फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमित्र 'अंक' मदत करणारे, शत्रू 'अंक' परीक्षा घेणारे.....

मित्र ‘अंक’ मदत करणारे, शत्रू ‘अंक’ परीक्षा घेणारे…..

Advertisements

डॉ. सुनीता जोशी यांनी गुंफले ‘अक्षयदान’ चे तिसरे पुष्प

नागपूर,ता. १६ मे:, अंकशास्‍त्र किंवा संख्‍याशास्‍त्र हे आपल्‍याशी जन्‍मापासून जोडले गेलेले असतो. 1 ते 9 हे अंक आपल्‍या जीवनावर परिणाम करत असतात. मूलांक हा त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये सतत पाठपुरावा करत असतो. शाळेचा दाखला, पॅनकार्ड, आधार कार्ड, बँकेचे नंबर, कारचा नंबर, भेटणा-या व्‍यक्‍तींचे नंबर याचे साधर्म्य असते. मित्र नंबर तुम्‍हाला मदत करतात, तर शत्रू नंबर तुमची परीक्षा घेत असतात, असे मत अंकशास्‍त्राच्‍या अभ्‍यासक डॉ. सुनीता जोशी यांनी व्‍यक्‍त केले.

पत्रभेटच्‍या अक्षयदान या व्‍याख्‍यानमालेचे रविवारी तिसरे पुष्‍प गुंफण्‍यात आले. नागपूरच्‍या डॉ. सुनीता जोशी यांनी ‘अंकशास्‍त्र’ विषयावर भाष्‍य केले.

एक नंबर हा सूर्याचा असून या व्‍यक्‍ती सकारात्‍मक असतात. कष्‍टाने स्‍वत:चे जीवन घडवतात. दोन नंबर हा चंद्राचा असून एक नंबरच्‍या अगदी विरोधी असतो. सुस्‍वभावी, हसतमुख अशा या लोकांकडे इतर लोक पटकन आकर्षित होतात. अमावस्‍या पौर्णिमेला स्‍वभाव शांत ठेवला पाहिजे. तीन नंबर गुरूचा असून हे लोक शांत गंभीर, सृजनशीनल असतात. आईवडिलांचा गुरूजनांचा सन्‍मान करतात, असे म्‍हणत डॉ. सुनीता जोशी प्रत्‍येक अंकाचा स्‍वभाव, गुणधर्म सांगिेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मोनिका देशपांडे यांनी केले.

शनिवारी पुण्‍याच्‍या श्री वासुदेव निवासचे देवीदास जोशी यांनी ‘प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रणीत मानस पूजा
‘ या विषयावर आपले विचार मांडले. त्‍यांनी दत्‍तगुरू परंपरेतील वासुदेवानंद सरस्‍वती स्‍वामी महाराज यांच्‍या कार्याचा गौरव केला. त्‍यांनी निर्गुण निराकार ईश्‍वराची पूजा कशी करायची याचे सुंदर वर्णन केले आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या. त्‍यांनी वासुदेवानंद सरस्‍वती महाराजांच्‍या मानसपूजेबद्दल विस्‍ताराने सांगितले. या कार्यक्रमाला सद्गुरूदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रसन्न बारलिंगे यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या