फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहापौरांच्या लसीकरण ‘सोहळ्यात‘ नागरीकांची तूफान गर्दी!

महापौरांच्या लसीकरण ‘सोहळ्यात‘ नागरीकांची तूफान गर्दी!

Advertisements

करोनाच्या प्रसार झाल्यास काेण असणार जवाबदार?

गर्दी टाळता आली मनपा प्रशासनाचा उरफाटा दावा!

नागपूर,ता. १ मे: महाराष्ट्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार आज १ मे पासून नागपूरात १८ ते ४४ वर्षादरम्यानच्या व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. प्राथमिक स्तरावर नागपूर शहरात इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह आणि आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयालात या लसीकरण सोहळ्याची सुरवात केली.मात्र लसीकरणाची व्यवस्था या केंद्रावर एखाद्या ‘सोहळ्यासाखी’ रंगली,यावेळी हजारो नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली मात्र नोंदणीनुसार टोकन देण्यात आल्यामुळे गर्दी टाळण्यात आली असल्याचा प्रशासन जो दावा करीत आहे जो अक्ष् र: पोकळ व फोल ठरला आहे.

पहिल्या दिवशी शनिवारी १ मे ला दुपारी २ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण या तीन केन्द्रांवर सुरु राहील. शनिवारी शहरातील तीनही लसीकरण केंद्रांवर नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला असा दावा प्रशासन करीत असली तरी आज उसळलेली तूफान गर्दी ही करोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरु शकते,सोहळ्यात दंग असणा-या मनपा प्रशासनाला व महापौरांना याचे भान नाही राहीले का?असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

सध्या शहरात केंद्रिय मंत्र्यांपासून तर महापौरांपर्यंत सर्वांना ‘रिबिन कापण्याचा‘ मोठा सोस असलेला दिसून पडतोय,नागरिकांसाठी अमूक सेवा सुरु केल्या अशी घोषणा करण्याऐवजी उद् घाटन सोहळे साजरे केले जात आहे.एगदी एखाद्या रुग्णवाहिकेचे लोकापर्ण देखील हे माय-बाप राजकीय नेते साग्रसंगीतपणे व हळदी-कूंकू वाहून करीत असल्याचे नागपूरकर बघत आहेत मात्र या संपूर्ण सुविधांचा उपयोग खरोखरच गरजू व सर्वसामान्य रुग्णांना होत आहे का?याचा मागोवा मात्र हे राजकारणी रिबिन कापल्यानंतर घेताना दिसत नाहीत,अशी टिका केली जात आहे.

महापौरांनी तर कहर करीत गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाचा कारभार ज्या डॉ.शीलू गंटावार यांच्याकडे सोपवला आहे त्याच डॉ. शीलू गंटावारांच्या विरोधात गेल्या वर्षी २० जून रोजी भट सभागृहात पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी घश्‍याला कोरड पडेपर्यंत कंठशोष केला होता.

या डॉ.शीलू गंटावार कश्‍याप्रकारे हजेरी पुस्तिकेत स्वाक्ष् री करुन मध्यप्रदेशात काँग्रेसचा प्रचार करतात ,मध्य प्रदेशमधील आपल्या कार्यालयात वेळ घालवतात,मनपाचा गलेलठ्ठ पगार लाटतात ,गरीब,गरजू रुग्णांसाठी असणा-या या रुग्णालयात सेवा न देता कश्‍याप्रकारे धंतोली येथील आपल्या ‘कोलंबिया’ या खासगी रुग्णालयात सेवा देतात,अशी अारोपांची सरबत्तीच त्यांनी तब्बल ६ दिवस सभागृहात केली होती,अगदी तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे सभेदरम्यान आपल्या खूर्चीवरुन उठून प्रसाधनगृहात उठून गेले असता ते परत येऊन आपल्या खूर्चीवर बसेपर्यंत विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी भर सभागृहात आपले भाषण मुद्दामुन थांबवून ठेवले होते, मात्र त्याच डॉ.शीलू गंटावार ऐन करोना महामारीच्या प्रकोपाच्या काळात एवढ्या ‘कार्यक्ष म व कर्तृत्वान’ कश्‍या झाल्या की त्यांना चक्क बढती देऊन या रुग्णालयाच्या प्रमुख पदीच महापौरांनी त्यांना विराजमान केले!यावर समाज माध्यमांवर बरीच खलबते रंगली आहेत.आजच्या या लसीकरण उद् घाटन सोहळ्यात महापौरांच्या शेजारी याच कार्यकर्तृत्वान डॉ.शीलू गंटावार उपस्थित असलेल्या दिसून पडत आहेत,यावर देखील समाज माध्यमात चांगलीच चर्चा रंगली.

मूळात लसीकरण ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी एक राष्ट्रीय प्रक्रिया आहे,केंद्र व राज्य सरकार मिळून जास्तीत जास्त लसीकरणासाठी प्रयत्नरत असताना याचे श्रेय लाटण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था कश्‍याप्रकारे नागरिकांमध्ये संसर्गाचा धोका वाढवित आहे,याचे हे फक्त एक उदाहरण,आज मनपाच्या या केंद्रावर लसीकरणासाठी आलेले निरोगी नागरिकच या लसीकरण केंद्रावरुन करोनाचा संसर्ग घेऊन गेलेत तर याला जवाबदार कोण?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.मात्र राजकीय नेत्यांचे हे असे सोहळे म्हणजे त्यांचे कर्तव्य नसून नागरिकांवर करण्यात येणा-या ‘उपकाराच्या भावनेची ’जाणीव करुन देत असल्याचे शहरातील बुद्धिजीवी सांगतात.आज जीवाच्या भीतीने नागरिकांनी ज्याप्रमाणे लसीकरण केंद्रावर गर्दी केली हे खरे तर मनपा प्रशासनाचे अपयशच ठलकपणे अधोरेखित करते.

नोंदणी केलेल्या व्यक्तींना केंद्रांवरून सकाळी टोकन देण्यात आले. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये व संपूर्ण प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी टोकन क्रमांकासह निर्धारित वेळ देण्यात आला. त्यामुळे नागरिकांची केंद्रावर गर्दी टाळता आली. लसीकरणानंतर अनेक तरुणांनी आनंद व्यक्त करीत सर्वांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या नागपूर शहरात करोनाने अक्ष् र: कहर माजवला आहे. करोनाच्या संसर्गापुढे गरीब,गरजू रुग्ण हे अक्ष् र: हतबल झाले असून आपले प्राण गमवत आहेत,अश्‍या वेळी ज्या गरजू रुग्णांसाठी मनपाची ही रुग्णालये आहेत त्याच रुग्णालयातून करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यास याला जवाबदार कोण असणार?असा सवाल आता विचारला जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या