फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहेश धामेचा हे व्हाईट कॉलर आर्थिक घोटाळा टोळीचे म्होरके: धर्मपाल मेश्राम यांचा...

महेश धामेचा हे व्हाईट कॉलर आर्थिक घोटाळा टोळीचे म्होरके: धर्मपाल मेश्राम यांचा गंभीर आरोप

Advertisements


सुरक्षा रक्ष् क पुरविणा-या कंत्राटदारांसोबत धामेचा यांचा लाखोंचा गौडबंगाल

नागपूर,ता. २१ ऑक्टोबर: महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पदी महेश धामेचा विराजमान आहे त्यांनी त्यांच्या अख्यारित असणा-या नगर रचना विभागअंतर्गत निर्णय प्रक्रिया राबवताना,महापालिकेला सुरक्षा रक्ष् क पुरविणा-या किशोर एजंसी तसेच युनिटी सेक्यूरिटी या दोन्ही खासगी एजंसीसोबत संगनमत करुन दर महिन्याला लाखों रुपयांचा अपहार करीत असल्याचा अतिशय गंभीर आरोप विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी आज बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी मनपा मुख्यालयातील पंजाबराव देशमुख सभागृहात घेतलेल्या पत्र-परिषदेत केला.

याप्रसंगी महेश धामेचा हे व्हाईट कॉलर आर्थिक घोटाळ्याचे म्होरके असल्याचे विधान त्यांनी केले. याप्रसंगी बोलताना २०१८-१९ साली विधी समिती सभापती पदी रुजू झालो,यानंतर २०१९ मध्ये माझ्याकडे सामान्य प्रशासन विभागाची देखील जवाबदारी देण्यात आली, ५ सप्टेंबर २०१८ च्या बैठकीत विषय क्र.११३ च्या अनुषंगाने किशोर एजंसी तसेच युनिटी सेक्युरिटी या दोन्ही एजंसींसोबत करण्यात आलेल्या करारासंबंधी कागदपत्रे,परवाने,निविदा यात अनेक खोडतोड व संशयास्पद बाबी आढळून आल्या.त्यामुळे तत्कालीन महापौर नंदा जिचकार यांनी चौकशीचे आदेश देत एफआयआर दाखल करण्याचे तसेच १५ दिवसात आयुक्तांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र असे असतना नुकतेच याच दोन्ही एजंसींना पुन्हा कोविडच्या काळात तीन महिन्यापूर्वी निवेदेद्वारे कंत्राट देण्यात आले.१७ ऑक्टोरब रोजी यासंबधी मी प्रशासनाल पत्र लिहून या एजींसींनी मनपाला पुरविण्यात आलेले सुरक्षा रक्ष् क यांची नावे,त्यांचे कर्तव्याचे ठिकाणी,त्यांचे भविष्य निर्वाह निधीसंबधींची माहती मागवली असता मला भविष्य निर्वाहनिधी हा कर्मचा-यांची ‘खासगी‘बाब असल्याने याबाबत माहिती देऊ शकत नसल्याचे प्रशासनाने पत्राद्वारे कळविले.

मूळात मनपाच्यावतीने कंत्राटदारांचे भूगतान केल्या जातं,मग ती खासगी बाब कशी होऊ शकते?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.ज्या बाबींचे भूगतान महानगरपालिका करते अशी कोणतीही बाब ही खासगी असू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

या एजंसींला वर्षाचे साढे सात कोटी रुपये भूगतान केल्या जातं,सहायक आयुक्त महेश धामेचा हेच या संपूर्ण व्हाईट कॉलर आर्थिक घोटाळ्याच्या टोळीचे म्होरके असून ते या संपूर्ण सुरक्ष्ा रक्ष कांच्या कामाचे ठिकाण सांगू शकले नाहीत.बोगस सुरक्षा रक्ष् कांच्या नावाने महिन्याकाठी लाखोंचे गौडबंगाल गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप यावेळी मेश्राम यांनी केला.बोगस सुरक्षा रक्ष्कां च्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून हे गौडबंगाल सर्रास सुरु आहे.महत्वाचे म्हणजे,प्रत्येक सुरक्षा रक्ष् काला कंत्राटामध्ये नमूद केल्याप्रमाणे २१ हजार १२४ रुपये २६ पैसे पगार दिला जातो,मात्र प्रत्यक्षात एजंसीतर्फे या सुरक्षा रक्ष् कांची आर्थिक पिळवणूक करुन त्यांना फक्त ७-८ हजार पगार हातात दिला जातो.कष्टकरी रक्ष् कांच्या हक्काचे पैसे गबन करणारी ही टोळी गेल्या अनेक वर्षांपासून मनपात कार्यरत असून या टोळीचा म्होरक्या महेश धामेचा व शिवणकर असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.

वार्षिक स्टेशनरी साहित्यात ही लाखोंचे गौडबंगाल-
या शिवाय ५० लक्ष् रुपयांची वार्षिक स्टेशनरी मनपात मागवली जाते.यात २१५ प्रकारचे साहित्य व वस्तू मागवल्या जातात मात्र नेमक्या कोणत्या वस्तू वा स्टेशनरी साहित्य मनपात आले,याची देखील कोणतीही नोंद सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नसल्याचे धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

बिंदूनामावलीच्या अाधाराऐवजी ‘खास’माणसांना बढती-
.बिंदूनामावलीच्या आधारावर या विभागात बढती,पदोन्नती देणे बंधनकारक असताना महेश धामेचा यांनी त्यांच्या मर्जीतील खास माणसांची विविध पदांवर नेमणूक करवून घेतली असल्याचा गंभीर आरोप याप्रसंगी धर्मपाल मेश्राम यांनी केला.इतरांच्या हक्कांना डावलून भ्रष्टाचारामध्ये साथ देणा-या अधिकारी व कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली.विशेष म्हणजे मागास वर्गीयांना मोठ्या प्रमाणात वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.याबात रोटस्टर पुढे केल्या जातं मात्र या रोस्टरचा चार्जही मनपा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचीा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.दरवर्षी ४१ ते ४५ कर्मचारी यांना ‘अतिरिक्त’ठरविले जात आहे.

विशेष म्हणजे भंगार घोटाळ्यात नाव समारे आलेले राजेश भूतकर तसेच राधेश्‍याम झाडे यांच्यासोबत धामेचा ने संगनमत करुन आर्थिक मेळ बसवला.महत्वाचे म्हणजे प्रशासकीयस्तरावर सेवाज्येष्ठता चौकशी अद्याप प्रलंबित आहे.झाडे यांना तर न्यायालयात दाद मागण्यासाठी सोडून देण्यात आले मात्र भूतकर यांना धामेचा यांनी आर्थिक गौडबंगालातून संरक्ष् ण दिल्याचा आरोप मेश्राम यांनी केला.
मनपा मुख्यालयातील आर्थिक घोटाळ्यातील या संपूर्ण टोळीला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याची मागणी धर्मपाल मेश्राम यांनी केली तसेच धामेचा यांची तातडीने पदावरुन तांत्रिक बदली करुन चौकशीचा अहवाल सादर करावा,असी मागणी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या