फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजभारतवनचा प्रस्ताव झाला रद्द

भारतवनचा प्रस्ताव झाला रद्द

Advertisements

महामेट्रोचा झाडांच्या पुनर्रोपणाचा दावा फेल

नागपूर,१५ जानेवरी २०२०: महामेट्रोने महानगरपालिकेला भारतवनातून प्रस्तावित रस्ता करणार नसल्याचे पत्र दिल्याने या परिसरातील हजारो झाडांना जीवनदान मिळाले असून यातील अनेक झाडे ही दीड ते दोनशे वर्ष जुनी आहेत. पर्यावरणप्रेमींच्या उस्फूर्त आंदोलनांची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर महामेट्रोने या भागातून करण्यात येणारा प्रस्तावित रस्ताच रद्द केल्याचे पत्र मनपाला दिले.विशेष म्हणजे पूर्वीच्या प्रस्तावात महामेट्रोने भारतवन परिसरातील हजारो झाडांचे ‘पुनर्रोपण ’ करण्यात येणार असल्याचे सांगितले होते मात्र, यापूर्वी महामेट्रोने पटवर्धन मैदान तसेच अमरावती मार्गावरील ‘हायवे ग्लोरी’च्या पाठीमागे केलेले पुनर्रोपण सपशेल फेल झाल्याची चर्चा महापौर संदीप जोशी तसेच मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कानावर टाकण्यात आली होती.

एका पर्यावरणप्रेमी संघटनेने महामेट्रोने या दोन्ही ठिकाणी झाडांचे केलेले पुनर्रोपण किती तकलादू आहे,झाडांचे बळी घेणारे आहेत याची जंत्रीच पुराव्यानिशी मांडली परिणामी,महापौर संदीप जाेशी यांनी देखील भारतवन परिसरातील हजारो झाडांच्या महोमेट्रोच्या पुनर्रोपणाच्या प्रस्तवाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा आहे.

महामेट्रोने महापालिकेला दिलेल्या पत्रात दोन कारणे सांगितली आहे,फूटाळा कडील रस्ता बंद करण्यात येणार नाही तसेच भारतवन येथील हजारो झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात येत आहे. यामुळे हजारो पर्यावरणप्रेमींना दिलासा मिळाला असून त्यांनी मेट्रोच्या या निर्णयाचे स्वागत करीत महापौरांचेही आभार मानले.

फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण व म्यूझिकल फाऊंटेन या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ॲप्रोच रस्ता म्हणून भारतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. हा प्रस्तावित रस्ता भारतवन परिसरातून तयार केला जाणार होता,त्यासाठी वन परिसरातील हजारांवर झाडांची कत्तल केली जाणार होती,या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरण प्रेमींनी या प्रस्तावित रस्त्याला तीव्र विरोध करीत धरणे-आंदोलने केली. गेल्या दीड वर्षांपासून विविध पर्यावरणप्रेमी संघटना या आंदोलनात हिरीरिने सहभागी झाली.या विरोधात निर्माण करण्यात आलेली ‘मानवी साखळी’ देखील चर्चेत राहीली.

महामेट्रोने या परिसरातील झाडे काढून दुसरीकडे पुनर्रोपण करण्याची कारवाई सुरु केली होती. महापालिकेलाही त्यांनी पुनर्रोपणाची परवानगी मागितली होती. दरम्यान संदीप जोशी यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला. त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन पर्यावरणप्रेमींचा उद्वेग त्यांच्या कानावर टाकला व प्रस्तावित रस्ता रद्द करण्याची परवानगी घेतली. परिणामी महामेट्रोने आता फुटाळा चौपाटीचा रस्ता बंद करण्याची गरज नसल्याचे तसेच भारतवनातील प्रस्तावित रस्ता तयार करणार नसल्याचे पत्र मनपाला दिले. त्यामुळे भारतवनातील शेकडो झाडे यांना जीवनदान मिळाले असून यामुळे पर्यावरणाची होणारी अपरिमित हानि टळली. पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शास्त्रीयरित्या झाडांचे पुनर्रोपण करणे गरजेचे-डॉ.अमित हेडा(अध्यक्ष्,ग्राहक न्याय परिषद)
हा जनतेच्या प्रयत्नांचाच विजय आहे.भारतवनाशिवाय ही शहरात जिथे ही पर्यावरणाची हानि होणार असेल तिथे आमची संस्था असाच लढा देईल.या प्रस्तावात तर झाडांच्या पुनर्रोपणाविषयीचा दावा करण्यात आला होता मात्र जोपर्यंत शास्त्रीयरित्या झाडांना त्यांच्या मूळापासून काढून इतर ठिकाणी योग्य रोपण केले जाणार नाही,झाडे अशीच मरत राहणार,मनपाच्या या निर्णयात माझ्या माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीचाही वाटा अाहे. तसेही हा मुद्दा अद्याप न्यायालयात विचारधीन आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या