फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेश‘मी टू’रिटर्न्स.....

‘मी टू’रिटर्न्स…..

Advertisements

‘मी टू’रिटर्न्स…..

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २० सप्टेंबर: अभिनेत्री पायल घोष हीने धाडसाने समोर येऊन दिग्दर्शक अनुराग कश्‍यप याच्यावर लैंगिक छळाचा आरोप ‘मी टू‘च्या हॅश टॅगवर केला आणि चित्रपटसृष्टित पुन्हा एकदा चारित्र्यहननाचे आणि चारित्र्यपतनाचे वादळ घोंघावले. उघडपणे आरोप करीत असल्यामुळे या पुढे चित्रपटसृष्टित माझे करिअर तर संपलेच आहे,मात्र गप्प बसणं जमलं नाही,अशी हताशाही ही तरुणी व्यक्त करते.

पायल घोष या अभिनेत्रीने दिग्दर्शक अनुराग कश्‍यप याच्यावर आरोप करताना या दिग्दर्शकाने तिच्यासोबत दोनवेळा जबरदस्ती लैंगिक संबंध जोडले,असा आरोप केला व त्या विराेधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली मात्र प्रश्‍न उरतोच जे धाडस पायल घोषने कश्‍यप यांच्यावर हे आरोप करण्यात दाखवले तेवढ्याच धाडसीपणाने हे ती या जगाला सांगेल का या संबंधाला माझी देखील सहमती होती!कारण बळजबरी एकवेळा होऊ शकते,दोनवेळा किवा वारंवार कशी होऊ शकते?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कंगना रानौत हिने देखील फक्त एका गाण्याच्या चित्रिकरणासाठी तिला बेडवर जावे लागले,असे जया बच्चन यांच्या ‘थाली’या वक्तव्यावर उत्तर देताना ती म्हणाली,मात्र कंगना हिने देखील हे धाडसाने कबूल करावे त्या संबधासाठी तिचा देखील ‘होकारच’ होता,निश्‍चितच कामासाठी,नोकरीसाठी किवा इतर कोणत्याही बाबी साठी अश्‍या प्रकारची तडजोड एखादी प्रतिभावान अभिनेत्री असो किवा इतर कोणत्याही क्ष्ेत्रातील महिला असो,तो निंदनीय आणि अनैतिकच व्यवहार आहे मात्र तरीदेखीलअनिच्छा आणि सहमती’या दोन्ही भावनांमध्ये चांगलीच गल्लत या दोन्ही अभिनेत्रींनी केल्याचे आढळून येते.एवढंच घडले त्यांची ‘ईच्छा’नसताना फक्त करिअरसाठी त्या क्ष् णी त्यांनी स्वीकारलेली ती तडजोड होती.मग लैंगिक शोषणाचा आरोप करताना हे देखील तेवढ्याच धाडसाने आता जगाला सांगावे त्या क्ष् णी ईच्छा नसताना सहमती मात्र होती….!जग त्यांची ही बाजू देखील नक्कीच समजून घेईल.

याच मी‘ टू ची’ दुसरी भावनिक बाजू म्हणजे इतक्या पराकोटीच्या सर्मपणानंतरही त्यांच्या वाटेला काहीच आलेच नाही,याचा देखील त्रागा असू शकतो.‘पुरुष’हा तसाच असतो, स्वार्थ सिद्ध झाल्यानंतर दिलेला शब्द पाळेलच,असे नाही,अश्‍यावेळी मात्र ‘स्त्री’म्हणून ती नक्कीच कोसळते,या २१ साव्या शतकातल्या महिला आहेत त्यामुळे धोका,उपेक्ष्ा पचवून गप्प बसणे त्यांना जमत नाही,त्या उघडपणे बोलतात,जगाला ओरडून सांगण्याचे धाडस त्यांचात असतं,या धाडसामुळे इतकंच घडतं,पांढरपेशी चेह-यामागे दडलेले विकृत चेहरे समोर येतात,एवढंच…!

