फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमीच माझ्या नव-याची पहीली बायको!मंजुषा भूरे

मीच माझ्या नव-याची पहीली बायको!मंजुषा भूरे

Advertisements


सुषमा भूरे यांचा सर्व ड्रामा सासूबाईंच्या घरासाठी:मंजुषा भूरे यांचा आरोप

नागपूर,ता. ८ जानेवारी: महापौर पदग्रहण सोहळ्यात काल गुरुवार दि. ७ जानेवरी रोजी मनपा मुख्यालयात सुषमा भूरे यांनी गोंधळ घातला व माध्यमांना त्यांची त्रासदी सांगितली.मात्र आज जणू एखाद्या चित्रपटात शोभावा असा ‘कहानि में ट्विस्ट’आला व सुषमा यांनी भारतीय जनता पक्ष्ाच्या ज्या प्रभाग क्र.३४ च्या वार्ड महिला अध्यक्ष्ा मंजुषा भूरे यांच्यावर आरोप केले त्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे त्यांचा अमेाल भूरे यांच्यासोबत २७ मार्च २००८ रोजी हिंदू रितीरिवाजप्रमाणे झालेल्या लग्नाच्या सरकार दरबारी नोंदणीचे प्रमाणपत्र पाठवले,व

सुषमा या त्यांचा पतीच्या आयुष्यात सर्वसंमतीने आलेली दुसरी पत्नी असल्याचा धक्कादायक खुलासा केला!
कार्यक्रम स्थळी सुनियोजित पद्धतीने केलेला तमाशा हा माझा व माझ्या पक्ष्ाच्या बदनामीचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. मंजुषा भूरे यांना देखील एक १३ वर्षीय व ९ वर्षीय अशी दोन मुले आहेत.दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या सास-यांच्या देहांतानंतर सुषमा या सासूबाईंना घर त्यांच्या नावाने करुन देण्यासाठी भांडणे करु लागल्या,मात्र वयोवृद्ध सासूंनी हे घर मी माझ्या एकूलता एक मूलगा अमोल भूरे यांच्या नावेच करणार असल्याचे सुषमा यांना सांगितले.यामुळेच गेल्या दोन महिन्यांपासून हा संपूर्ण वाद त्यांनी उकरुन काढला असल्याचे मंजुषा यांचे म्हणने आहे.

मंजूषा या दोघीच बहीणी असल्याने व त्यांच्या आईला मूलगा नसल्याने त्या आपल्या आईच्याच घरी जयंवत नगर येथे आपल्या दोन्ही मुलांसह राहतात तर सुषमा भूरे या लग्नापासूनच अमोल भूरे यांच्या आई-वडीलांसोबत श्रीनाथ साईनगर येथे राहतात.हे दोन्ही घरे अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच असल्याचे मंजूषा सांगतात.

तुम्ही आपल्या हक्काच्या नव-याला दुस-या लग्नाची परवानगी का दिली?या प्रश्‍नाचे उत्तर देताना या प्रश्‍नाचे मूळ ‘जाती’मध्ये दडले असल्याचा धक्कादायक खुलासा मंजूषा यांनी केला. मंजुषा या कुणबी जातीच्या असून त्यांनी अमोल यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता.मात्र तेली समाजाचे असणा-या अमोल यांच्या आई-वडीलांना हा प्रेमविवाह मंजूर नव्हता परिणामी त्यांनी अमोल यांच्यावर आपल्याच जातीच्या मुलीशी पुन्हा पुर्नविवाह करण्यासाठी दवाब आणला.यात दोष माझ्या पतीचा देखील असल्याचे मंजूषा सांगतात. मात्र जी स्त्री प्रेम करते ती आपल्या पतीच्या सुखासाठी ‘सवत’देखील छातीवर मंजूर करुन घेते.गेल्या बारा वर्षांपासून अमोल हे दोन्ही घरे सुरळीत राखत होते.

मात्र सास-यांचे निधन होताच सुषमा यांनी सासूबाईंवर दडपण आणण्यास सुरुवात केली.सासूबाई या खालच्या घरात राहत असून सुषमा आपल्या पती व दोन्ही मुलांसह वरच्या मजल्यावर राहत आहेत.मात्र सततच्या भांडणामुळे सासूबाई या घराच्या मेनगेटला कूलूप लावून त्यांच्या मुलीकडे एकदा निघून गेल्या. सुषमा यांना सासूबाईंचा हा डाव वाटला व त्यांनी त्यांच्या वहीणी,बहीणी,आई आदी नातेवाईकांना बोलावून घरी गोंधळ घातला यात सासूबाईंना यात जबर मारहाण करण्यात आल्यामुळे सासूबाईंनी अजनी पोलीस ठाण्यात सुषमा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.तेव्हापासून सुषमा या आपल्या आईच्या घरीच असल्याचे मंजूषा यांचे म्हणने आहे.

