फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपामहिलांच्या सक्षमीकरणावर भर देणारा अर्थसंकल्प: अर्चना डेहनकर

महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणारा अर्थसंकल्प: अर्चना डेहनकर

नागपूर,ता.६ मार्च २०२६: महाराष्ट्र शासनाने सादर केलेला २०२६–२७ चा राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, युवा आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणारा सकारात्मक व लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया पूर्व महापौर व महाराष्ट्र भाजपा सचिव अर्चना डेहनकर यांनी व्यक्त केली.
या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना, शेतीसाठी आवश्यक सुविधा, तसेच ग्रामीण विकासाला चालना देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठीही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.तसेच युवांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यावर सरकारने विशेष भर दिला आहे. या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास अर्चना डेहनकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राची संत, समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांची परंपरा ही राज्याची मोठी ताकद आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून विकासाच्या योजना राबवण्याचा सरकारचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. या माध्यमातून समाजात समता, स्वच्छता, सामाजिक न्याय आणि विकासाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास अर्चना डेहनकर यांनी व्यक्त केला.
राज्याच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरेल,असेही त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री पदावरून वित्तमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला असून याबद्दल अर्चना डेहनकर यांनी यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले व सर्वसमावेशी अर्थसंकल्पाबाबत त्यांचे आभार मानले.
…………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या