फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमुलाखतीद्वारे गडकरी उलगडणार उद्योग यशाचा मंत्र

मुलाखतीद्वारे गडकरी उलगडणार उद्योग यशाचा मंत्र

Advertisements
रविवारी ‘सॅटर्डे क्लबच्या’ रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त व्यावसायिकांची एकदिवसीय परिषद

नागपूर, दि. ९ जानेवारी : प्रगतीशील व्यावसायिकांसाठी सतत नव्या संधी निर्माण करणारा, एकमेकांना साथ देत सर्वांगीण श्रीमंतीकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) आपल्या यशस्वी वाटचालीची २५ वर्षे पूर्ण करत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, व्यावसायिक आणि उद्योजकांना दिशादर्शक आणि प्रेरक ठरणारी एक दिवसीय भव्य परिषद सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या नागपूर चॅप्टर द्वारे रविवार, १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.पासून दिवसभर, हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित घेणार असून याप्रसंगी उद्योग यशाचे मंत्र गडकरी मुलाखतीतून उलगडणार असल्याची माहिती आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सॅटर्डे क्लबचे उप-महासचिव सुभाष गोरे यांनी दिली.

यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष बागेश महाजन, सचिव अश्विनी ऋषि, कोषाध्यक्ष शरद अरसडे, कोअर टीमचे सदस्य अमित बोरकर उपस्थित होते. यावेळी माहिती देताना सुभाष गोरे यांनी संगितले की, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष  अशोक दुगाडे, मॅनेजिंग ट्रस्टी रवींद्र प्रभुदेसाई व श्री. अजित मराठे,  सुहास फडणीस (महासचिव) व सुभाष गोरे (उप-महासचिव), तसेच इतर मान्यवर मंडळी यांनीही उपस्थित राहून व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
सॅटर्डे क्लबचा दृष्टीकोन आणि उद्देश विशद करताना सुभाष गोरे म्हणाले की,स्व. माधवराव भिडे (प्रकाशमान प्रेरणा) यांनी २००० साली मुंबई येथे स्थापन केलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे आज देशभरात ११७ हून अधिक चॅप्टर्स आणि ५,५०० पेक्षा जास्त सभासद आहेत. जागतिक स्तरावर व्यावसायिकांच्या संपर्क-जाळ्यातून आजवर १५,००० कोटींहून अधिक उलाढाल साध्य झाली आहे. हा क्लब केवळ व्यावसायिक नेटवर्किंगपुरता मर्यादित न राहता, प्रत्येक सदस्याचा सर्वांगीण विकास आणि सकारात्मक वृत्ती जोपासणारा कुटुंबभाव जोपासतो. या २५ वर्षांच्या प्रवासात क्लबद्वारे उद्योगबोध, उद्योगकुंभ, उद्योगरत्न, इंजिनिअर्स डे यांसारख्या अनेक उपक्रमांची सुरुवात झाली असून, नुकतेच एक भव्य कॉर्पोरेट कार्यालय वागळे इस्टेट, ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे.
या परिषदेद्वारे नवउद्योजक, लघु-मध्यम उद्योगधंदे तसेच मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी अत्याधुनिक मार्गदर्शन मिळणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून बिझनेस ब्रँडिंग, अर्थसहाय्य, मार्केट अॅक्सेस, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन इत्यादी विषयांवर चर्चा केली जाईल. स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी उपक्रमात सहभागी होऊन व्यवसाय उभारणी, विस्तार आणि नेटवर्किंगच्या नव्या संधी शोधू इच्छिणाऱ्या सर्व उद्योजक, इच्छुक व्यावसायिक व मार्गदर्शकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष बागेश महाजन यांनी यावेळी केले.
परिषदेतील विशेष सत्रे-
१)  नितीन गडकरी यांचे उद्योग/व्यवसाय वृद्धीकरणावरील मुलाखत
२) Building Sustainable & Scalable Businesses – कुंदन गुरव (बिझनेस कोच, मुंबई)
३) कार्बन क्रेडिटची निर्मिती आणि व्यवसाय – रूपेश पाटील लडे (चेयरमन, सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कं. अकोला)
४) MSME उद्योजकांसाठी आधार आधारित नोंदणी सुविधा व Lean Manufacturing Tools
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
• बागेश महाजन (अध्यक्ष) – ९३७३११०५११
• अश्विनी ऋषि (सचिव) – ९४२०२११६०९
• शरद अरसडे (कोशाध्यक्ष) – ९६६५६९७६७६
वेळापत्रक व तपशील-
• दिनांक: रविवार, १२ जानेवारी २०२५
• वेळ: सकाळी ९:०० ते सायं. ५:००
• ठिकाण: हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ, नागपूर
………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या