फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमानकापूर उड्डाणपूलावर भीषण अपघात

मानकापूर उड्डाणपूलावर भीषण अपघात

Advertisements
सिंगल लेनने केला घात

व्हॅन चालक व शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू: वॅनचालकाच्या शेजारी बसणे ठरले घातक
१४ विद्यार्थी जखमी
गडकरी,बावणकुळेंना हवे नागपूरात आणखी दोन उड्डाणपूले!
नागपूर,ता.१२ सप्टेंबर २०२५: मानकापूर चौकात उड्डाणपूलावरील मॅक्स रुग्णालयाच्या अगदी विरुद्ध असलेल्या ठिकाणी सकाळी साढे आठ ते पावणे नऊ वाजता दरम्यान स्कूल बस व स्कूल वॅनचा भीषण अपघात होऊन यात वॅन चालकाचा मृत्यू झाला.सोबतच वाहन चालकाच्या शेजारी बसलेल्या १४ वर्षीय विद्यार्थिनीचा देखील मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज मानकापूर उड्डाणपूलावर घडली.महत्वाचे म्हणजे वॅन चालकाच्या शेजारी दोन विद्यार्थी बसले होते,असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले,दूस-या विद्यार्थ्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्या जात आहे.ही स्कूल वॅन भवन्स शाळेची होती.या अपघातात ९ विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले आहेत.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ओरिएंटल कंपनीतर्फे मानकापूर उड्डाण पूलावर दुरुस्तीचे काम सुरु असल्याने एवढ्या रहदारीच्या पुलावर एकतर्फी वाहतूक सुरु आहे.मात्र,ज्या गोष्टीची भीती होती तेच आज घडले.एकतर्फी वाहतूकीमुळे स्कूल बस वर स्कूल वॅन वेगात धडकली.
प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्याप्रमाणे हा उड्डाणपूल दुस-यांदा तुटला असून गेल्या दहा महिन्यांपासून एक लेन बंद असून एकतर्फी वाहतूक सुरु आहे.एवढ्या रहदारीच्या मार्गावर कंत्राटदार एवढ्या संथ गतीने काम करीत आहे.याचा अर्थ कंत्राटदार हा समर्थ नाही किंवा पैशांची त्याला अडचण असावी,असा आरोप अपघातानंतर घटनास्थळी आंदोलन करणा-यांनी केला.
स्कूल वॅनचा चालक हा अवघा २४ वर्षांचा असल्याचे वास्तव समोर आले आहे.सकाळी पावणे नऊच्या सुमारास स्कूल बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वॅन चालकाने स्कूल बसला धडक दिली.रितिक घनश्‍याम कनोजिया (वय वर्ष २४, राहणारा सदर) असे मृत वॅन चालकाचे नाव आहे तर सान्वी देवेंद्र खोब्रागडे(वय वर्ष १४ )असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.सान्वी भारतीय विद्या भवन्सच्या कोराडी शाखेत नवव्या वर्गातील विद्यार्थिनी होती.

आज शुक्रवारी सकळी पावणे नऊच्या सुमारास भवन्सच्या कोराडी शाखेत जाण्यासाठी स्कूल वॅन(एमएच ३१ ईएम ००३६)मानकापूर चौकातून शाळेच्या दिशेने जात होती.महत्वाचे म्हणजे या वॅनमध्ये केजी १ पासून तर नववीतील ९ विद्यार्थी बसले होते.याच वेळी नारायणा स्कूलच्या दिशेने स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना व्हॅन चालकाने वाहनाचा वेग वाढवला.स्कूल बसला ओव्हरटेक केल्याने त्याची वॅन स्कूल बसला धडकली.यात वॅनचा समोरचा भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला.

त्यात अडकल्याने चालक गंभीर जखमी झाला.त्याच्याच जवळ सान्वी बसली होती.त्यामुळे तिलाही गंभीर दुखापत झाली.तिला मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र,तिची प्राणज्योत मावळली.याशिवाय या रुग्णालयात काव्य संजय केदार,रियांशिका शेंडे,अधीराज देवेंद्र खोब्रागडे या तीन विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.
तसेच कुणाल हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलेल्या श्रीजा आणि स्वयंम या विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली असल्याची माहीती समोर आली आहे.याच रुग्णालयात ह्दया कुणाल सूर्यवंशी,यश विनोद मेश्राम यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन,तपास सुरु केला आहे मात्र,अद्याप घटनेच्या एफआयआरची प्रत मिळू शकली नाही.
नागपूरात नव्या उड्डाणपूलाची भर!

