

नवी दिल्लीः भाजप नेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती खालावल्याची अफवा पसरवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. तर दुसरीकडे अमित शहा यांनी स्वतः याबाबत माहिती दिलीय. आपली प्रकृती ठणठणीत आहे. कुठलाही आजार आपल्याला झालेला नाही, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलंय.
अमित शहा यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात आहेत. माझी प्रकृती खालावल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत. काहींनी माझ्या मृत्युसाठीही प्रार्थना केलीय. गेल्या दोन दिवसांपासून या अफवांना पेव फुटलं आहे. या अफवांमुळे भाजपचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मला संपर्क केला. प्रकृतीची विचारपूस केली. अनेकांचे फोन येत असल्याने अखेर मला आज जाहीरपणे सांगावं लागतंय. माझी प्रकृती उत्तम आहे. मला कुठलाही आजार झालेला नाही, असं अमित शहा यांनी ट्विटमधून स्पष्ट केलं आहे.
अहमदाबादमधून तिघांना अटक
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून काहींनी अफवा पसरवल्या. फेक अकाउंट उघडून अमित शहा यांची प्रकृती खालावल्याच्या अफवाल परवल्या गेल्या. या अफवा गुजरातमधून पसरवल्या जात असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर अहमबादामधील काहींनी फेक अकाउंट उघडून या अफवा पसरवल्याचं समोर आलंय. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अफवा पसरवणाऱ्यांत चौघेजण सामील असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केलीय. पोलीस आणखी एकाचा शोध घेत आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
