

५ जानवेरीपर्यंत सादर होणार अहवाल:बहूचर्चित ॲड.अंकिता शाह मारहाण प्रकरण
नागपूर,ता. १८ डिसेंबर: लकडगंज पोलीस ठाण्यात लॉक डाऊनच्या काळात ॲड.अंकिता शाह तसेच त्यांच्या पतीला झालेल्या मारहाणीचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला होता. या विरोधात ॲड.अंकिता शाह या प्रदीर्घ लढाई लढत आहे.त्यांच्या या प्रकरणाची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने देखील घेतली होती.नुकतेच या आयोगासमोर झालेल्या सुनावणीत आयोगाने ॲड.अंकिता शाह यांच्या प्रकरणात पोलीसांतर्फे सादर झालेला अहवाल हा पक्ष् पात पूर्ण असल्याचा ठपका ठेवीत स्वतंत्र समितीमार्फत पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला.
या प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त भालचंद्र मुंढे यांनी आयोगासमोर पाेलीसांची बाजू ठेवली होती.सदर घटना,चौकशी अहवाल तसेच केलेली कारवाई इ.चा तपशील सादर केला होता मात्र या तपशीलात अॅड. अंकिता शाह यांच्या पतीला लकडगंज पोलीस ठाण्यात झालेल्या लाथेने मारहाणीचा कुठेही उल्लेख नव्हता,याशिवाय ॲड.अंकिता शाह यांनी तक्रारीत नमूद केलेल्या अनेक बाबींचा उल्लेख हेतूपुरस्सर टाळण्यात आला होता,हे ॲड. अंकिता शाह यांनी आयोगाच्या लक्ष्ात आणून दिलेत तसेच या बाबींचे व्हिडीयो फूटेज आयोगासमोर सादर केले.
परिणामी आयोगाने पोलीसांतर्फे सादर करण्यात आलेला अहवाल हा पक्ष् पाती ठरवून नव्याने या संपूर्ण घटनेचा तपशील आयोगासमोर ठेवण्यासाठी आयोगाच्या अधिकारकक्ष्ेत स्वतंत्र चौकशीची चमू निर्धारित केली.तसा आदेशच आयोगाने पारित केला तसेच हा संपूर्ण अहवाल या चमूला येत्या ५ जानेवरीपर्यंत आयोगासमोर सादर करण्याचे आदेश दिले.
ॲड.रिझवान सिद्धीकी यांनी ॲड.अंकिता यांची बाजू अतिशय दमदारपणे आयोगासमोर मांडली,ॲड.सिद्धीकी हे सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रानौत यांचे देखील वकील आहेत व न्यायालयात मुंबई मनपाविरुद्ध रानौत यांची बाजू मांडत आहेत.सिद्धीकी यांनी पोलीसांच्या अहवालातील अनेक त्रूटींकडे आयोगाचे लक्ष् वेधले.
लकडगंज पोलिस ठाण्यात ॲड.शाह व त्यांचे पती हे तक्रार नोंदवण्यासाठी घरातील साध्या कपड्यांवरच गेले असता.वरिष्ठ पोलीस निरीक्ष् क हिवरे यांनी यावर आक्ष्ेप नोंदवित शाह दाम्पत्याला या बाबीसाठी देखील मारहाण केली होती.ॲड.सिद्धीकी यांनी कोणते कपडे घालून फिर्यादींनी पोलीस ठाण्यात यावे,या विषयी कोणता कायदा आहे?अशी विचारणा केली,याचे उत्तर पोलीसांची बाजू मांडणारे परिमंडळ-३चे डीसीपी मतानी यांना देता आले नाही.
मतानी यांना अायोगाचा निर्णय तरी मान्य असणार का? असा प्रश्न केला असता आयोगानी दिलेला निर्णय मान्य असणार व त्याप्रमाणे कारवाई होणार असे आश्वासन सिद्धीकी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मजानी यांनी दिले.
२७ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई येथील मानवाधिकार आयोगासमोर या प्रकरणाची पहीली सुनावणी पार पडली होती.यात ॲड.अंकिता शाह यांनी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कूमार यांनी लकडगंज पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्ष क नरेंद्र हिवरे यांना फक्त ‘कारणे दाखवा’नोटीस पाठवली .५०० रुपयांचा दंड ठोठावला तसेच हिवरे यांची बदली लकडगंजमधून अंबाझरी पोलीस ठाण्यात केल्याचे अायोगाच्या निर्दशनास आणून दिले.फक्त ‘कारणे दाखवा’ नोटीस म्हणजे कारवाई आहे का?असा सवाल करीत त्यांनी संपूर्ण न्यायाची माणगी केली आहे.
लॉक डाऊनच्या काळात आपल्या इमारतीसमोरच्या जागेत ॲड.अंकिता शहा या भटक्या कूत्र्यांसाठी दररोज अन्न व पाणी ठेवीत होत्या मात्र त्यांच्याच इमारतीमधील एका युवकाने शाह यांच्याशी वाद घालून ते अन्न व पाणी फेकून दिले.त्या युवकाची तक्रार करण्यात ॲड.शाह या लकडगंज पोलीस ठाण्यात गेल्या असता,तेथील वरीष्ठ पोलीस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे यांच्यासोबत त्यांचा चांगलाच वाद झाला,यावर पोलीस ठाण्यात उपस्थित दोन महिला तसेच हिवरे यांच्यासह पोलीस उप निरीक्ष् क भावेश कावरे यांनी ॲड.शाह यांना जबर मारहाण केली,त्यांचे पती याची व्हिडयो रेकॉर्डिंग करीत असल्याने त्यांचा देखील मोबाईल हिसकावून घेण्यात आला व त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती.
या घटनेमुळे राज्यात पोलीसांची प्रतिमा चांगलीच खराब झाली.माजी केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांनी देखील या बाबीची दखल घेत पोलीस आयुक्तांना दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणारे पत्र लिहले होते.ही घटना घडल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपर्यंत घटनेचे सीसीटीव्ही फूटेज मिळावे यासाठी ॲड.शाह यांनी योग्य प्राधिकरणाकडे प्रदीर्घ लढा दिला होता,हे विशेष.
आता त्यांना राज्य मानवाधिकार आयोगाकडून दोषींवर योग्य कारवाई होण्याची आशा असून आपल्या आत्मसन्मानाची ही लढाई जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे खास ‘सत्ताधीश’ला त्यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