एकीकडे नागपूरात जुन्या उड्डाणपूलांचा भाग कोसळत असताना,आज नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बोले पेट्रोल पंप ते रातुम नागपूर विद्यापीठपर्यंतच्या उड्डाणपुलाचे भव्य लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते सायंकाळी साढे सहा वाजता झाले.याच समारंभात फडणवीस यांनी गडकरी यांच्यावर स्तुती सुमने उधळीत ,गडकरी यांनी देशाच्या इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्राला आकार देत नागपूर महानगरचा कायापलट करुन दाखवला असल्याचे सांगितले.नागपूरात देश-विदेशातील जे शिष्टमंडळ भेटीला येतात.ते येथील पायाभूत सुविधा पाहून अवाक होत विविध करारासाठी,उद्योग विश्‍वासाठी विश्‍वासाने पुढे येत असल्याचे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले!पायाभूत परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता उच्च तंत्रज्ञानातही आघाडीवर असलेले महानगर घडवू,असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.असे असले तरी घरुन पालकांना टाटा करुन शाळेसाठी निघालेल्या काही निष्पाप विद्यार्थ्यांच्या नशीबी, उच्च तंत्रत्रानावर आधारीत शहरातील विविध उड्डाणपूलांवरुन सुरक्षीत प्रवास आज आलाच नाही!
आता उड्डाणपूल म्हटले की नागपूरकरांच्या मनात धडकी भरते हे वास्तव आहे.पारडी,दिघोरी ते इंदोरा,अमरावती महामार्ग,रामझुला,लक्षमण झुला,पाचपावली,एअरपोर्ट उड्डाणपूल,बुटीबाेरी इत्यादी उड्डाणपूलांवरील स्लॅब कोसळणे,अनेक मीटरच्या भेगा पडणे अश्‍या जोखिमेतून नागपूरकर आधीच जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करीत असताना,मेडीकल चौकात आणखी एका उड्डाणपुलाची घोषणा आज गडकरी यांनी केली!गेल्या दहा महिन्यांपासून अत्यंत रहदारीचा मानकापूर उड्डाणपूलाची दुरुस्ती कंत्राटदार करीत नसल्यानेच आज एका निरागस विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला. तिच्या पालकांची व कुटूंबियांची मानसिक अवस्था शब्दात ही वर्णिता येत नाही,तरी देखील मेडीकल चौकात भव्य उड्डाणपूल साकारुन दिल्लीच्या पालिका बाजाराच्या धर्तीवर मोठे मार्केट उभारण्याचा सूताेवाच आज गडकरी यांनी केला.
मूळात अश्‍या भव्य बाजारपेठ तसेच आणखी एक उड्डाणपूलाची मागणी नागपूरकरांनी केली आहे का?आणखी काही शेकडो कोटींचा बोजा नागपूरकरांवर लादण्यास उत्सूक असलेल्या नेत्यांना मात्र, शहरात आहे त्या उड्डाणपूलावरुन नागपूरकरांचा सुरक्ष्त प्रवास खिजगणतीतही नाही,असा संताप व्यक्त केला जात आहे.
बावणकुळेंना हवा कोराडी रोडवर आणखी एक उड्डाणपूल!
गडकरी यांच्या अथक प्रयत्नातून हे महानगर या देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून ओळखल्या जाईल,असा विश्‍वास व्यक्त करीत,कोराडी रोड कडून भोसला मिलट्री टी-पॉईंटवर उड्डाणपूलाची मागणी या उद्घाटना समारंभाप्रसंगी बावणकुळेंनी गडकरींना केली.बावणकुळेंची मागणी मान्य करुन या पूलाची घोषणाच पूलकरी गडरकरी यांनी केली!
……………………………..
.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या