Homeनागपूर न्यूजमुंढेंचे महिलांविषयी आपत्तीजनक वक्तव्य: सत्ताधा-यांसह प्रशंसकही भडकले

मुंढेंचे महिलांविषयी आपत्तीजनक वक्तव्य: सत्ताधा-यांसह प्रशंसकही भडकले

Advertisements
Advertisements

 

 

”सुधर जाओ नही तो प्रशंसकीही तुम्हे जूते मारेंगे! एका प्रशंसकाची व्यथा

डॉ. ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २८ ऑगस्ट: माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तपत्र प्रतिनिधीला मुलाखत देताना ’माझ्याकडे पाठवलेल्या महिलांनी मला बदनाम करण्यासाठी कपडे फाडून घेतले’असे धक्कादायक व वादग्रस्त वक्तव्य केले. हे वृत्त छापून येताच नागपूरात राजकीय, सामाजिक व नैतिक… भूंकप आला! एवढे जवाबदार पद भूषविणारे उच्च विद्याभूषित सनदी अधिकारी यांना आपली ‘अनपेक्ष्ि त ’ बदली पचवता आली नाही आणि त्यांनी सत्ताधा-यांच्या विरोधात एवढा गलिच्छ पातळीवरचा विखार उगाळल्याने आज शहरात त्यांच्या विरुद्ध चांगलाच संताप व्यक्त होत होता.

असे बिनबूडाचे वक्तव्य करुन मुंढे यांनी ते कोणत्या संस्कारात वाढले आहेत हे तर सिद्ध केलंच मात्र त्यांनी नागपूरच्या समस्त महीलावर्गाचाच अपमान केल्याची भावना आज सोशल मिडीयावर उमटत होती. ज्या क्ष् णी ही घटना घडली त्याच वेळी त्यांनी हा कांगावा का केला नाही?पोलीसांचा पहारा चोवीस तास त्यांच्या कक्ष्ा बाहेर असतो,त्याच क्ष् णी त्या महिलेला किंबहूना त्यांनी उल्लेख केलेल्या महिलांनी असा प्रयत्न करताच त्यांना पोलीसांच्या हवाली का केले नाही?त्यांच्याकडे येणा-या प्रत्येक अभ्यागताची नोंद ठेवली जाते. मग त्या महिलेचे किवा महिलांचे नाव मुंढे यांनी आपल्या मुलाखतीत का उघडपणे जाहीर केले नाही?अश्‍या घटना जर सत्य आहेत तर त्याचे सीसीटीव्ही फूटेज देखील उपलब्ध असतील,त्यांनी पोलीसात तक्रार करुन ते पुरावे पोलीसांच्या सुपुर्द का केले नाही?

बदलीचे आदेश येताच आणि हातातून अधिकार निसटताच दूस-याच दिवशी त्यांना नागपूरच्या महिलांनी त्यांच्यासमोर कपडे फाडले असल्याची उपरती झाली?नागपूर शहरातील महिला वर्ग हा आयुक्तांना एवढा ’बाजारु’वाटला का की सत्ताधारी-प्रशासनातील आपापसातील भांडणात त्या स्वत:ला आयुक्तांसमोर नग्न करतील? आणि एवढे शिस्तप्रिय सनदी अधिकारी त्यांच्या अश्‍या या अनैतिक कृत्यावर स्वस्थ बसतील?अश्‍या घटना घडल्या असत्या तर लगेच त्यांनी सत्ताधा-यांच्या विरोधात चांगलाच कांगावा केला असता,असे केल्यास त्यांना चांगलीच सहानूभूती आणि त्यांची आवडती ’प्रसिद्धी’देखील सहज मिळाली असती मात्र त्यांनी असे काहीच केले नाही,याचा अर्थ त्यांनी हे बिनबूडाचे वक्तव्य बदली झाल्याच्या आणि त्यांच्या हातून नागपूरसारखे शहर निसटण्याच्या ‘नैराश्‍यातून’केले असल्याचे सिद्ध होत आहे.

त्यांच्या या गलिच्छ आणि सूडबुद्धि मानसिकतेला शेवटी नागपूरचा महिला वर्ग बळी पडल्याने या शहरातील बहूतांश महीला वर्ग हा अंर्तबाह्य पेटून उठला आहे.मुंढे हे जर गृहविलगीकरणात नसते तर कदाचित लाखोंच्या मोर्च्यांनी महिला वर्गाने त्यांची गाढवावरुन धिंड काढली असती,एवढा संताप त्यांच्या मनात खदखदतोय.पूरोगामी महाराष्ट्रातील इतर समस्त शहरात, नागपूरच्या महिला या अश्‍या बेशरम आणि चारित्र्यहीन आहेत,असा संदेश मुंढे यांच्या या बिनबूडाच्या वक्तव्याने उर्वरित महाराष्ट्रात गेला,त्यामुळे त्यांचे एक खंदे समर्थक व त्यांच्या कार्यशैलीचे मुरीद असणारे ज्येष्ठ स्तंभ लेखक एस.एन.विनोद यांनी एका माध्यम प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया देताना ‘सुधर जाओ नही तो तुम्हारे प्रशंसक ही तुम्हे जुते मारेंगे’अश्‍या शब्दात संताप व्यक्त केला!

