फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममहापौरांनी केली हूंडा पिडीतेला पन्नास हजारांची आर्थिक मदत

महापौरांनी केली हूंडा पिडीतेला पन्नास हजारांची आर्थिक मदत

Advertisements

आईने केला रुग्णालयाचा बिलाचा परतावा
नागपूर,ता. १० मार्च: डिसेंबर महिन्याच्या २३ तारखेला हूंडा पिडीता करिष्मा तामगाडके(गायकवाड)या अवघ्या २६ वर्षीय नवपरिणितेला तिचे सासरे निवृत्त प्राध्यापक भीमराव तामगाडके यांनी हुंड्याच्या लोभापायी चौथ्या मजल्याच्या स्वयंपाक खोलीच्या गॅलरीतून खाली ढकलून दिले,तेव्हापासून पिडीतेची प्रकृती ही अतिशय गंभीर असून आतापर्यंत लाखो रुपये तिच्या उपचारावर विविध खासगी रुग्णालयात खर्च झाले.करिष्मा ही स्वत:संगणक अभियंता असून तिचा पती साकेत तामगाडके हा मेकनिकल अभिंयता असून पिंपरी येथील एका खासगी कंपनीत नोकरीवर आहे.त्यांच्या लग्नाला फक्त तीनच महिन्याचा कालावधी लोटला होता.मात्र हुंडा लोभी असणा-या तामगाडगे कुटुंबियांनी संगनमत करुन अवघ्या २६ वर्षाच्या या तरुणीसोबत क्रोर्याची परिसिमा गाठली.

लग्नानंतर साकेत याने करिष्माला पिंपरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला.माझ्या आई-वडीलांना सून हवी होती म्हणून लग्न केले असे सांगून तो या नवपरिणीतेला सोबत न नेता निघून गेला.लग्नानंतर पहीलीच दिवाळी असल्याने आई कल्पना यांनी सासरच्या मंडळीचा यथायोग्य मानपान केला.लग्नातच त्यांनी साढे चार लाखांचा खर्च केला होता.करिष्मा हीला वडील नसून २०१८ साली वडीलांचे निधन झाले.
पितृछत्र नसलेल्या या उच्च विद्याभूषित तरुणीसोबत मात्र लग्नाच्या अवघ्या तीनच महिन्यात भयंकर क्रोर्य घडले. लग्नात तुझ्या आईने वीस लाखांची एफडी नाही दिली,गाडी नाही दिली म्हणून सासरे भीमराव तामगाडगे, सासू ललिता तामगाडगे,नणद प्राची वासनिक व नणदोई राहूल वासनिक यांनी करिष्माचा हुंड्यासाठी छळ सुरु केला.

२३ डिसेंबर रोजी आपल्या खोलीत करिष्मा नव-याच्या आठवणीत रडत असताना सासरे,सासू,नणद व नणदोई यांनी तिचा मानसिक छळ सुरु केला.ती स्वयंपाक खोलीत आली असताना सासरे भीमराव तामगाडके यांनी तिला चक्क चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिले.सासू व नणदोई यांनी करिष्माला त्यांचे कौटूंबिक मित्र असणारे मानेवाडा रोडवरील डॉ.वैरागडे रुग्णालयात भरती केले व पळून गेले.कल्पना यांनी हुडेकेश्‍वर पोलीस ठाण्यात यासंबधीतक्रार दाखल केली मात्र सध्या सासरे,सासू,नणद व नणदोई हे सर्व जामिनावर बाहेर आहेत.

कल्पना गायकवाड यांनी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी घरातील दागदागिन्यासह सर्व किडूक मिडूक विकून,एफडी,एलआयसी मोडून आतापर्यंत जवळपास १० लाख रुपये खर्च करुन आपल्या काळजाला जगविण्याचा महत्‌ प्रयास केला,अश्‍यावेळी कल्पना यांनी शहरातील प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे देखील मदतीची याचना केली होती,महापौर दयाशंकर तिवारी यांनी तातडीने त्यांना स्व:खर्चातून आज बुधवार दि. १० मार्च रोजी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

सध्या करिष्मा या राजीव नगर येथील आरोग्यम रुग्णालयात भर्ती असून दोनच दिवसांपूर्वी तिच्यावर चाैथी शस्त्रक्रिया करण्यात आली .तिच्या पाठीवरील जखम ही मानेपर्यंत सडत गेली तसेच तिच्या फूफ्फूसात देखील पाणी जमा झाले होते.अर्थोपॅडिक डॉ. आलोक उमरे तसेच स्कीन सर्जन डॉ.मनीष झाडे यांनी शर्थीचे प्रयत्न करुन तिच्या अतिशय गंभीर प्रकृतीत सुधारणा केली.करिष्मा हिच्या उपचाराचे बिल एकूण १ लाख ३३ हजार रुपये निघाले होते.

