

नागपूरकर मतदार:मतदानात गारोगार
डॉ.ममता खांडेकर
(Seniour Journalist)
नागपूर: लोकशाहीचा सर्वात मोठ्या महोत्सवात मतांची समिधा वाहणारे नागपूरकर मतदार यांनी नागपूरातील सहा ही विधानसभा मतदारसंघात काल सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानात आपल्या मनातला कौल नेहमीप्रमाणेच कोणालाही लागू दिला नाही. मात्र देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतदान करणारे महाभाग हे सहाही विधान सभेत लक्ष् णीय संख्येत होते असे खात्रीलायक वृत्त आहे.
पश्चिम नागपूर मधील काही मतदार केंद्राचा मागोवा घेतला असता,उच्चभ्रू मतदार हा जरी कमी संख्येने मतदानास बाहेर पडला तरी त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला असता,आम्ही मोदींच्या नावावर मतदान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी हे खूप चांगले काम करतात आहे,असे त्यांचे म्हणणे होते. बहूसंख्यांक मध्यम वर्गीय मतदारांचा कल ही मोदी व त्यानंतर फडणवीस यांच्या चांगल्या प्रशासनाकडे होता. मात्र कुंभारटोली, संगम चाळ,फकीरावाडी इ.सारख्या स्लम भागातील निम्म वर्गाच्या मतदारांनी बहूसंख्य प्रमाणात पश्चिममधील कुर्वेज न्यू मॉडल, दिनानाथ हायस्कूल,सुळे हायस्कूल इ.मतदान केंद्रात पंजाला वोट दिल्याचे सांगितले.यामागील कारण विचारले असता ‘परिवर्तन चाहीये ना!’असे त्यांचे उत्तर होते. परिवर्तन नेमके कशाच्या संदर्भात पाहीजे?या प्रश्नाचा मागोवा घेतला असता,भाजपने एवढे कामे केले मात्र रोजगार नाही दिला,नोकऱ्यावर पाबंदी, विद्यार्थ्यांना पदव्या घेऊन ही नोकऱ्या नाही,इंजिनिअर झालेले पदवीधर मुले ५-६ हजारात नोकरी करीत असल्याचे काही महिला मतदारांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांचे लग्न झाले आहेत, ५-६ हजारात एवढ्या महागाईत तुम्ही तरी घर चालवून दाखवा,असा उलट प्रश्न सुजाण मतदारांचाच होता!

निम्म मध्यम वर्गीय मतदारांचा मनाचा कौल घेण्याचा प्रयत्न केले असता,मेट्रो आली,रस्ते बनले पण हाताला काम?विदेशातून कर्ज घेऊन मेट्रो बनवली हे देखील या मतदारांच्या लक्ष्ात होते, किंबहूना त्यांच्या पर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोहोचवण्यात विरोधकांना यश आले होते,याचेेच हे गमक आहे. या वर्गातील तरुणाईशी संवाद साधला असता,हे सरकार तर म्हणते ‘पकोडे तलो….’पकोडे तळण्यासाठी शिक्ष् ण घेतले का याचा रागही मतदानात चांगलाच उमटला.पाच वर्षात भाजपच्या नगरसेवकांनी एकदाही येऊन कधी कुंभार टोली किंवा प्रभागाची सूध घेतली आहे का?असा प्रतिप्रश्न मतदारांचा होता. पश्चिम मतदार संघात अनेक केंद्रावर ‘नोटा’हा पर्याय दाबण्यात आल्याचे सांगण्यात आले. या केंद्रावर तर सोनेगाव येथे राहायला गेलेले ही काही मतदार खास पंजाचे बटन दाबायला धंतोलीत पहोचले. मनीष नगर जवळील महाजन नगर वस्तीतील मतदार देखील दिनानाथ शाळेत एवढ्या लांबून मतदान करण्यास आली होती,त्यांनी देखील पंजाला वोट दिले असल्याचे सांगितले. या मतदार संघात भाजपचे सुधाकर देशमुख हे तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहे तर काँग्रेसचे विकास ठाकरे मागील निवडणूकीचा वचपा भरुन काढण्यास पूर्ण ताकदीने लढत देत आहेत. या केंद्रावर भाजपच्या परंपरागत मतदारांनी मात्र भाजप पुढीलच बटन दाबले असल्याचे सांगितले.त्यांची संख्या पंजाचे बटन दाबणारे मतदारांपेक्ष्ा निश्चतच कमी होती हे मात्र खरे.
