फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममी केलेल्या आरोपांचे खंडण आजपर्यंत करण्यात आले नाही,हीच बाब माझ्या सत्यतेचे प्रमाण

मी केलेल्या आरोपांचे खंडण आजपर्यंत करण्यात आले नाही,हीच बाब माझ्या सत्यतेचे प्रमाण

Advertisements

उकेंविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेली पोलिस कोठडीची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली

कागदपत्रांची पाने बदलविल्याबाबत अ‍ॅड. उके यांचा अवमानना अर्ज: उद्या सुनावणी

नागपूर,ता.२ नोव्हेंबर २०२२: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध विविध याचिका दाखल केल्यामुळे तसेच सक्तवसुली संचनालयाने(ईडी) अटक केल्यामुळे एक एप्रिल २०२२ पासून ॲड.सतीश उके चांगलेच चर्चेत आले.

१ एप्रिल २०२२ रोजी ईडीच्या अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असणा-या उके बंधूंचा मुक्काम सध्या मुंबईतील कारागृहातच आहे मात्र नागपूरातील एका प्रकरणाच्या संदर्भात गेल्या महिन्या १९ ऑक्टोबर पासून त्यांना प्रोडक्शन वाॅरंटवर नागपूर पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा व सत्र न्यायालयासमाेर हजर केले आहे.

उके बंधूंप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरूध्द पोलिसांनी दाखल केलेली याचिका बुधवारी सत्र न्यायालयाने नाकारली. तसेच या प्रकरणाच्या कागदपत्राची पाने बदलविल्यामुळे अ‍ॅड. सतीश उके यांनी कलम १९५, ३४०, ९१ अंतर्गत न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर गुरूवारी , ३ नोव्हेंबर रोजी सत्र न्यायाधीश श्रीमती नागोर यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.

दरम्यान उके बंधूंप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडीची गरज नसल्याचे नमूद करीत पोलीस विभागाचा अर्ज नाकारला होता. या निर्णयाविरूध्द पोलीस विभागाने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मागील तीन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. न्यायालयाने पोलिसांची याचिका नाकारून अ‍ॅड. उके यांनी आरोप केलेल्या अर्जावर गुरूवारी सुनावणी ठेवण्यात आली. अ‍ॅड. उके यांनी दाखल केलेल्या अर्जावर गुरूवारी  सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मंगळवारी अ‍ॅड. उके यांनी आपली संपूर्ण बाजू न्यायालयाला सांगितली होती. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णयाकरिता प्रकरण बुधवारी ठेवले होते. दरम्यान जमिनीच्या प्रकरणात महिलेला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी कागदपत्रांची पाने बदलविल्याबाबत अ‍ॅड. उके यांनी अवमानना अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या अवमानना अर्जावर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली नाही. या अर्जावर उद्या गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होवून निर्णय अपेक्षीत आहे.  पोलीस कोठडीच्या कागदपत्राचे पाने बदलविल्याचा आरोप अ‍ॅड. उके यांनी केला आहे.  १९ ऑक्टोबरला  प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सुलताना यांनी अ‍ॅड.  उके आणि प्रदीप उके यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. या आदेशाविरूध्द गुन्हे शाखेने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.  याप्रकरणी बुधवारी न्यायालयाने निर्णय देत पोलिसांची याचिका नाकारल्याने  उके बंधूंच्या कोठडीची मागणी करणारे प्रकरण आता खारीज झाले आहे.

बोखारा परिसरातील साडेपाच एकर भूखंड बनावट कागदपत्रांद्वारे हडपल्याप्रकरणी गुन्हे शाखेने प्रोडक्शन वॉरन्टवर अटक केलेल्या ॲड.सतीश उके व प्रदीप उके यांना १९ ऑक्टोबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सादर केले.यावेळी दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अजनी पोलिसांनी याच वर्षी जानेवारी महीन्यात ५२ वर्षीय खेरुनिस्सा नामक महिलेच्या तक्रारीवरुन उके बंधूंवर फसवणूक,अत्याचाराचा प्रयत्न,बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला होता.या प्रकरणात उके बंधूंना अटकपूर्व जामीन ही मिळाला होता.

