


नागपूर: शहरात हिवाळी अधिवशेन सुरु आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त असताना महापौर संदीप जोशी यांच्या कारवरच अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मंगळवार दि. १७ डिसेंबर २०१९ रोजी रात्रीच्या वेळी हल्ला केला. या हल्ल्यात महापौर हे थोडक्यात बचावले.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने ते कुटुंबिय तसेच मित्र मंडळीसह ‘रसरंजन’ढाब्यावर जेवायला गेले होते. रात्री १२ च्या सुमारास वर्धा रोडवरील एम्प्रेस पॅलेसजवळ त्यांच्या कारवर दोन दूचाकीधारकांनी गोळीबार केला. दोन गोळ्या या कारला छेदून गेल्या.तिसरी गोळी झाडताना तोल गेल्यामुळे महापौरांची गाडी रस्त्याखाली उतरल्यामुळे जीव वाचला असावा असे महापौर संदीप जोशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले. मित्र मंडळींच्या सात-आठ गाड्या या पुढे गेल्या आणि हीच वेळ साधून अनोळखी हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर तीन राऊंड गोळीबार केला असल्याचे सांगितले जाते.यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर महापौरांचे कुटुंबिय हे चिंताक्रान्त आहेत. बेलतराेडी पोलीसांना घटनेची माहिती दिली असून पोलीसांनी अज्ञान हल्लेखोरांबद्दल गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.

महापौरांना सूचना पेटीतून याच महिन्यात ६ आणि १२ डिसेंबर रोजी धमकीवजा पत्र प्राप्त झाले होते हे विशेष! सध्या शहरात न्यायालयाच्या आदेशावरुन अवैध अतिक्रमण पाडले जात आहेत. महापौर पद स्वीकारताच महापौर संदीप जोशी यांनी अतिक्रमणाविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला. यामुळे अनेकांच्या टार्गेटवर ते आलेत.

कुठल्याही परिस्थितीत विकासकार्य पुढे नेत राहणार-संदीप जोशी
जीवघेण्या हल्ल्यानंतर देखील महापौर संदीप जोशी यांनी कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याला धैर्याने तोंड देत पुढे कार्य करीत राहणार,कुठल्याही परिस्थितीत शहराचे विकासकार्य पुढे नेत राहणार असल्याचे पत्रकारद्वारे कळवले. कुणाच्या धमकींना घाबरणार नसून शहरातील नागरिकांच्या हितासाठी,शहराच्या विकासासाठी कठोर निर्णय घ्यावा लागला,तरीही मागे-पुढे पाहणार नाही.या कठीण प्रसंगी माझे मनपातील सहकारी नगरसेवक, कर्मचारी,शहरातील सुजाण जनता यांनी तसेच माझ्या कुटुंबियांनी जी मला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
विधानसभेत देखील घटनेचे पडसाद-
या घटनेचे पडसाद बुधवारी विधान सभेत देखील उमटले. विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित करुन महाराष्ट्राच्या उपराजधानीत महापौरांवरच जीवघेणा हल्ला होतो,ही अतिशय गंभीर बाब आहे.हे सरकार या घटनेची गांर्भीयाने दखल घेणार आहे का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या घटनेच्या न्याय कारवाईसाठी आम्ही सरकारवर दबाव देखील आणू असे माध्यमांकडे बोलताना ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी देखील या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. नागपूर पोलीस आयुक्तांना बोलावून संपूर्ण माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकाने हे प्रकरण नागपूर क्राईम ब्रॅन्चकडे सोपवले असल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नसल्याचे ते म्हणाले.कायदा-व्यवस्था मोडणार्यांची गय केली जाणार नाही असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले.




आमचे चॅनल subscribe करा
