फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्राच्या डीएनएमध्ये विलासराव देशमुख!

महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये विलासराव देशमुख!

Advertisements
समाज माध्यमांवर रवींद्र चव्हाणांना सडेतोड उत्तर
चव्हाण यांचे वक्तव्य ‘विकास कामांच्या’संदर्भात:मुख्यमंत्र्यांची मखलाशी
नागपूर,ता.२०२५: राजकारणासाख्या क्षेत्रात दूरदर्शी,संयमी,प्रेमळ व सतत हसतमुख व्यक्तिमत्वाचे नाव घेताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे एकमेव नाव समोर येतं.२६ मे १९४५ साली जन्मलेल्या विलासराव यांचा मृत्यू १४ ऑगस्ट २०१२ रोजी चेन्नईच्या ग्लोबल रुग्णालयात किडनी व मूत्रपिंडाच्या आजारामुळे झाला.ते आता जगात नाही तरी देखील अचानक या नावाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात व समाज माध्यमात रंगली आहे.
१९७४ साली ते बाभळगाव ग्रामपंचायच्या सरंपच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरु करणारे विलासराव देशमुख हे १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३ व १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ या काळखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहीले आहेत.पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात २००९ सोली अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री देखील ते राहीले आहेत.
ते उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य,लातूर तालुका पंचायत समिती सभापती तसेच युवक काँग्रेस नेते होते.१९८० मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.१९८० ते १९९० या दशकात ते ग्रामविकास,कृषी,सहकार,उद्योग,शिक्षण,गृह,परिवहन अशा अनेक खात्यांचे मंत्री राहीले.त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.यात शेतक-यांसाठी कृषी व कर्जमाफी योजना,ग्रामीण स्वच्छतेसाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,ग्रामपंचायत सक्षमीकरण,महिला व तरुणांसाठी विशेष धोरणे, तसेच नुकत्याच वीजपुरवठा खंडित झालेल्यांसाठी ‘विलासराव देशमुख अभय योजना’यांचा समावेश आहे.ज्याद्वारे थकबाकीत सवलत देऊन वीजजोडणी पुन्हा दिली जाते.
तंटा-मुक्त गाव मोहिम तसेच पंचायत राज सक्षमीकरण ही त्यांची योजना विशेष गाजली.या योजनेद्वारे जिल्हा परिषदांना अधिक सक्षम बनविणे आणि पंचायत राज व्यवस्था अधिक बळकट करणे याला प्राधान्य देण्यात आले होते.त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाविषयी देखील मंजरा चॅरिटेबल ट्रस्टचा प्रामुख्यामाने उल्लेख आढळतो.या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक शाळा,महाविद्यालये आणि तांत्रिक संस्थांची स्थापना लातूर,पुणे व मुंबई येथे झाली.
त्यांच्या कारकीर्दीतील युवा काँग्रसच्या पाच-सुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसह २०११ साली मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पद देखील उल्लेखनीय होते.मांजरा येथील साखर कारखान्याची भरभराट त्यांच्या कार्यकाळात झाली.लातूर शहरात व मराठवाड्यात विलासराव देशमुख हे नाव ‘विकासरत्न’नावाने संबोधले जाते मात्र,लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत अश्‍या स्वर्गीय विभूतीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तोंडून कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकीचा जोश भरताना,
‘आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतं आहे कि हंड्रेड पर्संटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील,यात शंका नाही’असे शब्द निघाले.यानंतर राज्यातील विरोधकांसह संपूर्ण महाराष्ट्रात चव्हाणांवर टिकेची झोड उठली.समाज माध्यमात मुख्यमंत्र्यांसह रवींद्र चव्हाणांचे पुरते ‘वस्त्रहरण’झाले.जनतेचा रोष बघून रवींद्र चव्हाणांवर ‘सारवासारवी’ची वेळ आली व त्यांनी ‘माझा रोख विलासरावांचे नाव पुसण्याचा नव्हे तर लातूरमध्ये विकासकामांद्वारे पुसल्या जाणा-या कामावर होता’अशी ’उसणवारी’ दिलगिरी व्यक्त करीत,विलासरावांचे पुत्र व सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या व्हायरल व्हिडीयोवर प्रतिक्रिया देत,ते माझे चांगले जवळचे मित्र असल्याचे ते म्हणाले.