भूखंड प्रकरणात जामीनीचा कालावधी संपल्यानंतर अजनी ठाण्यात नोंद प्रकरणात गुन्हे शाखेने मुंबईच्या न्यायालयातून प्रोडक्शन वॉरंट घेते दोघांनाही अटक केली व नागपूरात आणण्यात आले.बुधवार,दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी पिडीत महिलेच्या पतीशी भूखंडांचा करारनामा करताना दोन साक्षीदारांनी सही केली असल्याची बाब समोर आली.याशिवाय कागदपत्रांवर केवळ त्यांची सही असून नावे,पत्ता काही नाही.सही करणा-यांचा शोध घेणे आवश्‍यक असून प्रदीप उके याने ज्या बंदूकीद्वारे महिलेला धमकावले त्या बंदूकीबाबत विचारपूस करायची असल्याचे न्यायालयाला सांगितले.ही बंदूक प्रदीप उकेला कोणी दिली?कूठून आणली?याचा तपास करायचा आहे.तसेच उके यांच्यासोबत जे पाच जण पिडीतेच्या घरी गेले होते,ते कोण आहेत?याचा शोध घ्यायचा आहे.या गुन्ह्यात सतीश उकेंनी वापरलेले वाहन जप्त करायचे आहे.सतीश व प्रदीप दोघांचीही चौकशी करायची असल्याने त्यांची ८ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी,अशी विनंती गुन्हेशाखा पोलिसांनी न्यायालयाला केली होती.

२००८ मध्ये उके बंधू ४-५ लोकांना सोबत घेऊन महिलेला धमकावण्यासाठी गेले होते असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजनी परिसरात राहणा-या ५२ वर्षीय महिलेच्या पतीसोबत उके व त्यांच्या साथीदार महिलेच्या घरात घूसले.पिस्तूलचा धाक दाखवून तिचा विनयभंग केला.बनावट दस्तावेजाद्वारे भूखंडाचा ताबा घेतला.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने सक्तवसुली संचालनालयाने तपासाला सुरवात केली व उके बंधूंना अटक केली.न्यायालयीन कोठडीअंतर्गत दोघेही मुंबई कारागृहात.आहेत.

याच वर्षी सप्टेंबर महिन्यातील १८ तारखेला उके यांचा या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी फेटाळून लावला होता.विनयभंग आणि फसवणुकीच्या आराेपाखाली त्यांच्यावर दाखल गुन्ह्यातील अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावताना न्यायालयाने तब्बल ‘१७’कारणे दिली होती.

३१ मार्च रोजी ॲड.उके यांच्या रामेश्‍वरी येथील घरावर ईडीची धाड पडली होती.१ एप्रिल रोजी ईडीने उके बंधूंची अटक केली व त्यांना मुंबईतील कार्यालयात नेले.भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही छापामार कारवाई केली होती.या प्रकरणात उके हे न्यायालयीन कोठडी अंतर्गत मुंबईच्या कारागृहात मुक्कामी आहेत.या व्यतिरिक्त ॲड.उकेंवर व त्यांच्या भावावर प्रदीप उके यांच्यावर अजनी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खोट्या कागदपत्रांच्या आधारावर एका महिलेची जमीन हडपणे,पिस्तुलाचा धाक दाखवून तिला ठार मारण्याची धमकी देणे तसेच तिचा विनयभंग करणे,असे आरोप या दोघांवर आहेत.

याच प्रकरणी ॲड.उके यांनी ॲड.वैभव जगताप यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.सुरवातीला त्यात त्यांना अंतरिम जामीन ही(तात्पुरता दिलासा)ही मिळाला होता,मात्र,त्यावरील सुनावणी सुरुच होती.अखेर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून उके यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.तपास यंत्रणनेने संकलित केलेले पुराव व सरकारी पक्षाचा युक्तीवाद,या अधारावर १७ कारणे नमूद करण्यात आली.