त्यांच्या या बिनबूडाच्या वक्तव्यावरुन आजपर्यंत मुंढे जे वारंवार सोशल मिडीयावर बिंबवून सांगत होते की ते ‘खोटे बोलत नाही,खोटे वागत नाही’ते खोटे बोलतात,हे स्पष्ट झाले.एवढेच नव्हे तर आपली निराशा लपवण्यासाठी ते समस्त महिला वर्गाचा अपमान करतात. नागपूर शहरातील महिला वर्ग या इतक्या चारित्र्यहीन आहेत की, तुम्हाला बदनाम करण्यासाठी त्या सहज तुमच्यासमोर अंगावरील कपडे फाडतात आणि आयुक्त महाेदय त्या वेळी काय करतात?तर त्या फाटक्या कपड्याखालील सौंदर्य निहाळत गप्प बसतात!असे सांगायचे आहे का  तुम्हाला? मुंढे यांच्या प्रशंसक वर्गामध्ये तरुणाईनंतर सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे,मात्र आजपर्यंत प्रशासनाविरोधात, भ्रष्टाचार विरोधात आक्रमकपणा घेता-घेता मुंढे हे सरळ महिला वर्गाच्या शील,चारित्र्याविषयीच या पातळीवर आक्रमक झालेत?अशी निराशा,हताशा देखील सोशल मिडीयावर चांगलीच व्यक्त झाली.

चारित्र्यहननाचे प्रयत्न तुमचे नाही…तुम्ही नागपूरातील महिला वर्गाचे केले आहे मुंढे साहेब!तुमच्या विरोधात विरोधकांना मुद्दे मिळाले नाही तर ’महिलांना पाठवून माझ्या कक्ष्ात माझ्यासमोर महीलांनी कपडे फाडून घेण्याचा प्रकार केला’ असा आरोप जो करण्यात आला त्यात तथ्यांश किती,सत्यांश किती आणि अहंकाराची हार आणि नैराश्‍य किती?हे देखील आता तुम्हालाच सिद्ध करावं लागणार असल्याचे सांगून,मुंढेंनी या मुलाखतील सांगिल्याप्रमाणे ‘खरं सांगू लोकांचा थेट संबध असलेल्या संस्थांमध्ये काम करणे मला नेहमीच आवडेल’अशी हताशा देखील तुम्ही व्यक्त केली होती,मात्र तुमची बदली महाराष्ट्र प्राधिकरणात झाल्याने आता लोकांशी थेट संबंध येणार नाही आणि तुम्हाला तुमच्या आवडीची प्रसिद्धीही सोशल मिडीयावर लाटता येणार नसल्यानेच तुम्ही हताश झाला आणि नागपूरातून जाण्यापूर्वी,हा असा खोटा कांगावा केल्याची उद्विग्नता व्यक्त करण्यात आली.

तुमच्या चारित्र्यहननापर्यंतचे प्रयत्न या शहरात झाले,असा अारोप तुम्ही केला मात्र या शहरातील महिला वर्गाच्या चारित्र्यहननातून तुम्ही केलेला अपमान हा तुमच्या लेखी शून्य आहे का?नागपूरातून तुम्ही तर आपलं तोंड घेऊन निघून जाल मात्र नागपूरातील महिला या सत्ताधा-यांच्या इशा-यावर आयुक्तांसमोर कपडे फाडतात,असा संदेश तुम्ही उर्वरित महाराष्ट्राला देऊन गेलात,ही अपरिमित चारित्र्याची नुसकान भरपाई कोण भरुन देणार? ’तुकारामांची गाथा तत्कालीन समाजाने नदी पात्रात बुडवली होती..या कलियुगी तुकारामाने तर नागपूरातील महिलांच्या चारित्र्याची आणि स्वाभिमानाची गाथाच कायमची कलंकित केली’असे देखील दू:ख माध्यमात व्यक्त झाले.

राजकारण आपल्या जागी ठिक आहे,मात्र राजकारण खेळताना काही नीती-मुल्येही पाळावी लागतात कारण हा पाश्‍चात्य देश नाही,भारत देश आहे.या देशात महिला वर्गाला सन्मानजनक स्थान आहे. याच देशात ती देवी म्हणून पूजली जाते. स्वामी विवेकानंदांनी तर गणिका(वेश्‍या)असणा-या स्त्रीला देखील मातास्वरुप मानले तर महाराष्ट्राच्या पुण्यभूमित छत्रपती शिवरायांसारख्या राजाने शत्रूंच्या यवनी महिलांना देखील मातृस्थानी ठेवले होते.अश्‍या या पुण्यभूमित तुकाराम मुंढेंसारखा एक सनदी अधिकारी केवळ आपले पद गेले,अधिकार गेला या नैराश्‍येतून मातृस्थानी असणा-या,पूजनीय असणा-या महिलांवरच खोटे बालंट लावून निघून जात आहे,हे कधीही न भरुन निघणारे नुकसान आहे.यासाठी मुंढे यांनी आपले हे वक्तव्य नैराश्‍यातून केले,हे तात्काळ मान्य करावे व तातडीने समस्त नागपूरकर महिलांची माफी मागावी,माणसाकडूनच चूका होतात मात्र माफी मागणारा माणूस हा समाजाच्या नजरेत आणखी मोठा होत असतो,मुंढेंची ही आभाळाऐवढी चूक माफीच्या पात्रतेची तर नाही मात्र त्यांनी लावलेला चारित्र्यावरचा डाग पुसल्या जाण्याची वेदना कदाचित त्यामुळे थोडी कमी होईल,अशी आशा देखील व्यक्त करण्यात आली.

Latest बातम्या