
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ९ संघटनांचे समर्थन
नागपूर १७ ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मिळालेल्या उमेदवारीमुळे दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यासह शहरातील ९ सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना समर्थन दर्शविले आहे. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून आपल्या संघटनेशी जुळलेला प्रत्येक घटक मुख्यमंत्र्यांना लीड मतांनी निवडून येण्यासाठी मदत करेल, अशी जाहीर कबुलीच या संघटनांनी दिली आहे.
समर्थनप्राप्त संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चित्रांश कायस्थ समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र श्रीवास्तव, विदर्भ खाटीक समाज संघर्ष समितीचे धनराज लारोकर, भारतीय दलित पँथरचे प्रमुख सिद्धार्थ कुर्वे, अखिल भारतीय बारी समजाचे अध्यक्ष प्रकाश वर्मा, समाज विकाास कृती समितीचे सचिव रमेश गिऱ्हे , अखिल डहरवाल कलार समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेचे मुलचंद शंभरगडे, आदर्श चौरसिया लेडिज क्लबच्या सरिता चौरसिया, चौरसिया समाज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय गजानन चौरसिया आणि जांगिड ब्राह्मण समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुंदरलाल जांगिड यांचा समावेश आहे. संघटनांनी दिलेल्या या समर्थनाप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे वरिष्ठ पुढारी आणि मनपाचे सत्तापक्ष पुढारी संदीप जोशी यांनी संघटना आणि त्यांच्या पदाधिकायांचे आभार मानले आहे




आमचे चॅनल subscribe करा