यावेळी न्यायालयाने मारियो पुझो लिखित ‘गॉडफादर’कादंबरीतील एका वाक्याचाही उल्लेख, केला होता‘ए लॉयर विथ ए ब्रिफकेस कॅन स्टिल मोअर दॅन अ थिफ विथ ए गन’असे ते वाक्य होते.एका वकीलावरच आपल्या अशिलाला धोका देण्याचा व तिला पिस्तुलाचा धाकावर धमकाविल्याचा आरोप खरा असल्यास हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले होते.

नागपूर शहरात ॲड.उके यांच्या विषयी सहानुभूती बाळगणारा एक फार मोठा वर्ग आहे.यात माजी संपादक, पत्रकार,बुद्धिजीवी,समाजसेवी,वकील वर्ग तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर नितांत प्रेम व विश्‍वास असणारा सामान्य माणूस देखील आहे. उके यांच्यावरील ईडीची कारवाई ही संवैधानिक लोकशाही असणा-या देशात समर्थनीय नसल्याचे अनेकांचे मत आहे.उके यांना ज्या पद्धतीने अटक झाली व त्यांना जामीन मिळू नये,कारागृहातच ते खितपत पडले राहावे यासाठी राजकारणातील काही कद्दावर नेते व उके यांच्या वकील वर्गातीलच काहींचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याविषयी जनसामन्यांचा मनात चांगलाच तिटकारा उत्पन्न झाला आहे. उके हे कायदेशीर लढाई लढत होते,त्यांना त्यांच्यारितीने उत्तर देण्याचे सोडून साम,दाम,दंड,भेदाची नीती अवलंबिण्यात आली.परिणामी,उके यांना नागपूरात सुनावणीसाठी आणले असता पुन्हा एकदा उके यांच्या विषयीच्या चर्चेला उधाण आले आहे.उके बंधू यांची कारागृहातून जामिनावर सुटका याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.सत्र न्यायालयातून जामिन जरी मिळेल तरी उके यांना मुंबईच्या न्यायालयातही फार मोठी लढाई लढायची आहे.

सत्ताधीश’ने आज सत्र न्यायालयात ॲड.उके यांच्यासोबत संवाद साधला असता ’मी केलेल्या आरोपांचे खंडण आजपर्यंत करण्यात आले नाही,हीच बाब माझ्या सत्यतेचे प्रमाण असल्याचे ते म्हणाले.

आघाडी सरकारच्या काळात उकेंना अटक ही सर्वात दूर्देवाची बाब:ज्वाला धोटे(अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा)

नेहमी अन्यायाच्या विरुद्ध लढणारा,भ्रष्टाचा-यांची पोलखोल करणारा,राजकारण्यांचे गुन्हे जनतेसमोर उघड करणारा एक अतिशय प्रामाणिक नागरिक आज गजाआड आहे ही अत्यंत दूर्देवी बाब आहे,ही लोकशाहीची शोकांतिका असल्याची खंत याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली.आपली न्यायव्यवस्था ही शंभर अपराधी सुटले तरी चालतील मात्र कुण्या निरपराधाला शिक्षा होता कामा नये,या तत्वावर चालणारी आहे.
याच तत्वावर आमचाही दृढ विश्‍वास असून त्यामुळेच आम्ही ही आशा करीत आहोत की निरपराधाला शिक्षा होणार नाही,ॲड.उके ही प्रदीर्घ न्यायालयीन लढाई निश्‍चितच जिंकतील कारण ‘सत्य परेशान हो सकता है,पराभूत नही’.आज ना उद्या ॲड.उकेंना न्यायदेवतेकडून निश्‍चितच न्याय मिळेल.

