

सोशल मिडीयावरील कमेंट भोवली
नागपूर,ता. १४ जून: महापौर दयाशंकर तिवारी हे सोशल मिडीयावरही सक्रीय असतात त्यात काही वावगे नाही,ही काळाची गरजही आहे मात्र कोणाच्या कोणत्या पोस्टवर कसे कमेंट करायचे याचे भान ठेवले नाही तर ट्रोल होण्याची भीती असते असेच काहीसे नागपूरचे प्रथम नागरिक असणारे महापौर दयाशंकर तिवारी यांच्याबाबतही घडले.
नुकतेच राष्ट्रवादी पक्ष्ाच्या प्रदेश सरचिटणीस व मनपाच्या ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेऊन गेल्या १५ वर्षांपासून भारतीय जनता पक्ष्ाची सत्ता असणा-या नागपूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट काराभारावर पुराव्यानिशी ताशेरे ओढले.या पत्र परिषदेचे वृत्त ही दुस-या दिवशी सर्वच भाषेच्या दैनिकांमध्ये ठलकपणे झळकले.अश्याच एका वृत्ताची दखल घेत एका नेटीझननी महापौर व आभा पांडे यांना फेसबूक पोस्टशी टॅग करीत ‘नागपूर की जनता शर्मिंदा है,मनपा मे आज भी भ्रष्टाचारी जिंदा है’या मथळ्याखाली फेसबूक पोस्ट टाकली.
त्याच्या या पोस्टवर महापौरांची कमेंट होती ‘ ये सभी फाइलें तुकाराम मुंडे जी के कार्यकाल की है’महापौरांच्या या ‘कातडी बचाव’पोस्टवर नेटीझन्स चांगलेच तूटून पडलेत.आभा पांडे यांनी करोनासारख्या महाभयंकर आपत्तीत जनतेचे प्राण वाचवण्यासाठी व त्यांना तातडीने आरोग्याच्या सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जो कोट्यावधीचा निधी नागपूर मनपाला उपलब्ध करुन दिला,तो निधी भ्रष्ट प्रशासनाने कश्याप्रकारे भ्रष्ट कारभार करुन संपवला याचा संपूर्ण लेखाजोखाच पुराव्यानिशी मांडला होता.
हा संपूर्ण कालखंड करोना आपत्तीचाच होता.त्यात मुंढेंचा काळ आणि विद्यमान मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.चा काळ असे वर्गीकरण त्यांनी पत्र परिषदेत केले नव्हते.भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो तो कोणाच्याही काळातला असो.विशेष म्हणजे तो निधी शेवटी आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्यांकडून देण्यात आला होतो.तो निधी भ्रष्टाचार करण्यासाठी उपयोग आणन्यासाठी नव्हता.
मात्र महापौरांनी हा भ्रष्टाचार मुंढेंच्या काळातला होता राधाकृष्णन यांच्या काळातला नाही असे केलेले समर्थन नेटीझन्सला मुळीच भावले नाही.मुंढेंच्या काळात भाजपची सत्ता नव्हती का?असा सरळ सवाल आता महापौरांना विचारला जात आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे महापौर आपल्या कमेंटमध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे एकप्रकारे मान्यच करीत आहे मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी मुंढेंच्या काळात भ्रष्टाचार केला ते आज ही त्याच पदावर आहेत त्याचे काय?त्यांच्यावर आजपर्यंत महापौरांनी कारवाई का नाही केली?
महापौरांना मुंढेंच्या काळात भ्रष्टाचार झाला तोच आभा पांडे यांनी उकरुन काढला असे वाटत असेल तर प्रशानाच्या त्या भ्रष्टाचारी अधिका-यांवर महापौर व आयुक्त का कारवाई करीत नाही?कोणत्या मुर्हुताची वाट महापौर बघत आहेत?असा सवाल विचारला जात आहे.
याच महापौरांनी २० जून २०२० रोजी भट सभागृहात पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत मनपातील भ्रष्ट कारभाराविरोधात ६ दिवस रान पेटवले होते.त्यांचा संपूर्ण रोख हा मनपाच्या आरोग्य विभागाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार यांच्यावरच होता.मुंढेंना धारेवर धरत मनपाच्या गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात कश्याप्रकारे हजेरी पुस्तिकेत डॉ.शीलू गंटावार या एकसाथ स्वाक्ष् री करुन गैरहजर राहतात याचा अख्खा पाढाच महापौरांनी मुंढेंसमोर वाचला होता.त्याच डॉ.शीलू गंटावार आज महापौरांच्या काळात त्याच इंदिरागांधी रुग्णालयाच्या मुख्य अधिकारी पदावर बसल्या व महापौर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करीत असल्याचे छायाचित्र प्रसार-प्रचार माध्यमांनी प्रसिद्ध केले,हे नेटीझन्य विसरले नाहीत!
