

नागपूर: केंद्रिय नेतृत्व व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने निवडणूकीपूर्वीच आणि निकाल लागल्यानंतरही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार,याविषयी ठाम भूमिका स्पष्ट केली होती त्यामुळे मला अजूनही वाटतं की महाराष्ट्रात युतीचंच सरकार येईल. युतीचं सरकार स्थापन झाल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?या प्रश्नावर बोलताना ज्यांनी गेली पाच वर्ष महाराष्ट्राचे राज्य उत्तमरित्या चालवले, उत्कृष्ट प्रशासन चालवले,राज्यातील दुष्काळाची परिस्थती उत्कृष्टरित्या हाताळली, मराठ्यांच्या आरक्ष् णाचा प्रश्न कौशल्याने सोडवला तेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,असे विधान उर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात,गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी पीक संबधी आढावा बैठकीनंतर आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी सध्या महाराष्ट्रात उद् भवलेल्या अभूतपूर्व राजकीय कोंडीविषयीच्या प्रश्नांना मनमोकळे उत्तर दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर महाराष्ट्र राज्याला मिळालेले गॉड गिफ्ट आहेत’. पुढील सरकारचं नेतृत्व ही तेच करतील. युतीतील शिवसेना ही मुख्यमंत्री पदासाठी अडून बसली आहे याकडे लक्ष् वेधले असता, हा नैसर्गिक नियम आहे की ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष्ाला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री हा देखील भाजपचाच होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष्ाध्यक्ष् व गृहमंत्री असणारे अमित शहा यांनी निवडणूकीच्या काळात जाहीर केले होते,फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री असणार आहेत.
महाराष्ट्रात सरकार कधीपर्यंत स्थापित होईल?या प्रश्नावर बोलताना ‘उद्यापर्यंत वाट पहा,उद्यापर्यंत नक्कीच हा तिढा सुटेल’असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेने मतदानाच्या माध्यमातून सरकार बनवण्यासाठीच मतदान केले आहे. या १२ कोटी जनतेच्या आशा-आकांक्ष्ेला अनुरुप सरकार लवकरच स्थापन होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुढील प्रदेशाध्यक्ष् म्हणून तुमच्या नावाची चर्चा सुरु आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना ‘मी १९९२ पासून पक्ष्ाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचे ते म्हणाले. पक्ष्ाने आजपर्यंत जी-जी जबादारी सोपवली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मला कुठलीही जबाबदारी दिली तरी आयुष्य लाऊन प्राणपणाने मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात विविध जबाबदारी पार पाडताना मी पूर्णपणे यशस्वी झालो,असा दावा मी करणार नाही मात्र प्रदेशाध्यक्ष् पदाच्या रेसमध्ये मी नाही आहे,असा खुलासा त्यांनी केला. पण प्रदेशाध्यक्ष् पद स्वीकारण्याची तयारी आहे का? या प्रश्नावर बोलताना,मी त्या पदावर दावा केलेला नाही,पक्ष् जी काही जबाबदारी सोपवेल ती स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेकडून तुम्हाला काही ऑफर मिळाली का?या प्रश्नावर बोलताना, मी भाजपचा एक सच्चा कार्यकर्ता आहे,मला कोणीही,कितीही ऑफर दिल्या तरी किवा गळाला लावण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही. माझ्यासाठी माझा पक्षच हा सवर्तोपरी आहे. नितीन गडकरी हे मला वडीलांसारखे आहे तर फडणवीस हे मला भावासारखे आहेत. पक्ष्ाने मला भरपूर काही दिले. प्रतिष्ठा दिली,सन्मान दिला. आज पक्ष्ाचा एक छोटासा कार्यकर्ता तुमच्यासमोर बसून पत्र परिषद घेतोय,ही संधी मला दिली,याहून मोठा सन्मान तो काय असणार?असे ते म्हणाले.
दुपारी ३ वा. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्र परिषदेत महाराष्ट्रात संवैधानिक दहशतवाद हा खपवून घेतला जाणार नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे का?या प्रश्नावर बोलताना, मला अजूनही आशा आहे महाराष्ट्रात युतीचेच सरकार येईल,अशी ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली.




आमचे चॅनल subscribe करा
