Advertisements


महायुती सरकारचे अंतरिम बजेट
नागपूर,ता.२७ जून २०२४: आज महायुती सरकारने अंतरिम बजेट सादर केले आहे. हे बजेट खऱ्या अर्थाने महिलांना, युवकांना, आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं आहे,असे नागपूरच्या माजी महापौर व ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री अर्चना डेहनकर म्हणाल्या.
लोकनेते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त महिलांसाठी विशेष योजना सादर करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, वयाच्या २१ वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतच्या महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये देण्यात येणार आहेत. लाडली बहीण योजनेअंतर्गत वृद्ध निराधार विधवा भगिनींना महिन्याकाठी २००० रुपये मिळणार आहेत, जे पूर्वी १००० रुपये होते. याशिवाय, गरीब आणि गरजू महिलांना वर्षासाठी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
युवकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी विशेष प्राधान्य दिले गेले आहे. शेतकरी आणि शेतमजुरांसाठीही विशेष योजना सादर करण्यात आल्या आहेत. विवाहित महिलांसाठी शुभमंगल योजना देखील या बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
महिला बचत गटांसाठी विशेष प्रावधान असून, महाराष्ट्रातील सहा लाख बचत गट आहे हे बचत गट आता सात लाखा होणार आहे, त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यात येईल , महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. महिलांसाठी रिक्षा देण्याचे प्रावधान देखील या बजेटमध्ये करण्यात आले आहे
महायुती सरकारने महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या अंतरिम बजेटमुळे महिलांना, युवकांना, आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे डेहनकर यांनी सांगितले. भावाने बहिणीला दिलेल्या या भेटीबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींकडून महायुती सरकारच्या या स्तुत्य उपक्रमासाठी त्यांनी आभार व्यक्त केला.
Advertisements

Advertisements

Advertisements