लोकसभेच्या तुलनेत नागपूरात एक टक्का मतदान घसरले आहे. यावेळी देखील मृत मतदारांची नावे यादीत असणे, पत्ता बदलला असणे, बाहेर गावी असणे इ.अनेक कारणांमुळे नागपूर जिल्ह्यात एकूण ५७.१९ टक्के एवढेच मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मंगळवारी पत्र परिषदेत सांगितले. असे असले तरी नागपूरकर मतदार यांच्यात या निवडणूकीसाठी उत्साह नव्हता हे देखील तितकेच खरे आहे. भाजपला जे काही मतदान झाले ते मोदींच्या प्रतिमेवर झालेत तर काही आमदारांच्या प्रतिमेवरही झाले. पाच वर्षात त्यांचे संबंध मतदारांशी कसे होते,याचीही दखल मतदारांनी घेतली होती. काँग्रेस तर याही निवडणूकीत गटा-तटात विखुरली होती,नागपूरातील सहा मतदार संघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढत असले तरी ‘कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता’. काँग्रेसचे उमेदवार आपापली लढाई आपापल्या परीनेच लढत होते. दूसरीकडे तळागाळापर्यंत पोहोचलेलं भाजपच नेटवर्क आणि संघटन कौशल्याचे यावेळी देखील त्यांच्या विरोधकांनीही दबक्या आवाजात कौतूक केल्याची चर्चा आहे. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ही लढाई त्याची स्वत:ची समजून याही निवडणूकीत स्वत:ला झोकून दिले असल्याचे दृष्य बघायला मिळाले. गुरुवार दि.२४ ऑक्टोबर रोजी ईव्हीएम मशीन यातून निघणारे निकाल हे धक्कादायक असतील की परिवर्तनाची नांदी ठरणारे असेल,याची उत्सूकता उमेदवारां इतकीच आता मतदारांना देखील आहे.

भावी पिढीला उत्तर देण्यासाठी ‘नोटा’-
मेडीकलचा एक विद्यार्थी याच केंद्रावर मुंबईहून फक्त ‘नोटा’दाबायला आला होता. कुर्वेज न्यू मॉडल हे त्याचे मतदार केंद्र होते,मीच नाही तर डॉक्टर असणारे माझे पालक, माझ्या संपूर्ण नातेवाईकांनी ‘नोटा’पर्याय निवडला असल्याचे या तरुणाईने सांगितले. तो मुंबईत मेडीकलच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. ऐंशीच्या दशकात जेव्हा मंडळ-कमंडळ झाले तेव्हाच अनारक्षित वर्गाने आंदोलन केले असते तर आमच्या पिढीला हा अन्याय भाेगावा लागला नसता,मात्र जी चूक आमच्या पालकांनी केली तीच आम्हाला करायची नाही,आमची अपत्ये पुढे हेच विचारेल महाराष्ट्रात जेव्हा ५० टक्क््यांच्यावर आरक्ष् ण गेलं तेव्हा तुम्ही काय केलं? आम्ही व्यवस्था नाही बदलू शकत,आमची मेजोरिटी नाही आहे,मात्र आम्हाला या सरकारला एक संदेश द्यायचा आहे, मी केलेले मतदान हे कोणाच्याही विरोधात नव्हते किवा समर्थनार्थ नाही, फक्त इतकंच सांगणार आम्हाला याच देशात राहायचे आहे त्यामुळे आम्हाला याच देशात राहून परिवर्तन घडवून आणावे लागेल. विजयी उमेदवारांनी नोटामुळे मताधिक्याची मार्जिन कमी झाल्यास याची नोंद घ्यावी असा सल्लाही या तरुणाईने दिला.
फर्स्ट टाईम वोटर मतदान यंत्रणेवर खूश-
अनेक नवमतदार हे पहील्यांदा मतदान केंद्रावर पोहोचले.मनात धाकधूक होती तरीही त्यांच्याकडील मतदार ओळख पत्र घेऊन मतदान केंद्रातील कर्मचारी यांनी त्यांचे योग्य ते मार्गदर्शन केले,कुठे जावे,कोणत्या क्रमाकंच्या खोलीत जावे, खोलीत उपस्थित असणारे कर्मचारी यांनी देखील त्यांना योग्य सहकार्य केल्याने अनेक नवमतदार यांनी ही खास प्रतिक्रिया ही आवर्जून नोंदवली.