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर आरोप केला आणि भारतात ‘मी टू‘ची चळवळ सुरु झाली.‘मी टू’च्या पहील्या भागापेक्ष्ा याचा दूसरा भाग हा अधिक धाडसाचा म्हणावा लागेल.‘मी टू’च्या पहिल्या भागामुळे कोणकोणते क्षेत्र ढवळून निघाले होते,याचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल.लैंगिक शोषणाविरुद्ध जगभरातील महीलांनी सुरु केलेल्या ‘मी टू’मोहिमेमुळे फक्त बॉलिवूड जगच ढवळून नाही निघालं तर अन्य प्रतिष्ठित क्षेत्रातही हे प्रकार सुरु असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील ‘मी टू’प्रकरणे-
लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर हिंदुस्थान टाईम्सचे ब्यूरो चीफ प्रशांत झा यांनी राजीनामा दिला तर टाईम्स ऑफ इंडियाच्या हैदराबाद आवृत्तीचे संपादक के.आर.श्रीनिवास यांना किमान सात दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.

महीला पत्रकार प्रिया रमाणी यांनी लैंगिक छळाचा आरोप वरिष्ठ पत्रकार व माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर केल्यानंतर अकबर यांच्या विरोधात २० महिला पत्रकार साक्ष् देण्यासाठी समारे आल्या होत्या.अकबर यांनी प्रिया रमाणी यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोठावला तेव्हा आमचेही म्हणने न्यायालयाने ऐकून घ्यावे असे या २० महिला पत्रकारांनी मागणी केली होती.‘द एशियन एज ‘या वृत्तपत्रात काम करीत असताना अकबर यांच्यासह काम करीत असताना लैंगिक छळाचा सामना करावा लागला असल्याचा दावा या महिला पत्रकारांनी केला होता.या प्रकरणात अखेर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्याव लागला होता.यामिनी नायर या महिला पत्रकाराने आपल्या वरिष्ठाविरोधात ‘द हिंदू’या वृत्तपत्रातील वरिष्ठांविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती.त्यानंतर या वृत्तपत्राचे निवासी संपादक गौरीसदन नायर रजेवर गेले होते.

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने महिला पत्रकारांचा त्यांच्याच पुरुष सहका-यांकडून लैंगिक छळ झाल्याच्या आरोपांबद्दल निवेदन प्रसिद्ध केले . ज्या घटनांचा उल्लेख झालेला आहे त्यांची नि:पक्ष् पातीपणे चौकशी संबंधित प्रसारमाध्यमाच्या संघटनेने करावी. लैंगिक छळ/बलात्काराच्या आरोपात जो काेणी दोषी आढळेल त्याला शिक्ष्ा केली जावी,असे आवाहन निवेदनात केले गेले आहे.

चित्रकार ही
प्रख्यात चित्रकार जतीन दास यांच्यावरही एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.निशा बोरा यांनी म्हटले होते,की काही काळ आपण त्यांच्यासह काम करीत होतो,त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने त्यांचे चुंबन घेतले!

सभ्य माणसाच्या खेळातही ‘मी टू’-
सभ्य माणसांचा खेळ समजल्या जाणा-या क्रिकेट विश्‍वात देखील मी टू प्रकरण पोहोचले.‘मी टू’मोहिमेत क्रिकेटपटू व अधिका-यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले.बीसीसीआयचे सीईओ राहूल जोहरी यांच्यावर एका अज्ञात महिलेने तसेच श्रीलंकेच्या क्रिकेटपटू लसिथ मलिंगावर आयपीएलदरम्यान एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला.या घटनांची गंभीरपणे दखल घेत आयसीसीने कठोर पावले उचलण्यची घोषणा बैठकीत केली होती.आयसीसी स्पर्धा,आंतरराष्ट्रीय सामने व द्विपक्ष्ीय मालिकादरम्यान कथित अत्याचार तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या अनेक तक्रारी या हॅश टॅग वर झळकल्यात.

राजकारण आणि ‘मी टू’मोहिम-
मनेका गांधी यांनी ‘मी टू’मोहिमेचे स्वागत केले होते मात्र त्यांच्याच पक्ष्ाचे खासदार उदित राज यांनी ही मोहिम काही मंडळींना बदनाम करण्यासाठी चालवली असल्याचा वास येतो,असे म्हटले होते. एखाद्या व्यक्तिविरुद्ध १० वर्षांनी आरोप करुन काय उपयोग?त्याची सत्यता कशी पडताळून पाहता येणार,असे सवाल करीत,मी टू चळवळीतून एक चुकीची प्रथा सुरु होत असल्याचे खा.उदित राज यांनी म्हटले होते.

