फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममाझ्यावरील आरोप खोटे:रुबिना पटेल

माझ्यावरील आरोप खोटे:रुबिना पटेल

Advertisements

 

नागपूर,ता.२३ फेब्रुवारी २०२२: आज २३ फेब्रुवारी ला फिरदौस खान व त्यांच्या चार बहिणींनी पत्रपरिषद घेऊन आबू खान व त्यांच्या परिवाराच्या विरोधात जी तक्रार केली आहे व माझ्यावर जो आरोप केला ते सर्व खोटे असल्याचा खुलासा ज्येष्ठ समाजसेवी रुबिना पटेल यांनी पत्रकाद्वारे केला.

मी दिनांक २९ ऑगस्ट २०२१ ला मोठा ताजबागच्या आसपास कोरोना कुटुंब पुनर्वसन समितीच्या कामासाठी, कोरोना विधवांच्या गृह भेटीसाठी तसेच वस्तीतील समस्या जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे गेले होते. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि गेली अनेक वर्ष महिलांच्या प्रश्नावर काम करीत आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये आम्हाला शासनाने विलगीकरण केंद्रांमध्ये समुपदेशनासाठी पाठविले. त्यानंतर आमच्या संस्थेतर्फे आम्ही राशन किट वाटप करण्यापासून कम्युनिटी किचन दीड वर्षापर्यंत चालविले. ज्यामध्ये दररोज ५० च्या जवळपास महिलांना जेवण देत होतो .त्याचप्रमाणे कोरोना विधवांसाठी शासनाने धोरण जाहीर करावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा करत होतो. जिल्हाधिकार्‍यांना मंत्र्यांना, निवेदने देत होतो. झूम मीटिंग्ज घेत होतो .त्याच प्रमाणे एक किंवा दोन्ही पालक गमाविलेल्या मुलांचे संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजनांचा फॉर्म भरत होतो. आम्ही आमच्या संस्थेतर्फे गुगल फॉर्म तयार केले ८० च्या जवळपास ई-मेल द्वारा आलेले फॉर्म्स शासनाला सादर केले त्यानंतर कोरोना काळामध्ये जास्तीच्या आलेल्या बिलांचे सोशल ऑडिट करण्यासाठी तसेच ९ जणांची केस तयार करून आम्ही जन आरोग्य अभियानामार्फत शासनाला पाठवले.

मी ज्या दिवशी तक्रारकर्ती महिलेकडे गेले तेव्हा त्यांना बहुतेक गैरसमज झाला . त्यांनी (घर मालकांनी )माझा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मला शंका आली. मी त्यांना सांत्वना देऊन सांगितले की घाबरू नका मी एका संस्थेतर्फे आली आहे. त्यांचा व्यवहार बघून मी परत आले.यात मला खोटी मनपा स्वास्थ कर्मचारी म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मी पोलिस आयुक्तांनाही भेटून सांगितले की,त्या व्हिडिओ मधील माझे म्हटलेले शब्द ऐकावे की मी त्यांना कुठलीही धमकी देत आहे का ? त्या तक्रारकर्ती महिलेला असे सांगितले जात आहे की माझ्या विरोधात आबू खान यांच्या गॅंगचे नाव घेऊन धमकाविल्याचे तिने तक्रार करावी. त्यांना बहुतेक मी कोण आहे हे ही माहिती नसेल. पण एक राजकीय व आर्थिक स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने मुद्दाम मला टार्गेट केले जात आहे. आम्ही संस्थेची जागा रिकामी करावी हा मुद्दा असून, माझ्या विरोधात खोटी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे मानसिक खच्चीकरण करून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी मोठ्या लोकांचे हे कारस्थान आहे,असा अारोप रुबिना पटेल यांनी केला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या