महाराष्ट्रात १ जुलै पूर्वी महाविकासआघाडीची सरकार होती.ॲड.सतीश उकेंना मी कोणत्याही पक्षाचा मानत नाही कारण ते नेहमी सत्याची बाजू मांडत होते आणि भ्रष्टाचा-यांची पोल खाेल करीत होते.तरी देखील ॲड.उकेंवर काँग्रेसी वकील असण्याचा एक ठपका लागला आहे आणि हीच सर्वाधिक दूर्देवाची बाब आहे की ज्या पक्षाचे उके हे मानले जात होते तो पक्ष राज्यात सत्तेत असताना ॲड.उकेंसोबत हे सर्व घडले.काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकासआघाडी सरकारची सत्ता राज्यात होती,तरी देखील याच काळात नागपूरचे पोलिस अायुक्त अमितेश कुमार यांनी सूडबुद्धिची भावना ठेऊन कारवाई केली आहे.गडे मुर्दे उखाडण्याचा प्रयत्न अमितेश कुमारांनी केला.पंधरा वर्षांंपूर्वीची तक्रार नव्याने उकरुन काढली कारण अमितेश कुमार यांचा एका राजकीय पक्षाकडे जो झुकाव आहे त्याची देखील ॲड.उके पोलखोल करीत होते त्यामुळेच त्याचे परिणाम ॲड.उके अश्‍या रितीने भोगत आहेत.
पोलिस प्रशासन हे पूर्णत:राजकीय दबावात काम करीत असल्याचा आरोपही या प्रसंगी ज्वाला धोटे यांनी केला.

पुरावे न्यायालयासमोर आल्यानंतर उके निर्दोष सुटतील:ॲड.विलास राऊत(माजी सरकारी वकील)

ॲड.सतीश उकें यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे शंभर टक्के खोटे आहेत. या केसेसमध्ये जेव्हा एव्हिडेंस न्यायालयात चालू होतील तेव्हा सगळ्या बाजू या ‘दूध का दूध पानी का पानी’होतील.वास्तविक पाहता ॲड.सतीश उकेंविरुद्ध एवढी मोठी कारवाई करण्यामागे एकमेव कारण म्हणजे जे सर्वांना माहीती आहे ते म्हणजे त्यांनी सातत्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे या सर्वांच्या मागे ॲड.उके यांनी जी चौकशी बसवली होती,जे गुन्हे दाखल केले होते ज्यामध्ये सत्यता होती आणि सर्वांना माहिती आहे ॲड.उके जे काही करतात ते कोणत्याही पक्षाच्या सांगण्यावरुन करीत नाही तर त्यांना माहिती आहे की एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याची वाचा फोडण्यासाठीच ते पुढे येऊन पुराव्यानिशी बोलत होते,यामुळेच त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यात आले आहे.

मात्र ॲड.उकेंना यामुळेच ‘बळी चा बकरा’बनविण्यात आला आहे आणि ही जी बाब आहे ती शंभर टक्के सत्य आहे त्यामुळेच काही राजकीय व्यक्ती यांनी ॲड.उकेंना कटकारस्थानात अडकवले.ज्या वेळी कोर्टासमोर पुरावे येतील त्यावेळी शंभर टक्के ॲड.उके हे निर्दोष सुटतील.

एक सत्य कश्‍याप्रकारे झाकोळळ्या जात आहे,त्याचा प्रत्यय उके यांच्या प्रकरणात येत आहे. चौदा वर्षां पूर्वी घडलेल्या एका लहानश्‍या घटनेसाठी,एका साधारण गुन्ह्यासाठी एका साधारण वकीलामागे ‘ईडी‘लावणे आणि त्यांच्या मागे केंद्रिय यंत्रणांचा ससेमिरा लावणे हे साबित करतं की ॲड.उकेंमुळे काही ‘सत्ताधीशांना’आपल्या राजकारणात अडथळा निर्माण होत होता त्यामुळेच सत्तेचा गैरफायदा घेत ती काही मंडळी उकें विरुद्ध गैरकायदेशीर कारवाई करीत असल्याचे माझे ठाम मत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या