महापौर पदी रुजू होताच त्यांच्या नजरेत अतिशय भ्रष्ट कारभार करणा-या व नागपूरकर जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी करणा-या डॉ.शीलू गंटावार अचानक कश्या कर्तृत्ववान होऊन गेल्यात की त्यांची पदोन्नती होऊन त्यांना चक्क मुख्य पदी बसवल्या गेलं?या साठीच ऐन करोनाच्या पहील्या लाटेत जेव्हा जनतेचा जीव धोक्यात होता तेव्हा महापौरांनी गंटावार दाम्पत्यासाठी ६ दिवस प्रशासनाला वेठीस धरले होते?याच साठी होता का तो अट्टाहस?त्यांना प्रमुख पदी बसवण्यासाठी?असा प्रश्न आता समाज माध्यमांवर महापौरांना विचारल्या जात आहे.
डॉ.प्रवीण गंटावार नागपूर महानगरपालिकेचे ‘बापच’-
ज्या महापौरांनी इंदिरा गांधी रुग्णालयात मुख्य पदी असताना डॉ.प्रवीण गंटावार यांनी त्या रुग्णालयाचा कस गैरवापर केला,रात्री-अपरात्री महिलांना त्यांच्या कक्ष्ात आणून रुग्णालयाचाच कुंटणखाना केला,असे अतिशय गंभीर आरोप भर सभागृहात डॉ.गंटावारांवर केले,त्यांचे निलंबन न केल्यास पुरावे असणारी ती टेपच व्हायरल करण्याची धमकी सभागृहात दिली,महापौर पदी रुजू होताच तेच गंटावार ऐन करोनाच्या दुस-या जीवघेण्या लाटेत जेव्हा रुग्णालयातच नव्हे तर घरोघरी उपचारा अभावी नागपूरकर जनता तडफडून मरत होती तेव्हा चक्क आरोग्य विभागाला कोणतीही सूचना न देता प्रदीर्घ सुटी वर निघून गेलेत.ऑगस्ट २०२१ ते १ जून २०२१ एवढी प्रदीर्घ रजा त्यांनी भरपगारी घेतली तरी महापौरांनी त्यांच्या या ‘कार्यक्ष म’ कारभाराची कोणतीही दखल नाही घेतली.
मनपाचे आरोग्य अधिकारी या नात्याने त्यांचे काम रुग्णांचे प्राण वाचवण्याचे होते,ही त्यांची नैतिक जवाबदारी होती मात्र मनपाची नोकरी करण्याऐवजी ते धंतोली येथील आपल्या खासगी ‘कोलंबिया’रुग्णालयात प्रत्येक बेडवर पैसा कमावत होते,अश्यावेळीही त्यांच्यावर आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.संजय चिलकर यांनी एक नोटीस बजावण्या पलीकडे कोणतीही कारवाई केली नाही.
आता करोनाची लाट आेसरताच १ जून २०२१ पासून हेच डॉ.गंटावार पुन्हा मनपात ‘दर्शन’देते झालेत मात्र ते ही अर्धा तास बसून निघून जातात,मनपात ते आपली फक्त ‘पायधूळ’झटकायला येत असतात,महापौर आणि आयुक्तांच्या कृपेने नागपूरकर जनतेने त्यांची ही पायधूळ माथी लावण्याचेच फक्त बाकी आहे,डॉ.गंटावारांना एवढा ‘अभय’सत्ताधा-यांकडून का मिळत आहे?या प्रश्नाचे उत्तर नेटीझन्स शोधत आहेत.
शासकीय नियमाप्रमाणे ९० दिवस एखाद्या अधिकारी हा सतत गैरहजर राहीला तर त्याला मनपाच्या नव्हे तर शासनाच्या वैद्यकीय समितीसमोर हजर राहून खूलासा द्यावा लागत असतो.डॉ.गंटावारांना मात्र कोणताही खुलासा कोणापुढे ही द्यावा लागला नाही,ना काेणी त्यांना खुलासा विचारण्याची हिंमत दाखवली म्हणूनच गंटावार यांना ते मनपाचे ‘बापच’असल्याचे खासगीत बाेलले जाते.बापाचं कामच आहे ‘पोसणं’डॉ.गंटावार हे तर पूर्ण मनपालाच पोसत असल्याची चर्चा होते तेव्हा महापौरांकडूनही नागपूरकरांना ‘न्याय ’मिळेल अशी अपेक्ष्ा नागपूरकर जनता करत नाही.
दुस-या पक्ष्ाची सत्ता असती आणि महापौरांनी असे विधान केले असते की आभा पांडे यांनी काढलेला भ्रष्टाचार मुंढेंच्या काळातला आहे तर कदाचित जनतेने समजूनही घेतलं असतं मात्र स्व:ताच्याच पक्ष्ाची सत्ता असताना महापौर अश्याप्रकारची कमेंट करतात तेव्हा…चर्चा तो होनी ही थी….!
महापौरांची ही कमेंट म्हणजे ‘अ’न्याय बुद्धिला शोभेल अशी असल्याची खोचक टिका ही एका नेटीझनने केली.यांच्याकडून न्यायाची,पारदर्शितेची अपेक्ष्ा करणे मूर्खपणाचे असून महापौर फक्त जवाबदारी झटकत असल्याचा आरोप ही करण्यात आला.




आमचे चॅनल subscribe करा
