजण्यापलीकडील असल्याचे ते म्हणाले,या वेळी तर मेट्रोने चक्क देशाचे पंतप्रधान यांचाच जीव धोक्यात घातला असल्याचे ते म्हणाले. ७ मार्च २०१९ रोजी पंतप्रधानांनी सीताबर्डी ते खापरी या मेट्रो रेल्वेचे प्रवाश्यांसाठीचे उद् घाटन व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले होते. खापरी ते सीताबर्डी मार्गावर एकूण ११ स्टेशन येतात.यातील फक्त ५ स्टेशन हे पूर्ण झाले असून याच मार्गावरील पुन्हा ५ स्टेशनचे लोकार्पण करण्यासाठी मेट्रोने आता विधान सभेच्या निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधानांना चक्क नागपूरात बोलावून त्यांचा जीव धोक्यात घातला. ७ मार्च २०१९ नंतर मग पंतप्रधानांनी अाधी लोकार्पण केलेल्या स्टेशनचे बांधकाम अद्याप पूर्ण का झाले नाही?असा प्रश्न त्यांनी विचारला. पंतप्रधानसारख्या महान व्यक्तींकडून अर्धवट कामांचे लोकार्पण ही‘ मेट्रोची नव्हे तर पंतप्रधानांची थट्टा’ असल्याचा त्यांनी केला.
मूळात पंतप्रधान कार्यालयातून त्यांच्या रितसर दौऱ्याची परवानगी तसेच तपशीलच मेट्रोला मिळाला नसताना मेट्रोने दहा दिवसांपूर्वीपासूनच प्रसार माध्यमांमध्ये पंतप्रधान दौर्याची माहिती कशी दिली? पंतप्रधानांच्या जीवासोबतच प्रवाश्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्ष्ीत यांना परवानगी कोणी दिली? यात महाराष्ट्र सरकारचा काही हेतू दडला आहे का? पंतप्रधान कार्यालयात सुरक्ष्तितेबाबतचे खोटे दस्तावेज पाठविण्यात आले का?या बाबतची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केल्याची माहिती पवार यांनी याप्रसंगी दिली.पंतप्रधानांच्या दौर्याबाबत सर्व वृत्तपत्रांच्या आधारावर संकलित माहिती काल सायंकाळी पोलिस आयुक्तांकडे सोपविली असून ही सर्व माहिती पंतप्रधान कार्यालयाला त्वरित पाठवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले अाहे. सुभाष नगर ते सीताबर्डी हा मेट्रो मार्ग पंतप्रधानांच्या जीवितासाठी सर्वाधिक धोक्याचे असल्याचे ते म्हणाले. एखाद्या विद्यार्थी पहिल्या वर्गात असताना पाचव्या वर्गाच्या सर्टीफिकेटसाठी बाप हा लाईनमध्ये लागला असल्याचे चित्र असल्याची कोटी त्यांनी केली. मेट्रोचे काम याच धर्तीवरील आहे. मूळात मेट्रो रेलच्या नियम २२ प्रमाणे सीएमआरएसचे पत्र मिळाल्यानंतर त्याचे पब्लीक पब्लीकेशन केल्यानंतरच मेट्रो रेल्वेची सेवा सुरु करता येते, या संपूर्ण प्रणालीत महामेट्रोने नियम २२ हाच पूर्णपणे धाब्यावर बसविला असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला. महामेट्रोने तर अद्याप ओएई लाईनचे देखील लोकांच्या माहितीसाठी पब्लिक पब्लिकेशन केले नाही,रिच-१ चे नाही,रिच-२ चे नाही,या सर्व बाबी घेऊन उद्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. याच नियमाप्रमाणे महामेट्रोने केंद्र शासनाला अहवाल पाठवायचा होता मात्र तो पाठवला आहे की नाही,हा पुढे संशोधनाचा विषय ठरणार आहे. वरील सर्व बाबींच्या आधारावर पंतप्रधान कार्यालय ही जॉय राईड अजूनही रद्द करु शकतात असे ते म्हणाले.
सीएमआरएसचे मुख्य गर्ग हे दबावाखाली काम करतात-
सीएमआरएसची चमू सध्या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर तीन दिवसापासून नागपूरात आहे मात्र सीएमअारएसचे मुख्य गर्ग हे एकेकाळी महामेट्रोमध्येच पदाधिकारी असल्यामुळे ब्रिजेश दीक्ष्ीत यांच्या दबावाखाली काम करण्याची शक्यता पवार यांनी यावेळी व्यक्त केली. ‘बॉस ईज आॅल्वेज बॉस’एकेकाळी ब्रिजेश दीक्ष्ीत हे गर्ग यांचे बॉसस होते त्यामुळे ते दीक्ष्ीत यांना अनुकूलच अहवाल देत असावे, गर्ग यांची नियुक्तीच अनुकूल अहवाल देण्यासाठीच केली असावी,असा सरळ सरळ आरोप प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत केला. प्रत्येक अहवालात सीएमआरस ही महामेट्रोने अग्निशमन विभागाची परवागी घ्यावी,सुरेक्ष्ेचे नियम पाळावे असा अहवाल देते. या अटींची देखील पूर्तता केल्याशिवास मेट्रो रेल सुरु करता येत नाही,मात्र महामेट्रोने सगळे नियम सरकारच्या अनुकंपेने धाब्यावर बसवले आहेत,असा आरोप त्यांनी केला. दरवेळी गर्ग यांना आम्हाला भेटू दिले जात नाही. पंतप्रधान कार्यालयाची महामेट्रो कशी दिशाभूल करतेय याबाबत जय जवान जय किसान संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला मेल पाठविला असल्याची माहिती पवार यांनी दिली. पंतप्रधानांच्या अधिकृत दौऱ्याबाबत अद्याप पब्लिक नोटीस देखील प्रसिद्ध केली नाही पंतप्रधानांचा दौरा रद्द करावा यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