नव-यावर लावले एकूण ९ कलमा-
घर आपल्या नावाने करण्यास सासूबाई तयार होत नसल्याचे बघून त्यांनी नव-यासोबत पराकोटीच्या भांडणा सुरवात केली यात अमोल यांनी पत्नीवर हात उगारला.त्या विरोधात सुषमा यांनी अजनी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन एकूण ९ कलमा लावल्या.अमोल हे तीन दिवस कारागृहात राहून जामिनावर बाहेर आल्यानंतर सुषमा यांनी अमोल यांना घरी येऊन राहण्यास सांगितले मात्र आपले वकील ॲड.नितीन तेलगोटे यांच्या कायदेशीर सल्ल्यानुसार सध्या न्यायालयात प्रकरण दाखल असल्यामुळे जोपर्यंत सुषमा या पतीविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत अमोल यांनी वेगळे राहणेच हिताचे असा सल्ला दिला, यामुळे पती अमोल हे सध्या पहीली पत्नी मंजुषा भूरे यांच्यासोबत त्यांच्या आईच्या घरी वास्तव्यास आहे.

पोलिसांनी विचारला चिमूकल्यांना जवाब-
सुषमा भूरे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठाण्यातील पीएसआय यांनी मंजुषा यांचे घर गाठून त्यांच्या १३ व ९ वर्षीय मुलांचा जवाब नोंदवला.यात पप्पांचे किती लग्न झाले?किती मुले आहेत?अश्‍या असंवेदनशील प्रश्‍नाचा भडीमार केला.वयोवृद्ध वडीलांच्या स्वाक्ष् -या घेतला.कायदेशीर प्रक्रियेचा हा भाग असला तरी यात संवेदनशीलता दाखवायला हवी होती. सवत सुषमा भूरे यांची दोन्ही मुले हे भवन्स सारख्या अतिशय महागड्या शाळेत शिकतात. अमोल भूरे यांनी चारही मुलांच्या चांगल्या शिक्ष् णासाठी व पालन पोषणात कोणतीही कसूर केली नाही मात्रा तरी देखील सुषमा या सवती मत्सरातून अमोल यांचा केबल व्यवसाय असल्याने सातत्याने केबलच्या वायरी कापून टाकत होत्या.याचा अमोल यांच्या व्यवसायावर देखील गंभीर परिणाम झाला असल्याची व्यथा त्या व्यक्त करतात.

तेली समाजाच्या व्हॉट्स ॲप ग्रूपमधून मंजुषा रिमूव्ह!
संताजी ब्रिगेड तेली समाजाच्या मंजुषा या अध्यक्ष्ा आहेत.त्यांनी या संस्थेला त्या तेली नसून कुणबी असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते मात्र तरी देखील तुम्ही तेली समाजच्या युवकाशी लग्न केल्यामुळे आमच्याच समाजाचे झाले असल्याचे सांगून मंजुषा यांना अध्यक्ष् पद देण्यात आले मात्र कालच्या एकंदिरत संपूर्ण घडामोडीनंतर तेली समाजाच्या व्हॉट्स ग्रूपमधून अचानक मंजुषा यांना रिमूव्ह करण्यात आले याचा देखील धक्का आत्मसन्मानाला बसला असल्याचे सुषमा सांगतात.
मी व माझ्या पक्ष्ाला सुषमा या सातत्याने बदनाम करतात त्यामुळेच माझ्या पक्ष्ाचे पदाधिकारी हे तिला कोणताही सहयोग करीत नाही.माजी महापौर संदीप जोशी हे मला लहान बहीणीप्रमाणे मानतात.कालच्या प्रकाराने त्यांना देखील दुखं झाले कारण सुषमा यांनी त्यांच्या स्वीय सचिवाचे नाव व्हिडियोमध्ये घेतले.मी लग्नाची पहीली बायको आहे हे माझ्या पक्ष्ाच्या सर्व पदाधिका-यांना माहिती असल्यानेच मला पक्ष्ाने सातत्याने पाठींबा दिला. अमोल यांचा दुसरा विवाह जरी माझ्या संमतीने झाला असला तरी न्यायालयात तो अवैध ठरणार असल्याचे मंजुषा यांनी सांगितले.

महिलांना आत्मसन्मान मग पुरुषांना प्रतिष्ठा नाही का?
नागपूर शहरातील एखाद्या कुटुंबाचे अतिशय खासगी आयुष्य असे चव्हाट्यावर येणे कितपत नीतीमत्तेला धरुन होते?असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.स्त्री ही आपल्या आत्मसन्मानासाठी पेटून उठते मात्र पुरुषालाही समाजात प्रतिष्ठा नसते का?काल कार्यक्रमस्थळी झालेला प्रकार हा टाळता आला असता,यामुळे अमोल भूरे यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का लागला नसता.आता सुषमा यांनी जरी पुढे-मागे पतीविरुद्धचे गुन्हे मागे घेतले तरी नात्यातील निर्माण झालेला दूरावा….भरुन निघू शकेल का?पौगंडावस्थेच्या अतिशय संवेदनशील वयात असणारी या दोन्ही पत्नींची चारही मुले…..यांच्या भविष्याचा विचार,त्यांचाही समाजात सन्मानाने जगण्याचा विचार…इर्थपर्यंत मनाची,बुद्धीची,विचारांची झेपही एखाद्या आईचीच पोहोचू नये यासारखे दूसरे दूर्देव ते कोणते?असेच आता म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या