रितेश देशमुखांनी व्हायरल केलेल्या व्हिडीयोमध्ये‘दोन्ही हात वर करुन सांगतो,लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात,लिहलेलं पुसता येतं…कोरलेलं नाही,जय महाराष्ट्र’असे प्रतिउत्तर सोशल मिडीयावर दिले.हे मार्मिक,भावनिक व तितकंच सडेतोड उत्तर मराठी मनांना खूप भावलं व त्यांच्या संतापात अधिकची भर पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकणार नाही.विलासराव यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे,रवींद्र चव्हाण यांानी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे,दिलगिरी देखील व्यक्त केली आहे,रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो,महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली…’अशी मखलाशी मुख्यामंत्र्यांनी केली.मात्र,त्यांच्या या वक्तव्याने लोकांचा रोष कमी होण्या ऐवजी अधिकच भडकला.
लातूरचे शिल्पकार मानल्या जाणा-या दिवंगत मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा वापरल्याने लातूरकर व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविक होते.स्थानिक निवडणूकीत विजय मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजप नेत्यांकडून उद्दामपणाची सर्व मर्यादा ओलांडण्याचे हे एक उदाहरण आहे.लातूरकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून सोशल मिडीयावर चव्हाण यांच्या उद्दामपणावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत,त्यातील काही बोलक्या प्रतिक्रिया….
विलासराव हे नुसते नाव नाही,किंवा केवळ एक व्यक्तिमत्व ही नाही,विलासराव एक विचार आहे,ते समुद्राच्या किना-यावर ओढलेली रेष नाही,किंवा लाटांनी पुसुन टाकावी अशी अक्षरे ही नाहीत,तर काळाच्या कसोटीवर उतरलेला,जनतेच्या ह्दयात कोरलेला संस्कार आहे.विलासराव देशमुख लोकांच्या मनात जिवंत आणि विचारांमध्ये सदैव अमर असतील….!
#we support Ritesh Vilasrao Deshmukh
रवींद्र चव्हाण यांनी फक्त विलासराव यांच्या चिरंजीवांच्याच नाहीत तर..अख्ख्या महाराष्ट्राच्या भावना दुखावल्यात आहेत…!
स्व.विलासरावजी देशमुख हे आदरणीय लोकनेते होते हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे…तुम्ही काय आहात हे ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे..ज्या हिंदू धर्म संस्कृतीचा तुम्ही सातत्याने टेंभा मिरवता त्याच हिंदू संस्कृतीमध्ये  स्वर्गीय लोकांबद्दल आदर ठेवायचा असतो ..मात्र तुमच्या केंद्रीय नेतृत्वालाच संस्कृतीची आठवण नाही,तुम्ही पण तेच करणार..देशमुख साहेब लातूरचेच नाही तर महाराष्ट्राचे लोकनेते होते हे विसरु नका..तुमच्या वक्तव्यचा जाहीर निषेध..निषेध…निषेध…!
चव्हाण साहेब तमाम लातूर जिल्हावासियांच्या तुम्ही भावना दुखावल्या आहेत.त्यांच्या कुटूंबियांच्या तर दुखावल्याच आहेत त्यामुळे तुमची टक्केवारी घसरणार आहे…!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलेल्या विलासरावजींच्या निधनला १३ वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्याबद्दल इतका द्वेष का?भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळिमा फासणारे आहे!गावागावात आणि शहरात विलासरावजी देशमुख यांच्या कार्याचे जे ठसे उमटले आहेत,ते पुसण्याचे धाडस भाजप करु शकत नाही,तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी महाराष्ट्राच्या DNA मधून विलासरावजींना पुसता येणार नाही.वैचारिक मतभेद असू शकतात,पण मृत्यू पश्‍चातही तिसस्कार जाेपासणे हीच भाजपाची विकृती आहे.महाराष्ट्राची जनता या द्वेषाचं उत्तर नक्कीच देईल!