मात्र असे असले तरी ’एनएसयूआय‘चे राष्ट्रीय अध्यक्ष् फिरोज खान यांना आपला राजीनामा तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष् राहूल गांधी यांना सोपवावा लागला होता,हे विशेष! दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात फिरोज खान विरुद्ध जम्मू-काश्‍मीरचे असणारे फिरोज खान यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती.तिने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने सुष्मिता देव,रागिणी नायक व दीपिंदर हुड्डा ही त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती मात्र समितीचा अहवाल येण्यापूर्वीच फिरोज खान यांनी पदाचा राजीनामा दिला.

‘मी टू’चळवळीत उत्तराखंडातील भारतीय जनता  पक्ष्ाचे सरचिटणीस संजय कुमार यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता.

आयटी क्ष्ेत्रालाही पोहोचली झळ-
लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर टाटा मोटर्सच्या कॉपोरेट कम्यूनिकेशनचे प्रमुख सुरेश रंगराजन यांना रजेवर पाठवले होते.एका महिला कर्मचारीने त्यांच्या विरोधात ही तक्रार नोंदवली होती.याशिवाय पाच महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर टाटा सन्सने आपले सल्लागार सुहेश सेठ यांच्या कॉन्सुलेज या कंपनीशी असलेला करार मोडित काढला.यातील एक महिला बिग बॉस-८ ची स्पर्धक डायंड्रा सोरेस होती.एका पार्टीतून निघत असताना सेठ यांनी जबरस्ती तिचे चुंबन घेतले असा आरोप तिने केला.प्रतिकार करीत त्याच्या ज़ीभेचा चावा मी इतक्या जारोत घेतला,त्यांना कायम ती शिक्ष्ा लक्ष्ात राहील,असे ट्ठीट तिने केले होते.

३६ आयटी कंपन्यांमध्ये ५८८ प्रकरणांची नोंद झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील अग्रणी ५० पैकी ३६ कंपन्यांमध्ये ‘मी टू’चळवळीदरम्यान ५८८ प्रकरणांची नोंद झाली होती. यापैकी सर्वाधिक २४४ प्रकरणे माहिती तंत्रज्ञान(आयटी) क्ष्ेत्रातील कंपन्यांमधील असल्याचे एका सर्वेक्ष् णात समोर आले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाला निफ्टी म्हणतात. या निफ्टीमध्ये ५० कंपन्या आहेत.यापैकी विप्रो लिमिटेड या आयटीतील कंपनीत जानेवरी ते सप्टेंबर या कालावधीत लैंगिक छळाशी संबधित १०१ प्रकरणे समोर आली तर इन्फोसिसमध्ये ७७,टीसीएसमध्ये ६२ व एचसीएल टॅक्नोलॉजीमध्ये ४ तक्रारी आल्यात.

भारतात फक्त २६ टक्के महिला कर्मचारी आहेत.त्यातील ५० टक्क्यांहून अधिक आयटी क्ष्ेत्रात कार्यरत आहेत. महिलांच्या लैंगिक छळाच्या सर्वाधिक तक्रारी याच क्ष्ेत्रातील असून यापाठोपाठ बँकिंग व वित्त क्ष्ेत्राचा क्रमांक लागतो.‘मी टू’च्या काळात बँकिंग क्ष्ेत्रात १३० तक्रारी आल्या होत्या.त्यामध्ये ९९ प्रकरणांसह आयसीआयसीआय अग्रस्थानी होती.ॲक्सीस,कोटक महेंद्रा व एचडीएफसी बॅकांचा त्यात समावेश आहे,स्टेट बँकेतील प्रकरणाचा आकडा १८ आहे.
तेल व नैसर्गिक वायू किवा कार्गो,बंदरे या क्ष्ेत्रात महिलांचे प्रमाण कमी असल्यामुळे लैंगिक तक्रारीचे प्रमाणही कमी आहे.

गोव्यातही ‘मी टू’चे वादळ-
‘व्हिडीयो वॉलिंटियर्स’या प्रसिद्ध ग्रामीण वृत्तसंस्थेचे प्रमुख स्टॅलिन.के.पद्मा यांनी गोव्यात काम करताना आपली लैंगिक छळवणूक केल्याची तक्रार तीन तरुणींनी नोंदवली होती.गोव्यात या संस्थेतर्फे बरीच कामे चालविली जातात,अर्थात या सर्व आरोपांचा इंकार स्टॅलिन यांनी केला होता.

