फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहापौर पद ग्रहण समारंभात ‘ती‘चे अश्रू!

महापौर पद ग्रहण समारंभात ‘ती‘चे अश्रू!

Advertisements

भाजप महिला वार्ड अध्यक्षाने नवरा आणि घर दोन्ही हिरावले!‘ती‘चा आरोप

महापौरांकडून न्यायाची अपेक्षा:भाजप पदाधिका-यांनी बोलण्यापासून अडवले

नागपूर,ता.७ जानेवरी: नवनिर्वाचित महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या महानगरपालिकेच्या मुख्यालयातील पदग्रहण सोहळ्यात आज गुरुवार दि. ७ जानेवरी २०२१ रोजी दुपारी १ वा. एक महिला यांनी अचानक मंचावर येऊन बोलू देण्याची विनंती केली.मात्र भाजप पदाधिका-यांनी तिला अडवले.तिची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्र.३४ च्या महिला आघाडीच्या अध्यक्ष्ा मंजूषा भूरे यांच्याविरोधात होती.भूरे यांच्यावर या महिलेने गंभीर आरोप केले.

बारा वर्षांपूर्वी माझं लग्न युसीएन या स्थानिक केबल वाहीनीत काम करणा-या अमोल भूरे यांच्यासोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाले असून भाजपच्या मंजूषा भूरे या ५०० रु.महिन्यावर त्यांच्या नव-याच्या हाताखाली काम करीत होत्या.मात्र नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले.नुकतेच दोन महिन्यापूर्वी सासरे यांचे देहवासन झाल्याने मंजूषा भूरे यांच्यासोबत संगनमत करुन नव-याने दोन मूलांसोबत घराबाहेर काढले,असे ही महिला रडत-रडतच माध्यमांना सांगत होती.मुलांचे कपडे व शाळेतील पुस्तके सुद्धा घेऊ दिले नसल्याची मार्मिक आपबिती तिने सांगितली.

याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात केली असून तो एक महिना फरार होता. माजी महापौर संदीप जोशी यांच्या स्वीय सहायकांना भूरे यांनी या महिलेच्या नव-यावर कोणतीही कारवाई पोलीसांमार्फत करण्यात येऊ नये,असे सांगिले परिणामी संदीप जोशी यांच्या स्वीय सहायकांकडून पोलीस ठाण्यात फोन गेलेत.त्यामुळे पोलीस ठाण्यातील मोठे अधिकारी मला ही हेच कारण सांगतात की ‘आम्हाला वरुन फोन येतात त्यामुळे काही करु शकत नाही!‘

एक महिना फरार राहील्यानंतर नव-याला अटक ही झाली.दोन दिवस कारागृहात बंदिस्त ही होता.यानंतर नव-याल जामिन मिळाला.मात्र यानंतर त्या दोघांनी व सासूनी मिळून मला आणि माझ्या अकरा वर्षीय मुलीला व आठ वर्षीय मूलाला घराबाहेर काढले,तेव्हापासून मी भाजप पदाधिका-यांच्या उंबरठ्यावर न्यायासाठी भटकत असल्याचे या महिलेने माध्यमांना सांगितले.

याप्रसंगी मंचावर उपस्थित भाजप नेत्यांनी तिला माध्यमांजवळ बोलण्यापासून अडवले मात्र तिला जणू आज आपल्या ‘अश्रूंना’जगासमोर वाट करुन द्यायची होती,त्याच निर्धाराने ती संपूर्ण समारंभ संपेपर्यंत धीराने समारंभस्थळी उभी होती.समारंभ संपताच तिने मंचावर धाव घेतली व आपले दू:खं मांडण्याचा प्रयत्न केला.मात्र तिला अडविण्यात आले.

सुषमा अमोल भूरे असे या पीडीतेचे नाव आहे.सासरे वारताच पतीने अनन्वित छळ सुरु केला असल्याचे त्या सांगत होत्या.माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी पीडीतेला आताच आपण घरी जाऊ व तुम्हाला घराच्या आत घ्यायला लावू असे आश्‍वान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र ज्या पद्धतीने डेहनकर यांच्यासह मंचावरील सर्व सत्ताधा-यांनी या पीडीतेच्या अश्रूंकडे दूर्लक्ष् करुन काढता पाय घेतला ते बघता तिला आपल्या वेदनेचा एवढा मोठा ‘सार्वजनिक तमाशा’करुन देखील न्याय मिळेल अशी आशा वाटत नाही.‘सत्ताधीश‘ने डेहनकर यांच्याशी संपर्क साधण्यचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

भाजपच्या सर्व पदाधिका-यांचे उंबरठे झिजवून झाले, किमान नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी हे तरी एवढ्या गंभीर तक्ररीची नोंद घेत त्या महीला अध्यक्षाला पक्षातून निष्काषित करतील अशी आशा तिने व्यक्त केली.

या सर्व गोंधळानंतर समारंभ स्थळी उपस्थित महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात या महिलेप्रति सहानूभूतीचे सूर ऐकू आले. प्रेमसंबध ठिक आहे मात्र पुरुषांनी आपले प्रेमसंबध हे घराच्या उंबरठय्ाबाहेरच ठेवावे,घरातील लक्ष्मीला अजाण,निरागस मुलाबाळांसहीत घराबाहेर काढणे ही बाब म्हणजे फक्त तिच्या आत्मसन्मानाला पोहोचवलेली ठेचच नाही तर माणूस म्हणून केलेली क्रूरताच आहे,अशी चर्चा एेकू आली.मंजूषा भूरे या स्वत: एक महिला असून दुस-या महिलेचे घर आणि संसार उधवस्त करण्यासाठी कारणीभूत ठरल्या यावर देखील चांगलाच संताप व्यक्त केला जात होता.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या