विलासरावजी समजून घ्यायचे असतील तर रविंद्र चव्हाणांनी एकदा गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा इतिहास समजून घ्यावा.मराठवाड्याला लाभलेल्या या दोन उत्तुंग नेत्यांनी परस्पर विरोधी राजकारण करत असताना देखील मैत्रीचे आणि स्नेहाचे बंध जोपासले होते.आपुलकी आणि सौहार्द जपला होता.त्यांच्या राजकारणात विखार नव्हता…प्रेम होतं.पण आजकालच्या भाजपच्या नेत्यांना या बाबी समजणार नाहीत,कारण ते गोपीनाथरावांंच्या नाही तर विखारी संस्कारात वाढलेल्या भाजपचे प्रतिनिधित्व करतात.आणि म्हणून अजातशत्रू विलासराव त्यांना कळणे दुरापस्त आहे.
विलासराव देशमुख हे फक्त एक नाव नाही तर मराठवाड्याचा आत्मा आहे..!‘विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाका’हे केवळ एक विधान नाही,तर संपूर्ण मराठवाड्याचा अपमान आहे.ज्यांनी आयुष्यभर जनतेसाठी काम केलं,दुष्काळात,संकटात शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले,अशा लोकनेत्याच्या आठवणी पुसता येतील का?ही केवळ आठवण नाही,ती लाखो लोकांच्या मनातली श्रद्धा आहे,प्रेरणा आहे.भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य म्हणजे ‘लोकशाहीची विटंबना’आहे.विरोधकांवर टिका करायची,पण इतक्या..नीच पातळीवर?
लातूर विसरणार नाही,महाराष्ट्र विसरणार नाही,विलासराव देशमुख हे जनतेच्या काळजात कोरलेलं नाव आहे,आणि कुठल्याही सत्तेच्या अंहकाराने ते पुसता येत नाही.ही हाक आहे…पुसून टाकण्याची भाषा करणा-यांना..जनतेचंच उत्तर झेलावं लागेल…!
सरंपच पासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत स्वकर्तृत्वाने पोहचलेले नाव म्हणजे विलासराव आहेत.तुमच्यासारख्या आयत्या पीठावर रेघा नाही ओढल्या त्यांनी.तुम्ही कोण कुठले एका रात्रीतून पद मिळवतात,कोणावरही टिका करण्याची लायकी नाही तुमची…कुठे इंद्राचा ऐरावत कुठे खेमा गवळ्याची म्हैस..जरा जपून बाेलावं,आपण राज्यात भाजपचे मुखंड आहात…!
सत्तेची मस्ती,धुंदीमुळेच तुमच्यासारखी माणसं असे अभद्र बोलतात,दोष तुमचा नाही,तुमची मस्ती,घमेंड बोलतो.हे ही दिवस बदलतील..कलियुग आहे..!
शेणाचा ढीग कितीही मोठा झाला तरी तो हिमालयाचे अस्तित्व मिटवू शकत नाही…!
१५ वर्षे सत्ता मिळाली तर एवढे माजले आणि ७० वर्षे मिळाली तर..काय करतील?रावणाची लंका दहन झाली तर या रवी चव्हाणची भाजपा काय चीज आहे..!
थोडक्यात,विलासराव देशमुख ही एक किवंदती आहे,त्यांचे जीवन,राजकारण,महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान याचा विचार न करता,स्थानिक पातळीवरील निवडणूक जिंकण्यासाठी तुच्छ राजकारणाचा गाठलेला कळस म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे वादग्रस्त विधान आहे.त्यामुळेच एका मराठी शायरचे शब्द हल्लीच्या राजकारणावर चपखल बसतात ’रात्रीच्या नग्न शरीरावर झोपेचे उलटे प्याले सांडताय…मेलेल्या मुडद्यांचा वास फूलांच्या बगिच्यात पसरलाय….!’
……………………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या