फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमुंढे म्हणाले..गूड बाय मनपा..धन्यवाद नागपूर!

मुंढे म्हणाले..गूड बाय मनपा..धन्यवाद नागपूर!

Advertisements


मुुंढेंची बदली रद्द झाल्याने सोशल मिडीयावर संभ्रमाचे माेहोळ

नागपूर,ता. ९ सप्टेंबर: मनपात सात महिने काम केल्यानंतर आज मी तुमचा निरोप घेत आहे .गेल्या सात महिन्यात या शहराला मी ज्या उंचावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले त्यातील काही प्रकल्प पूर्ण झाले,काही सुरु करण्याचे होते मात्र याच वेळी माझी बदली झाली ‘अब मै चल पडा अपने राह की और..’या नियमाप्रमाणे पुढील कामकाजासाठी मी आपल्या सर्वांचा निरोप घेत आहे.

गेल्या सात महिन्यामध्ये मला नागपूरकरांचं प्रेम लाभलं,सहकार्य लाभलं,माहिती नाही मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो की नाही,प्रयत्न मात्र शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त केले.काही गोष्टी निश्‍चित करु शकलो,नाग नदी असेल,कोविड असेल,काही अतिक्रमणातील असेल.कोविडमध्ये सामाजिक संस्थाचे तसेच लोकांचे सहकार्य फार मोठ्या प्रमाणात लाभल्यामुळेच रस्त्यावरील भिक्षेकरी असो किवा विलगीकरणातील नागरिक असो सर्वांना खाण्यापासून तर आरोग्याच्या सोयसुविधा उपलब्ध करुन देणं शक्य झालं.

मात्र आजही करोनाचा प्रकोप खूप जास्त आहे त्यामुळे नागरिकांनी कोविडचे नियम पाळणे खूप गरजेचं आहे त्यासाठी आवश्‍यक सोयीसुविधा माझ्या काळात मी केलेल्याच आहेत. त्याचा पुरेपूर वापर केला तर निश्‍चितच आपण या परिस्थितीवर मात करु शकतो.
परंतू खूप मोठ्या प्रमाणात ड्रीम प्राजेक्ट जे होते,शहराला एक लिवेबल म्हणजे जगण्यासारखी आणि आर्थिकस्तरावर व्हायब्रंट सिटी म्हणजे फूल ऑफ लाईफ,करायचे होती ते पूर्ण करु शकलो नाही कारण तेवढा वेळच भेटला नाही,कारण तेवढ्यात कोविड आला. त्यामुळे एवढंच म्हणतो...गूड बाय मनपा… परंतू पूर्ण नागपूरकर,ज्यांनी माझ्या ह्दयात स्थान मिळवले ते सर्वजण,आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं ते कायम राहील.हा जो बॉण्ड आहे हा असाच ठेवा.आपल्याला जर पुढं जायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल.एकावरती निर्भर न राहता,शहराला पुढे कसं नेता येईल या दृष्टिकोणातून एकोपा करावा लागेल,विचारांची देवाण-घेवाण करुन योग्य दिशेने शहराला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे लागेल.ते आपण कराल अशी अपेक्ष्ा आहे आणि आपल्या बरोबर जे संबंध गेल्या सात महिन्यात जुळले गेले,ते कायमस्वरुपी पुढच्या काळामध्ये राहतील.हाच बॉण्ड तसाच राहण्यासाठी माझी दारे आपल्या सर्वांसाठी कायमची खुली असणार आहे.

मी माझ्या परिनं गेल्या सात महिन्यात सात पावले टाकण्याचा प्रयत्न केला.आपण तीन पावलं टाकणार का?हा खरा प्रश्‍न आहे.आपल्याला जर पुढं जायचं असेल तर शासन,प्रशासन आणि नागरिक या सर्वांनी मिळून एकत्रितरित्या पुढे जाण्याची गरज आहे. फक्त ह्दयात माझं स्थान बनून चालणार नाही तर मेंदू म्हणजे डोक्याचा वापर करुन डोकं आणि ह्दय यांनीही एकत्र येण्याची गरज आहे.अतिशय जड अंतकरणाने मी येथून जात आहे,मनपाला गूडबाय करीत आहे.नागपूरकरांचे स्थान माझ्या ह्दयात कायमस्वरुपी असणार आहे तुमच्याही ह्दयात माझे स्थान असेच राहू द्या एवढीच अपेक्षा करतो.