गणतंत्र दिवस…आंबेडकरी कन्या आणि…क्रोर्याची परिसीमा!

एवढे पैसे करिष्मा यांच्या आईजवळ नसल्यामुळे करिष्माला घरी परत घेऊन जाण्याची वेळ आली होती मात्र माणूसकीच्या नात्यातून या अवघ्या २६ वर्षीय तरुणीचा जीव वाचविण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज आरोग्यम रुग्णालयात ५० हजार रुपयांची मदत पाठविली.या पैश्‍यातून कल्पना गायकवाड यांनी रुग्णालयाच्या बिलाचा पतरावा केला.

करिष्माच्या पाठीला बेडसोर्समुळे जो मोठा खड्डा पडला आहे त्यावरही तातडीने एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असून उद्या किवा परवा तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्या खड्ड्यात मांसाचा गोळा टाकून तो बुजविण्यात येणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.यासाठी देखील मोठा खर्च असून करिष्मा हिला आणखी आठ ते दहा दिवस रुग्णालयात उचारासाठी भर्ती रहावे लागणार आहे.
पालकमंत्री नितीन राऊत तसेच गृहमंत्री अनिल देखमुख यांनी देखील पुढाकार घेऊन जीवन-मृत्यूच्या या संघर्षात आपल्या शहरातील तरुणीला साथ द्यावी,आर्थिक मदत करावी अशी अपेक्ष्ा कल्पना या व्यक्त करतात.

आतापर्यंत करिष्मा हिच्यावर धंताेली येथील केअर रुग्णालयात ३ शस्त्रक्रिया झाल्या.तर ११ फेब्रुवारी पासून ती आरोग्यममध्ये भर्ती आहे.उपचाराशिवाय आतापर्यंत दीड लाख रुपयांची औषधे झाली. करिष्मा ही आरोग्यममध्ये १० दिवस आयसीयूमध्ये होती.एक दिवसात ३६-३६ हजार रुपयांची आैषधे तिला लागली तर एक दिवस २१ हजार,१८ हजार याशिवाय ३ दिवसांत ८ ते ९ हजार रुपयांची औषधे करिष्मा हिला जगविण्यासाठी देण्यात आली. एक्सरे १० हजार.ब्लड ४ बाटल्या एक बाटली २१०० रुपयांची,असा खर्च आतापर्यंत तिच्या उपचारावर झाला आहे.

यापूर्वी केअरमध्ये साढे सात लाख रुपये भरले गेले.इतर खर्च एक लाख रुपये खर्च झाला तर मानेवाडा रोडीवरील वैरागडे रुग्णालयात सात दिवसांचे ७० हजार रुपये खर्च झाले.

सध्या करिष्मा हिला आयसीयूमधून जनरल वॉडमध्ये ठेवण्यात आले असून आता तिच्या आईची हिंमत पूर्णपणे तुटली आहे.कल्पना यांनी आतापर्यंत नातेवाईकांकडून साढे तीन लाख उसणे घेतले तर आपल्या भागातील लाडकी डिंपी(करिष्मा)ला वाचविण्यासाठी पंचदिप नगर येथील रहीवाश्‍यांनी देखील कोणी ५ हजार कोणी १० हजारांची मदत केली.

महापौर सहाय्यता निधीच्या निकषात करिष्मा यांची घटना बसत नसली तरी माणूसकीच्या नात्यातून महापौर दयाशंकर तिवारी यांनी केलेली आर्थिक मदत पिडीतेच्या आईला धीर देणारी ठरली.रुग्णालयात विमनस्क मनस्थितीत बसले असताना अचानक महापौर यांच्यातर्फे सहाय्यता निधी आरोग्यम रुग्णालयात पोहोचताच कल्पना यांना सुखद धक्का बसला.आई म्हणून कायम या ऋणात राहील असे खास ’सत्ताधीश’जवळ त्या बोलल्या.
करिष्मा हिला पुन्हा आयुष्यात सन्मानाने उभे राहण्यासाठी समाजातील दारशूरांनी पुढे यावे असे आवाहन कल्पना गायकवाड यांनी केले आहे.

मोबाईल नं. ९९२२२०२३५५
बँकेचे डिटेल्स-
पंजाब नॅशनल बँक
अकाऊंट नंबर-1472000100398492
IFSC code PUNB0147200

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या