फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहापौरांची ‘असंसदीय’ भाषा आणि घोडेस्वार यांचा सभागृहासमोर राडा

महापौरांची ‘असंसदीय’ भाषा आणि घोडेस्वार यांचा सभागृहासमोर राडा

Advertisements


महापौरांच्या असंसदीय भाषेचा केला निषेध
नागपूर,ता. ८ सप्टेंंंंबर: गेल्या चार वर्षांपासून दुर्बल घटकांसाठी असणारा निधी मनपा प्रशासनाने अखर्चित ठेवला एवढंच नव्हे तर तो २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात कॅरी फॉडवर्ड देखील का केला नाही,असा प्रश्‍न मनपातील बसपचे गट नेते जितेंद्र घोडेस्वार यांनी आज मनपाच्या सभेत उपस्थित केला.हा निधी खर्च करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या स्पष्ट सूचना असताना समाजातील दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मनपा प्रशासनाकडून हा निधी खर्चच करण्यात आला नाही असा संताप व्यक्त करीत १९३०-३१ च्या राऊंड टेबल बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात चर्चा घडून पुढे संविधानातच या निधीची भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे घोडेस्वार यांनी सांगताच महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘लोकसभेतील भाषण येथे नका करु’असे बजावले.यावर घोडेस्वार यांनी महापौरांना नेमके काय म्हणायचे आहे?अशी विचारणा करीत मी तोंडावर बोट ठेऊन गप्प बसणार नाही असे सांगत महापौरांनी व्याख्या स्पष्ट करावी,असे विधान केले,यावर तुमचं इतंक ऐकून घ्यायला‘सभागृह रिकामचोट नाही’अश्‍या असंसदीय भाषेचा प्रयोग महापौरांनी आज सभेत केला,एवढंच नव्हे तर घोडेस्वार यांचा आवाज म्यूट करण्याचे निर्देश दिले.

याचा निषेध म्हणून घोडेस्वार हे मनपा मुख्यालयातील सभागृहासमोर पोहोचले,सभागृहाचे दार उघडताच महापौरांनी ते बंद करण्याचे निर्देश दिले व तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते सभा संपल्यावर बोला,असे घोडेस्वार यांना सांगितले.यानंतर घोडेस्वार यांनी सभागृहाबाहेरच महापौर व सत्ताधा-यांचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.महापौरांच्या मनमानी कारभाराचा मी निषेध करतो असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.मी जनप्रतिनिधी असून माझ्या प्रश्‍नावर उत्तर देणे हे शासन-प्रशासनावर बंधनकारक असल्याचे ते म्हणाले.बसपचे मोहम्मद इब्राहिम टेलर यांनी देखील महापौरांचा निषेध नोंदवत सभागृह गाठले.

याप्रसंगी माजी उपमहापौर दिपराज पार्डीकर, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके व प्रदीप पोहोणे यांनी घोडेस्वार यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपच्या १०८ नगरसेवकांमध्ये अनेक अनुसूचित जाती व जमातीचे नगरसेवक असताना एकानेही माझी साथ दिली नसल्याची खंत घोडेस्वार यांनी ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली.

सत्ताधा-यांच्या मिलीभगतने प्रशासनाने माझा प्रश्‍न टोलवला असा आरोप त्यांनी केला.दुर्बल घटकांच्या निधीविषयी आतापर्यंत विभागीय आयुक्त,जिल्हा परिषदेत ही निवेदने दिली असल्याचे ते म्हणाले मात्र सभागृहाचा सदस्य या नात्याने प्रश्‍न विचारणे माझा संवैधानिक अधिकार असताना माझा माईक ‘म्यूट‘करण्यात आला,मला बोलू दिले गेले नाही उलट लोकसभेचे भाषण नकाे म्हणून माझ्या भावनेला महापौरांनी हिणवले,अशी कैफियत घोडेस्वार यांनी मांडली.

सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी स्थगन प्रस्तावावर लाबंलचक भाषण केले ते महापौरांना लोकसभेचे भाषण वाटले नाही का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.‘रिकामचोट’ही कोणती भाषा आहे,असा संताप घोडेस्वार यांनी व्यक्त केला.

दर वेळी सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष्ांनी आपापल्या प्रभागासाठी ३५-३५ कोटी रुपयांचे प्रावधान केले,विरोधकांना एक-दीड लाखांच्या विकास निधीसाठी देखील झुलवत ठेवण्यात आले. आज सभेत अनुसूचित जाती-जमातीचे ७५ सदस्य होते एकानेही महापौरांच्या या असंसदीय भाषेचा किवा जनप्रतिनिधीचा आवाज म्यूट करण्याचा निषेध केला नाही.

सभेत महापौरांनी जो शब्द उच्चारला ते बघता ते या गरिमामय पदावर बसण्याच्या योग्य आहेत का?लोकतांत्रिक पद्धतीने जनप्रतिनिधी त्यांना प्रश्‍न करु शकत नाही का?त्यांच्याच जवळ बसलेले मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.हे तर मौनी बाबा बनूनच बसतात.दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी असणारा किमान ३५ कोटींचा निधी हा अखर्चित ठेवण्यात आला, यावर सभेत प्रश्‍न विचारला असता महापौरच म्हणतात ’हा काय तमाशा लावला आहे?नंतर बोलू!’

संवैधानिक पदावर बसणारे महापौरच केंद्र व राज्याच्या निर्देशाप्रमाणे दुर्बल घटकांचा निधी अखर्चित ठेऊन संवैधानिक पदाचा अपमान करीत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या