नागपूरकरांसोबत साधलेल्या या संबोधनात माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकदाही जनप्रतिनिधींसोबत सहकार्य करा,असा संदेश नागपूरकरांना दिला नाही,याचीही चर्चा आज चांगलीच रंगली.कोविड संदर्भात मीच संपूर्ण व्यवस्था आधीच करुन ठेवली आहे,अशी पुष्टि जोडण्यास ही ते विसरले नाही,याशिवाय जाता-जाता नागपूरकरांना मेंदू आणि डोक्याने काम करण्याचा सल्ला देण्याचेही ते विसरले नाहीत, मात्र आज फेसबूक व्हिडीयोमधील त्यांचे स्वर बरेच नरमले होते.हेच का नेहमीचे आक्रमक तुकाराम मुंढे?नेटीझन्सलाही विश्‍वास बसत नव्हता.खरं आहे…सर्व अंहकार,आक्रमकता ही शेवट पदाची असते,खूर्चीची असते,अधिकाराची असते,खूर्ची गेली,पद गेले की….स्वरात…शब्दात विनम्रता येऊनच जात असते..हाच जगाचा नियम आहे!

मुंढेंची बदली रद्द,नागपूरातच राहणार नागपूरकरांची आशा ठरली फोल-

आज दिवसभर तुकाराम मुंढे यांची मुंबई येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील सदस्य सचिव पदावरील बदली रद्द झाल्याची बातमी चांगीलच व्हायरल झाली आणि मुंढे हे पुन्हा आयुक्त पदी नागपूरातच राहतील असा संभ्रम सर्वदूर पसरला.मात्र एकदा बदलीचे आदेश निघाले असता त्याच पदावर त्याच शहरात पुर्ननियुक्ती होत नसते,हा शासनाचाच नियम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्य शासनाने अवघ्या पंधरा दिवसात मुंढे यांची प्राधिकरणावरील बदली रद्द केली हे विशेष. मुंढे यांची २६ ऑगस्ट रोजी बदली करण्यात आली होती व त्यांच्या जागी बी.राधाकृष्णन हे आयुक्तपदी रुजू झालेत.मुंढे यांच्या बदलीच्या ठिकाणी आता किशोर राजे निंबाळकर हे रुजू झाल्याने ठाकरे सरकार मुंढे यांना आता कोणते पद देते,याकडे सर्वांचे लक्ष् लागले आहे. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्यावर मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करुन हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मुंढे यांची बदली रद्द होण्याची माहिती मिळताच नागपूकरात मुंढे हे परत मनपा आयुक्त पदी रुजू झालेत असा संभ्रम पसरला. आज दिवस भर सोशल मिडीयावर हीच माहिती सर्वाधिक चर्चेत होती. अनेक नागरिकांनी आज दिवसभर प्रसार व प्रचार माध्यकत्कर्त्यांकडून बातमीची शहनिशा करुन घेतली. मात्र मुंढे यांची बदली रद्द झाली असली तरी ते नागपूरला ‘गूड बाय‘करीत निघतात आहे,हे ऐकून अनेकांच्या पदरी निराशा आली.

नुकतीच मुंढे यांनी करोनावर मात केली आहे.करोनामुक्त झाल्यावर त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर नागरिकांची भेट देखील घेतली.एका महिलेने मुंढे यांच्या हातावर सुरक्ष्ेचा धागा देखील प्रेमाने बांधला.मुंढे यांच्या नव्या कर्तव्य ठिकाणाबद्दलही नागरिकांनी त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या