
दलित वस्तीतील कामे ही रोखली
नागपूर: अर्थसंकल्पातील एकूण बजेट पैकी ५ टक्के निधी हा शहरातील दूर्बल घटकांअंर्तगत येणा-या दलित वस्तीतील विकास कामांसाठी राखवी ठेवला जातो. सभागृहाने ५६ कोटींच्या कामांना मंजुरी दिली असताना आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी दलित वस्तीतील कामांनाही स्थगिती दिली असल्याचा आरोप करीत याविरुद्ध संविधानाने नागरिकांना व जनप्रतिनिधिंना आपले अधिकारी सुरक्ष्ति ठेवण्यासाठी जे अधिकार दिले आहेत त्या अधिकाराचा म्हणजे प्रसंगी ‘अट्रासिटी’चा देखील वापर मुंढे विरोधात करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी शुक्रवार दि. ६ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत दिला.
दलित वस्त्यांमध्ये गडर लाईनची कामे, रस्ते,लाईट इ.मूलभूत सुविधांवर हा निधी खर्च केला जातो.हा निधी कॅरी फॉरवर्ड होत असतो.एकीकडे राज्य सरकार ‘शिवशाही’शासन कारभाराची घोषणा करते दूसरीकडे नागपूरातील दलितांच्या वस्तीतील कामे राज्य शासनाचाच प्रतिनिधी म्हणून आयुक्त थांबवतात,यावरुन सरकारचे दोगलेपण लक्ष्ात येते.
२०१९-२०२० च्या वार्षिक अर्थसंकल्पातील दुर्बळ घटकांसाठीच्या निधीचे सर्व वर्क ऑर्डर पारित झाले मात्र आयुक्तांनी या कामांना देखील स्थगिती दिली असल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले.हा निधी रोखण्याचा अधिकार आयुक्तांना देखील नाही.मुंढे हा निधी रोखू शकत नाही. दूर्बळ घटकांसाठी जवळपास ३० कोटींच्या कामांचे वर्क ऑर्डर निघाले आहेत.
वर्क ऑर्डर काढायला एवढा उशिर का झाला?या प्रश्नाचे उत्तर देताना जूनमध्ये मनपाच्या स्थायी समितीचे बजेट सभागृहात आले,यानंतर दूर्बल घटक समितीच्या अध्यक्ष्ांची निवड झाली,यानंतर समिती स्थापन झाली,लगेच विधान सभेच्या निवडणूकांमुळे आचार संहिता लागली,तीन महिने फाईल तयार होण्यास लागले,या फाईल्स झोन मधून येत असतात. मात्र जानेवारीपर्यंतची मंजूर झालेली सर्वच कामे मुंढे यांनी ‘ज्या कार्यांचे कार्यादेश नाही निघाले ती सर्व कामे थांबवण्याचे निर्देश दिले,मूळात त्यांना दूर्बळ घटकांसाठी सभागृहाने संमत केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा अधिकारच नसल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले. प्रत्येक फाईलवर ३१ विविध अधिका-यांच्या स्वाक्ष् -या लागतात,दूर्बळ घटकांच्या फाईल्सवर तर ३४ स्वाक्ष्-या लागतात,त्यामुळे कार्यादेश देण्यास ही उशिर झाला.
परिणामी मुुंढे यांच्या या कृतीविरुद्ध भारतीय संविधानाने जो अधिकार आम्हाला मिळाला आहे त्या अधिकाराचा योग्य वापर केला जाईल,असा इशारा संदीप जाधव यांनी दिला.
आजपर्यंत मनपाच्या इतिहासात दुर्बळ घटकांचा निधी कधीच कोणत्याच सबबीखाली थांबवण्यात आले नाही.एवढेच नव्हे तर या अायुक्तांनी विलेज फंड देखील थांबवला असल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली.




आमचे चॅनल subscribe करा