एका माजी सहकर्मचारी महिलेकडून लैंगिक छळाचे आरोप करण्यात आल्यामुळे सुप्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी १५ डिसेंबरपासून गोव्यात होणा-या कला महोत्वाचे सहसंवर्धक पद सोडले होते.भारतीय कला विश्‍वातील अनुचित वर्तनाचा मुद्दा इन्सटाग्रामवर ’सीन ॲड हर्ड या हँडलद्वारे आक्रमकपणे मांडला जात आहे. त्यात सुबोध गुप्ता यांच्यावरही त्यांच्या एका माजी सहकर्मचारी महिलेने लैंगिक छळाचे आरोप केले होते. गेल्या दशकभरापासून कलाविश्‍वावर लिहिणा-या रोझलीन डी-मेलो यांनी या आरोपांची पुष्टि केली होती.अर्थात या आरोपांचे गुप्ता यांनी खंडन केले हाेते.मात्र कला महोत्सव आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ’मी टू’मोहिमेला पाठिंबा दर्शवला होता.

शिक्ष ण क्ष्ेत्रातही ‘मी टू’चा एल्गार-
पुण्यातील नामांकित सिम्बॉयसिस संस्थेच्या विद्यार्थिनींनी ‘मी टू’च्या चळवळीमध्ये सहभागी होत त्यांना आलेले लैंगिक शोषणाचे अनुभव सोशल मिडीयावरुन मांडण्यास सुरवात केली.सिम्बॉयसिसच्या विमाननगर कॅम्पस येथील सेंटर फॉर मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन विभागातील माजी आणि आजी विद्यार्थिंनींनी त्यांना आलेले पुरुषी विकृतीचे अनुभव सोशल मिडीयावर मांडले होते.या तक्रारींची गंभीर दखल घेत विद्यार्थिनींना खुले पत्र लिहून लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत महाविद्यालयीन समितीकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते.अनेक विद्यार्थिनींनी इंर्टनशिपच्या ठिकाणी आलेले लैंगिक शोषणाचे अनुभव मांडले.कॉलेज प्रशासनाकडे तक्रार नाेदंवूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले.

‘मी टू’आणि चित्रपटसृष्टि-
तनुश्री दत्ता हीने भारतात या चळवळीला सुरवात करताच अनेक नावे पुढे येत गेली.चरित्र्य अभिनेते आलेकनाथ यांच्या विरोधात लेखिका व दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी पोलीसात लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवली आणि सर्वाना धक्काच बसला.चरित्र अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी देखील आलोकनाथ या संस्कारी बाबूंच्या गैरवर्तनाबद्दल वाचा फोडली होती. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात मॉडेल व अभिनेत्री केट शर्मा हिने विनयभंगाची तक्रार दाखल केली.कामाच्या संदर्भात महत्वाच्या विषयावर बोलायचे अाहे असे सांगून एका खोलीत घेऊन गेले असता बळजबरीने चुंबन घेतल्याची तक्रार तिने नोंदवली.एका फोटो जर्नलिस्टने गायक कैलाश खेर यांच्यावर लैंगिक शोषणाचा असाच आरोप केला.एका महिलेने दिग्दर्शक विकास बहल याच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते.‘क्वीन’चित्रपटातील आणखी एका महिलेने जिने कंगनाच्या मैत्रिणीची भूमिका पार पाडली होती,त्या नयना दीक्ष्ति हिने विकास बहल याच्या ‘रंगेल’कृत्यांचा पाढाच सोशल मिडीयावर वाचला.संगीतकार अनु मलिक यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांची ‘इंडियन आयडॉल’ च्या परिक्ष् क पदावरुून’ हकालपट्टी झाली होती.अनु मलिकवर श्‍वेता पंडित,सोना माेहपात्रा या दोन गायिकांसह चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.

अभिनेत्री सिमरन कौर हिने साजिद खान याच्याविरोधात गैरवर्तवणूक केल्याची तक्रार केली होती. २०११ साली ‘हिम्मतवाला‘चित्रपटातील भूमिकेसाठी साजिदने स्वत: फोन करुन ऑडिशनसाठी बोलावले होते.त्यावेळी त्याने मला कपडे काढण्यास सांगितले..चित्रपटात भूमिका द्यायची असल्यास मला अभिनेत्रीचे शरीर पाहणे आवश्‍यक असते,असे साजिदने सांगितले होते,त्याला मी नकार देत आवाज वाढवल्यावर,आवाज कमी कर,घरात माझी आई आहे,असेही तो म्हणाला,असा आरोप सिमरन यांनी एखा वृत्तवाहीनीवर दिलेल्या मुलाखतीत उघडपणे सांगितले होते.लेखक चेतन भगत हा देखील एका पीडीतेने केलेल्या आरोपानंतर अडचणीत आला होता मात्र लागलीच त्याने तिची माफी मागितली होती.