लोकसभेचा उत्साह नदारद-
लोकसभेची निवडणूक नुकतीच मे महिन्यात पार पडली मात्र लोकसभेच्या मतदारांचा उत्साह हा विधानसभेत गोरोगार होता. अनेक मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,भाजपच्या समोर प्रबळ विरोधी उमेदवारच नसल्याने ‘पुन्हा’ भाजपला मत दिल्याचे सांगितले. आमच्यासमोर इतर पक्ष्ांनी योग्य उमेदवार दिला असता तर आम्ही त्यांना मतदान केले असते,आमच्या समोर पर्यायच नव्हता असेही काही मतदारांनी सांगितले. पुढील वेळी विरोधी पक्ष्ाने चांगला उमेदवार दिल्यास आम्ही त्यांना मत देऊ असे सांगून सत्ताधाऱ्यांना आधीच सावध केले आहे.
जातीच्या नावावर राजकरण नापसंद-
अनेक मतदान केंद्रात जातीच्या नावावर मतदान होण्यावर मतदारांनी नापसंदी दर्शवली. विकास सर्वच क्ष्ेत्रात सारखाच झाला पाहीजे याकडे ही लक्ष् वेधले. ‘नोटा’चा पर्याय सर्वात शेवटी ठेवला होता असेही काही मतदारांनी सांगितले. उमेदवारा पुढील बटन दाबताना पाच वर्षांच्या कामाचे मूल्यांकन केले असे अनेक मध्यमवर्गीय मतदारांनी कबूल केले. दिवाळी सारखा सण तोंडावर आला असताना ‘मतदान तर करणार पण मनातलं नाही सांगणार’ असे ही अनेकांनी सांगितले. अनेक मतदारांनी, भाजपसाठी ही नेहमीसारखी एकतर्फी लढत नव्हती,विरोधी उमेदवारांनी निवडणूकीत रंगत आणली असल्याची मिश्किली ही केली.
पूर्वमध्ये फटाके!
मतदानाची कायदेशीर घटिका संपताच,रात्री मध्य मध्ये एका तगड्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच फटाक्यांचा बार उडवून जल्लोष केला. जणू पूर्व मधील संपूर्णच्या संपूर्ण मतदान केंद्रात त्यांच्याच उमेदवारांना सगळीच्या सगळी मते मिळाली असल्यासारखा तो जल्लोष होता, ‘उताविळ नवरा गुडघ्याला बाशिंग’हा प्रकार मात्र अनेक मतदारांना रुचला नसल्याचे खात्रीशीर सुत्राकडून कळले. मतदानाचा अधिकृत निकाल यायला फक्त्र दोनच दिवसांचा अवधी असताना,कार्यकर्त्यांनी आपल्या वारु उधळून टाकणाऱ्या उधाणाला आवर घालायला हवे होते अशी नाराजी सुजाण नागरिकांनी उघडपणे बोलून दाखवली.
मध्यमध्ये शक्ती प्रदर्शन!
मध्यमध्येही एका तगड्या उमेदवाराने या मतदार संघातील तीनशेहून अधिक केंद्रावर आपल्या सत्तर-ऐंशी कार्यकर्त्यांसोबत हजेरी लावून चांगलेच शक्ती प्रदर्शन केले. अगदी गल्ली-बोळ्यातील केंद्रातही दाटीवाटीने ते कार्यकर्त्यांसोबत घूसले.याच मतदारसंघात ‘चुनावी आखाडा‘ या एका खाजगी कार्यकमात चांगलाच राडा झाला होता. या मतदार संघात हलबा समाज एकटवला असून भाजपतर्फे येथे विकास कुंभारे पुन्हा रिंगणात आहेत. यावेळी ते २८ हजारची लीड घेऊन विजयी होतील असा दावा येथील अनेक हलबा बांधवांनी केला आहे. काँग्रेसतर्फे येथे बंटी शेळकेंने चांगलाच जोर लावला असला तरी विजयी उमेदवारांची लीड किती हजारांची राहील यावर त्यांचे पुढचे राजकीय भवितव्य निर्भर असल्याचे बोलले जाते.
नागपूरातील सहा मतदार संघातील अशी आहे मतदानाची टक्केवारी-
दक्ष्णि-पश्चिम-४९.८७ टक्के
दक्ष्णि नागपूर-५०.३० टक्के
उत्तर नागपूर-५३.३० टक्के
मध्य नागपूर-५०.६४ टक्के
पश्चिम नागपूर-४९.२२ टक्के
उत्तर नागपूर-५०.७६ टक्के




आमचे चॅनल subscribe करा