चित्रपटसृष्टितील कलाकारांच्या प्रसिद्धीचे काम करणा-या क्वॉन कपंनीचा माजी सहसंस्थापक अनिर्बन दास याने तर चार महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर वाशी खाडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष् क सतीश गायकवाड यांच्या सावधगिरीने थोडक्यात तो बचावला.या चार महिलांनी केलेल्या आरोपात अनिर्बन दास याने मुलाखतीसाठी घरी बोलावले व त्यांना विवस्त्र होण्यास सांगितले असा अरोप केला.तर ऑडिशनसाठी आलेल्या एका महिलेला ‘ऑडिशन’ अशी बाहेर होत नाही तर बेडरुममध्ये केले जाते’असे सांगत त्याने तिला हॉटेलमध्ये बाेलावल्याचा आरोप केला.या गंभीर आरोपांमुळे क्वॉन कंपनीने त्याचा राजीनामा घेतला.

अभिनेत्री कंगना रानौत हिने तुनश्री दत्ता हिला पाठींबा दर्शवताना प्रारंभी दिग्दर्शक विकास बहलवर असभ्य वर्तनाचा आरोप केला होता.यानंतर आजपर्यंत तिच्या हिटलिस्टवर अनेक कलावंत,दिग्दर्शक हे गारद झाले.

टी.व्ही मालिकेच्या छोट्या पडद्याआड दडलेला कोळाख हा देखील ’मी टू’चळवळी दरम्यान पुढे आले. रजत कपूर,वरुण ग्रोव्हर,लेखक सुहैल सेठ,संगीतकार अनु मलिक,दिग्दर्शक सुभाष कपूर आणि गायक कैलास खेर यांची नावेही ’ मी टू’चळवळीदरम्यान अग्रस्थानावर होती.

मोननवीणा वादक विश्‍व मोहन भट यांच्यावरही एका महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला होता. मुंबईच्या सुखनिध कौर असे या महिलेचे नाव असून,मी १४ वर्षांची असताना भट्ट यांनी आमच्या शाळेत परफॉर्मन्स केला होता.यावेळी मोहन भट्ट यांनी आपल्यासोबत छेडछाड केली होती,असे या महिलेने म्हटले आहे.

फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडियामध्ये ही पोहोचली ‘मी टू’ची चळवळ-
चित्रपटसृष्टीच नव्हे तर एफटीआयमध्ये ही एका माजी विद्यार्थिने आपल्या फेसबूक पेजवर काही वर्षांपूर्वी ती संस्थेत शिकत असताना काही नकोसे अनुभव शेअर केले.

न्यायालयाच्या सर्वोच्च पायरीवर देखील ’मी टू’-
सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल झाली,माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता.या याचिकेत म्हटले आहे की,ज्या लोकांमध्ये सोली सोराबजी यांची नेहमी उठबस असते तेथे त्यांची प्रतिमा ’महिलांचे सिरियल सेक्शुअल हरेंशर’अशी आहे,असे अनुषा सोनी यांनी ट्वीट केले होते.

………. कलावंत,दिग्दर्शक,निर्माते,अभिनेते,गायक,पत्रकार,संपादक,ब्यूरो चीफ,काही राजकीय नेते,क्रीकेटर,कॉरपोरेट जग…एक ही क्षेत्र सुटले नाही ज्यात ‘मी टू‘ चळवळ ही पोहोचली नाही …………..खरं आहे आत्मसन्मानासमोर लाखो रुपयांची नोकरी किवा काम हे स्वाभिमानी स्त्रीला काहीच मायने ठेवत नाही मात्र किती साेपं असतं ना एखाद्या पुरुषाला किळसवाण्या पद्धतीने तरुणीवर विकृत मानसिकतेतून बळजबरी करणे आणि समाज तो फक्त पुरुष असल्यामुळे गप्प बसणे…….!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या